महापूर, चक्रीवादळे, गारपीट, अतिवृष्टी आदि नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीपिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सुरु करण्यात आलेल्या पंतप्रधान पीकविमा योजनेत यंदा खरीप पिकाच्या संरक्षणासाठी राज्यातील 92 लाख 4 हजार 363 शेतकऱ्यांनी पीकविमा सहभाग नोंदवला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा 14 जिल्ह्यांतून सुमारे 8 लाख शेतकऱ्यांचा सहभाग वाढला असून, पीकविमा योजनेतून खरिपातील सुमारे 54 लाख 34 हजार 552 हेक्टर क्षेत्र संरक्षित झाले आहे.
महत्त्वाची घोषणा : महाराष्ट्राच्या कृषीक्षेत्रात आमूलाग्र बदल घडविण्यावर भर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
प्रत्येक वर्षी नैसर्गिक आपत्तींमुळे भारतातील शेतकऱ्यांना मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागते. अशा संकटातून शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री पीक विमा योजना (पीएमएफबीवाय) सुरू केली आहे. यंदा बीड पटर्ननुसार राबविण्यात येणारी ही योजना एचडीएफसी इर्गो इंडिया कंपनी लिमिटेड, भारतीय कृषी विमा कंपनी, आसीआयसीआय लोंबार्ड जनरल इंडिया कंपनी लिमिटेड, बजाज अलियान्झ जनरल इन्शुरन्स कंपन्यांद्वारे राबविण्यात येत आहे.
महत्त्वाची बातमी : इलेक्ट्रिसिटी 2022 विधेयकास संयुक्त किसान मोर्चाचा विरोध : देशव्यापी आंदोलनाचा इशारा
यंदा विमा हप्त्यापोटी शेतकऱ्यांनी 609 कोटी रुपये भरले आहेत. राज्य शासनाचा हिस्सा 1802 कोटी 14 लाख, तर केंद्र सरकारचा हिस्सा 1799 कोटी 99 लाख रुपये आहे. यंदा कोकण विभागात 83 हजार 038 नाशिक विभागात 3 लाख 65 हजार 975, पुणे विभागात 4 लाख 08 हजार 845, कोल्हापूर विभागात 32 हजार 319, औरंगाबाद विभागात 31 लाख 19 हजार 786, लातूर विभागात 35 लाख 11 हजार 127, अमरावती विभागात 14 लाख 23 हजार 175 शेतकऱ्यांनी सहभाग घेतला आहे. बीड, जालना, औरंगाबाद, हिंगोली, नांदेड जिल्ह्यांत यंदा अधिक शेतकरी सहभागी झाले आहेत. त्यात 3 लाख 75 हजार 101 शेतकरी बिगर कर्जदार, तर 88 लाख 29 हजार 362 शेतकरी कर्जदार आहेत.
ब्रेकिंग न्यूज : सोमवारी कृषी सहायकांचे राज्यभर धरणे आंदोलन
यंदा राज्यातील 92 लाख 4 हजार 463 शेतकऱ्यांनी खरिपासाठी पीकविमा भरला. गेल्या वर्षी 84 लाख 7 हजार 328 शेतकरी सहभागी झाले होते. त्या तुलनेत यंदा 7 लाख 97 हजार 135 शेतकऱ्यांचा सहभाग वाढला आहे. यंदा 54 लाख 34 हजार 552 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचा विमा उतरवला गेला आहे.
खरिपासाठीच्या यंदाच्या पीकविमा योजनेत गतवर्षीच्या तुलनेत सिंधुदुर्ग, नाशिक, धुळे, औरंगाबाद, जालना, बीड, नांदेड, परभणी, हिंगोली, बुलडाणा, अमरावती, वर्धा, नागपूर या जिल्ह्यांत शेतकरी सहभाग वाढला. तर ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, नंदुरबार, जळगाव, नगर, पुणे, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर, उस्मानाबाद, वर्धा, लातूर, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यात सहभाग घटला आहे.
मोठी बातमी : कांदा उत्पादक आक्रमक : 16 ऑगस्टपासून कांदा विक्री बंदचा इशारा
https://www.facebook.com/shetimitramagazine03
https://www.instagram.com/shetimitra03/
https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1