यंदा निसर्गाच्या लहरीपणाचा फटका मुख्य पिकांना बसला असून, सर्वच मुख्य पिकांच्या उत्पादनात मोठी घट झाली आहे. शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मात्र आतापर्यंत कलिंगडला विक्रमी दर मिळाला होता आता त्याचप्रमाणे लिंबाच्या दरातही वाढ झाली आहे. एकूणच यंदा उन्हाळी हंगामातील कलिंगड व लिंबू या दोन फळपिकांनी शेतकऱ्यांना तारले आहे.

यंदा अवकाळीची अवकृपा सर्वच पिकांवर राहिलेली आहे. यंदा शेतकऱ्यांनी नियोजन केले असले तरी निसर्गाच्या लहरीपणामुळे सर्व काही संपले होते. त्याचप्रमाणे लिंबू बागांचीही यामधून सुटका झालेली नाही. यंदा सर्व पिकावर निसर्गाच्या लहरीपणाचा परिणाम हा झालेलाच आहे.

हंगामाची सुरवात होण्यापूर्वी 20 ते 25 रुपये किलोवर असलेले लिंबू आता ठोक बाजारात थेट 125 रुपये किलोंवर पोहचले असून, परिस्थिती अशीच राहिल्यास लिंबू नगावर विकावे लागणार आहे. असे असले तरी या पिकावरही निसर्गाच्या लहरीपणाचा परिणाम हा झालेलाच आहे. खरीप हंगामातील पिकांप्रमाणेच उत्पादनात घट झाल्याने शेतीमालाचे दर आता वाढत आहेत. किमान त्यामुळे का होईना वाढीव दराचा फायदा शेतकऱ्यांना होऊ लागला आहे. उन्हाळ्यात लिंबाचे दर वाढतात पण यंदाची विक्रमी वाढ असल्याचे शेतकरी सांगत आहेत. आता मुख्य बाजारपेठांशिवाय स्थानिक पातळीवरही लिंबाची खरेदी होत असल्याने शेतकऱ्यांचा वाहतूकीचाही प्रश्न मिटलेला आहे. त्यामुळे जे मुख्य पिकांमधून साध्य झाले नाही ते यंदा हंगामी पिकातून शेतकऱ्यांच्या पदरी पडले आहे.
हे नक्की वाचा : यशस्वी लिंबू उत्पादक व्हायचेय ? समजून घ्या त्याचे तंत्रज्ञान
यंदा उन्हाळ्याच्या सुरवातीला ढगाळ वातावरणामुळे लिंबाच्या मागणीवर परिणाम होणार असेच चित्र होते. पण आता परस्थिती बदलली आहे. वाढत्या उन्हामुळे लिंबाच्या दरात वाढ होऊ लागली आहे. त्यामुळे 25 रुपये किलो असणारे लिंबू आज नगावर विकावे लागणार का अशी परस्थिती आहे. ठोक बाजारात 125 रुपये किलोचा दर मिळत असल्याने शेतकऱ्यांच्या उत्पन्नामध्ये वाढ झाली आहे. मध्यंतरीच्या वातावरणातील बदलामुळे लिंबाला काळे डाग असले तरी मागणीत वाढ झाल्याने असे डागाळलेल्या लिंबाला देखील मागणी कायम आहे.

हे वाचा : आंध्र प्रदेशानंतर महाराष्ट्रातील मिरची उत्पादक चिंतेत
उन्हाळ्यात लिंबू विकण्यासाठी शेतकऱ्यांकडून योग्य नियोजन केले जाते, त्यानुसारच लागवडही केली जाते यंदा शेतकऱ्यांनी नियोजन केले असले तरी निसर्गाच्या अनियमिततेमुळे सर्व काही बरबाद झाले आहे, स्थानिक शेतकऱ्यांकडे लिंबू नाही आणि व्यापाऱ्यांनाही लिंबू आयात करणे अवघड जात आहे. माल शिल्लक राहिला तर योग्य भाव मिळत नाही आणि विक्रमी भाव असताना माल नाही, अशी परस्थिती निर्माण झाली आहे. व्यापारी लिंबाची आयात करीत आहेत पण मर्यादित स्वरुपामध्ये. कारण अधिकची आवक करुन मागणी घटली तर अधिकचे नुकसान होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांबरोबर व्यापारीही दराला घेऊन सावध आहे. पण लिंबाचे वाढते दर पाहता उद्या शीतपेयाचेही दर वाढतील अशीच स्थिती निर्माण झाली आहे.
हेही वाचा : नक्कीच फायद्याचे ठरेल हे मिरची लागवड तंत्र

सध्या लिंबाला विक्रमी दर मिळत असला तरी यापूर्वीची स्थिती हा बिकट होती. अवकाळीची अवकृपा सर्वच पिकांवर राहिलेली आहे. त्याचप्रमाणे लिंबू बागांचीही यामधून सुटका झालेली नाही. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये हे चित्र एका रात्रीत बदलत आहे. त्याचप्रमाणे लिंबाच्या उत्पादनात फारसा फरक पडला नसून आता विक्रमी दर मिळत आहे हेच फायद्याचे ठरत आहे.

https://www.facebook.com/shetimitramagazine03

👇 https://www.instagram.com/shetimitra03/ 👇

https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1
👇 आपणास ही बातमी आवडली असल्यास खालील स्टार क्लिक करून रेटींग करा 👇