गेल्या वर्षी अतिरिक्त उसाचा प्रश्न चांगलाच पेटला होता. राज्यातील विशेषत: मराठवाड्यातील गाळप हंगाम उशीरापर्यंत चालला होता. यंदाही अशीच परिस्थिती निर्माण होणार की काय अशी शक्यता निर्माण झाली आहे. कारण गेल्या वर्षीच्या तुलनेत देशातील ऊस लागवडीचे क्षेत्र यंदा 7 टक्क्यांनी वाढले आहे. उपग्रह प्रतिमांचा अंदाज, विविध साखर कारखान्यांच्या ऊस क्षेत्राच्या नोंदी आणि सध्या पडणारा पाऊस यांच्या एकत्रित अहवालानुसार ही शक्यता व्यक्त केली जात आहे.
लक्षवेधी बातमी : टोमॅटो खरेदी व्यवहारात 31 लाखांची फसवणूक
ऊस लागवडीचे क्षेत्र वाढल्यामुळे येणारा हंगाम हा जादा उसासह अतिरिक्त साखर उत्पादनाचा असेल अशी अपेक्षा आहे. गेल्या वर्षी देशात 55.83 लाख हेक्टर क्षेत्रावरील उसाचे गाळप झाले होते. यंदाच्या हंगामात 58.28 लाख हेक्टर क्षेत्रातील उसाचे गाळप होईल, असा अंदाज असून, यात अजून चार टक्के वाढ होण्याच शक्यता व्यक्त होत आहे. दरम्यान, इंडियन शुगर मिल्स असोसिएशनच्या (इस्मा) वतीने उपग्रह प्रतिमांचा अंदाज घेऊन येणाऱ्या गळीत हंगामाबाबत नियोजन केले आहे.
हे नक्की वाचा : गटारी म्हणजे नक्की काय ?
यंदाच्या ऊस गळीत हंगामात जुलैच्या मध्यापर्यंत 444 कोटी लिटर इथेनॉलचे करार करण्यात आले आहेत. यापैकी 362 कोटी लिटर इथेनॉल हे फक्त साखर उद्योगातून तयार झालेले आहे. 2022-23 या वर्षाकरिता 12 टक्के इथेनॉल मिश्रणाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून, यासाठी 545 कोटी लिटर इथेनॉलनिर्मिती होण्याची गरज आहे. इथेनॉलकडे वळल्यामुळे 45 लाख टन साखर कमी तयार होऊ शकते, असाही अंदाज व्यक्त होत आहे. इथेनॉलकडे जाणारी साखर वगळता येणाऱ्या वर्षात 355 लाख टन साखरेची निर्मिती होऊ शकेल आणि 275 लाख टन साखरेची देशांतर्गत विक्री होऊ शकेल, असा अंदाज आहे. हा अंदाज पाहता देशाला यंदा 80 लाख टन साखर कोणत्याही परिस्थितीत निर्यात करावीच लागेल तरच अतिरिक्त साखरेचा भार कमी होईल, असा अंदाज साखर उद्योगातील प्रतिनिधींनी व्यक्त केला आहे.
फायद्याच्या टिप्स : मका पिकावर लष्करी अळीचा हल्लाबोल !\
महाराष्ट्रात ऊस क्षेत्र 14.41 टक्के
गेल्या वर्षी उत्तर प्रदेशात 23.8 लाख हेक्टरवर उसाचे क्षेत्र होते. यंदा 23.72 लाख हेक्टर क्षेत्रावर ऊस आहे. महाराष्ट्रात गेल्या वर्षी 13.50 लाख हेक्टर क्षेत्रावर ऊस होता, यंदा त्यात वाढ होऊन उसाचे क्षेत्र 14.41 टक्क्यांवर पोहोचले आहे. कर्नाटकात 5.85 लाख हेक्टर क्षेत्रावर ऊस होता. यंदा हे क्षेत्र 6.25 पर्यंत गेले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत उत्तर प्रदेशात 3, महाराष्ट्र, कर्नाटकात 7, तमिळनाडूत 6, गुजरातमध्ये 5 तर अन्य राज्यांत उसाचे क्षेत्र 4 टक्क्यांनी वाढले आहे.
लक्षवेधी बातमी : 24 दिवसांच्या काळात 89 शेतकऱ्यांच्या आत्महत्या !
https://www.facebook.com/shetimitramagazine03
https://www.instagram.com/shetimitra03/
https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1