अक्षय्य तृतीया म्हणजे साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असून या दिवशी घरोघरी आवर्जून आमरस पुरीचा बेत केला जातो. मात्र यंदा हवामान बदल, अवकाळी पाऊस आणि तापमानातील प्रचंड चढ-उताराचा फटका बसल्याने यंदा कोकणातील आंब्याचे उत्पादन घटले आहे. अक्षय्य तृतीयामुळे चांगली मागणी असूनही आंब्याची म्हणावी अशी आवक होईल की नाही ? याची शाश्वती राहिलेली नाही. त्यानुळे उद्याच्या अक्षय्य तृतीयाच्या मुहूर्तांवर आंबा भाव खाणार, अशी चिंन्हे दिसू लागली आहेत.
यंदा कोकणातील बदलत्या हवामानाचा व वाढत्या तापमानाचा फटका हापूस आंब्याला बसला आहे. यंदा जवळपास 75 टक्के हापूस आंबा हा गळून पडला आहे. त्यामुळे आंबा बागायतदारांचे आर्थिक गणित विस्कटले असून, चिंता वाढली आहे.
यंदा मुळातच 90 टक्के आंबा बागा मोहरल्या नसल्याने कोकणच्या अर्थकारणाला मोठा फटकाही बसला आहे. त्यात आत रात्री कमी होणारे तापमान आणि दिवसा अचानक वाढणारे तापमान याच्या तफावतीमुळे उष्माघाताचा परिणाम आंब्यावर झाला आहे. आंबा फळांच्या दक्षिण भागाला सनबर्न म्हणजे उष्ण तापमान सहन होत नसल्याने आंब्याची मोठी फळगळ झाली आहे.
बहुतांश ठिकाणी आंब्यावर डाग उठल्याने आंबे खराब होऊन गळू लागले आहेत. काही ठिकाणी उष्माघातामुळे फळ पिवळे पडत आहे. त्यामुळेही आंब्याची मोठ्या प्रमाणात गळ होत आहे. कोकण किनारपट्टी भागातील आंबा बागायदारांना याचा सर्वाधिक फटका बसला आहे.
यंदा वाढता उष्मा, अवकाळी पाऊस, वातावरणातील बदलाने लांबलेला पावसाळा आणि उशिराने सुरू झालेली थंडी यामुळे हापूस काहीसा उशिराने मोहरला आहे. त्यानंतरही या मोहरावर थ्रीप्स रोगामुळे आणि तुडतुडा या रोगाचा प्रादुर्भाव वाढला. परिणामी मोठ्या प्रमाणात औषध फवारणी करावी लागली. अशा परिस्थितीमध्ये काही प्रमाणात हापूस हाताशी लागेल, अशी आशा बागायतदारांची होती. पण सध्या वातावरणात उष्मा वाढल्याने त्याचा मोठा परिणाम आता हापूसवर झाला आहे.
आंब्याच्या या गळीमुळे या वर्षी हापूस आंब्याचे एकूण उत्पन्न केवळ 20 टक्केच आले असल्याचे अक्षय्य तृतीयामुळे चांगली मागणी असूनही आंब्याची म्हणावी अशी आवक होईल की नाही ? याची शाश्वती राहिलेली नाही. त्यामुळे यंदा अक्षय्य तृतीयाच्या मुहूर्तांवर आंबा भाव खाणार, अशी चिंन्हे दिसू लागली आहेत.
आपणास ही बातमी आवडली असल्यास खालील स्टार क्लिक करून रेटींग करा
👇 👇 👇