गेल्यावर्षी अतिरिक्त उसामुळे झालेला गोंधळ यंदा होवू नये यासाठी प्रशासन तयारीला लागले आहे. त्यामुळे यंदा प्रतिवर्षीच्या वेळापत्रकाच्या सुमारे 15 दिवस अगोदर म्हणजेच 1 ऑक्टोबरपासून 2022-23 हंगामासाठी कारखान्यांना ऊस गाळप सुरू करण्याची परवानगी देण्याची शिफारस पुण्यातील साखर आयुक्तालयाने राज्य सरकारला केली आहे.
मोठी बातमी : शेतकऱ्यांसमोर विषारी घोणस अळीचे खतरनाक संकट
गेल्या गळीत हंगामात अतिरिक्त उसाचा प्रश्न चांगलाच पेटला होता. कारखान्याने ऊस न नेल्याने अनेकांनी आपले ऊस पेटवून दिले तर काही शेतकऱ्यांनी आत्महत्या देखील केल्या होत्या. मात्र यंदा असे प्रकार होवू नयेत यासाठी साखर आयुक्तालयाने हा निर्णय घेतला आहे. यामुळे सरकार काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मागील सरकारने हा निर्णय घेतला होता. मात्र सरकार पडल्याने आता पुन्हा निर्णय घ्यावा लागणार आहे.

चालू हंगामात ऊसाचे प्रमाण जास्त आहे. राज्यात ऊसाचे जास्त उत्पादन झाल्याने मागील हंगाम 15 जूनपर्यंत चालला होता. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. सहकार मंत्री अतुल सावे म्हणाले की, साखर आयुक्तालयाने गळीत हंगाम लवकर सुरू करण्याची सूचना केली आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या नेतृत्वाखालील समिती सप्टेंबरच्या मध्यापर्यंत यावर निर्णय घेईल.
ब्रेकिंग न्यूज : ई-केवयसीसाठी पुन्हा मुदतवाढ !
हंगाम लवकर सुरु केल्यास अतिरिक्त ऊसाचा प्रश्न उद्भवणार नाही, असे त्यांनी म्हटले आहे. यावेळी, साखर आयुक्तालय शेवटच्या उसापर्यंत गाळप व्हावे, यासाठी आणखी 400 तोडणी यंत्रे घेण्याचे नियोजन करत आहे. यामुळे नियोजन होण्याची शक्यता आहे.
मोठी बातमी : नवीन कापसाला मिळाला चक्क एवढा भाव ?
यासाठी प्रशासन सज्ज झाले असून गेल्या हंगामात राज्यात विक्रमी उसाचे गाळप झाल्याने देशातील सर्वाधिक साखरेचे उत्पादन केले. इथेनॉल उत्पादनातही राज्य अव्वल आहे. अधिक इथेनॉलचे उत्पादन करण्याची परवानगी मिळावी, अशी मागणी साखर कारखाने करत आहेत. याचा अधिक फायदा होईल.
महत्त्वाच्या टिप्स : नारळाच्या व्यापारी शेतीसाठी ‘या’ आहेत महत्त्वाच्या 10 जाती !

https://www.facebook.com/shetimitramagazine03

https://www.instagram.com/shetimitra03/

https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1
आपणास ही बातमी आवडली असल्यास खालील स्टार क्लिक करून रेटींग करा
👇 👇 👇