Pomegranate Prices Booming : सध्या डाळिंबाच्या भावातील तेजी वाढतच (Pomegranate Prices Booming) असून गेल्या 15 दिवसात डाळिंबाच्या भागात सात पटीने वाढ झाली आहे. सध्या फळ बाजारात सर्वात महाग डाळिंब झाले आहे. त्यामुळे यंदा डाळिंबाचे पैसेच होणार अशी चिन्हे दिसू लागली आहेत.
मोठी बातमी : कांदा व्यापाऱ्यांवर कारवाईची मागणी
यंदा तापमानात (Temperature) झालेली वाढ, उन्हाचा (Heat) वाढलेला ताडाका आणि वेळी-अवेळी पडणारा पाऊस (Unseasonal Rain) याचा मोठा परिणाम डाळिंब शेतीवर झाला आहे. त्यामुळे डाळिंबाचे अधिक व दर्जेदार उत्पादन (Quality Produce) घेण्यासाठी काही डाळिंब उत्पादकांनी बहार व्यवस्थापनावर (Bahar Management) लक्ष केंद्रित करून यंदा डाळिंबाचे यशस्वी उत्पादन घेतले आहे.

कोरडवाहू (Drought) पट्ट्यात कमी पाणी, पाऊस (Rain) आणि पोषक वातारण असल्याने प्रती वर्षी दर्जेदार डाळिंबासाठी मृग बहार धरला जातो. राज्यात सोलापूर, नाशिक, अमदनगर, पुणे (PUNE), सांगली, सातारा, उस्मानाबाद आणि लातूर (LATUR) जिल्ह्यात व्यापारी तत्वावर डाळिंबाचे पीक घेतले जाते मात्र यंदा वातारणातील बदलामुळे डाळिंब बागायतदार गोंधळले होते. काही बागायतदारांनी वाढत्या उष्णतेपासून डाळिंब बागांचे संरक्षण करण्यासाठी बागांवर चक्क कापडी उच्छादनाचा प्रयोग केला. अतिशय मेहनत करून यंदा काही डाळिंब उत्पादकांनी बांगाची काळजी घेतल्याने दर्जेदार डाळिंबाचे उत्पादन घेतले आहे.
नक्की वाचा : कांदा व्यापारी मागण्यांवर ठाम : लिलाव बंदच !
हवामानाच्या बदलांमुळे यंदा डाळिंब उत्पादनात घट (Decline in Produce) येणार असली तरी चांगला भाव मिळत असल्याने ज्यांच्याकडे दर्जेदार डाळिंब आहेत; अशा शेतकऱ्यांना (Farmers) मात्र यंदा चांदी होणार आहे. कारण गेल्या 15 दिवसात डाळिंबाच्या दराने चांगलीच उचल खाल्ली आहे. पुणे जिल्ह्यातील नारायणगाव (Narayangaon) येथील डाळिंब उत्पादक रमेश गाडेकर (Ramesh Gadekar) यांना राहाता बाजार समितीमध्ये (Rahata Market Committee) प्रतीकिलो 800 रुपये दर मिळाला आहे. त्यांना केवळ 26 किलो डाळिंबाचे चक्क 16 हजार रुपये मिळाले आहेत. तर अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यातील कर्जत (Karjat) येथील शेतकरी विवेक रायकर (Vivek Raikar) यांना आळेफाटा (Alephata) बाजार समितीमध्ये 20 किलो डाळिंबाला 14 हजार 500 रुपये मिळाले आहेत. यंदाच्या हंगामातील हे उच्चांकी दर असल्याने शेतकऱ्यांमधून आनंद व्यक्त होत आहे.
मोठी बातमी : नाशिक जिल्ह्यात कांदा व्यापाऱ्यांचा बेमुदत बंद !

https://www.facebook.com/shetimitramagazine03