परभणीच्या दौऱ्यावर असलेले कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी ‘नुकसान झाले त्यांना भरीव मदत मिळणारच’ असे वचन कृषीमंत्री या नात्याने शेतकऱ्यांना दिले आहे. ज्या शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे, तो शेतकरी हा मदतीपासून वंचित राहाणार नाही. नुकसानभरापाईची घोषणा झाली आहे आता अंमलबजावणीही होणार असल्याचे सत्तार म्हणाले आहेत.
मोठा निर्णय : बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन केंद्राच्या अध्यक्षपदी खासदार हेमंत पाटील यांची वर्णी
अतिवृष्टी आणि सततच्या पावसामुळे खरीप हंगामातील पिकांचे तर नुकसान झालेच आहे पण बागायत क्षेत्र देखील बाधित झाले आहे. त्यानुसार पंचनामे पूर्ण झाले असून, आता प्रत्यक्ष नुकसानभरपाईला सुरवात होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी चिंता करु नये, असेही ते यावेळी बोलताना म्हणाले.
यंदा आर्थिक मदतीचे निकष बदलले गेले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना भरीव मदत मिळणार आहे. शिवाय पंचनामे आणि इतर प्रक्रिया पूर्ण झाली म्हणजे मदत ही दिली जाणारच आहे. शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा होण्यास विलंब होत असला तरी शेतकऱ्यांनी त्याबाबत चिंता करु नये असेही अब्दुल सत्तार म्हणाले.
मोठी बातमी : यंदा खरिपात 149.92 दशलक्ष टन अन्नधान्य उत्पादनाचा अंदाज
पंचनामे करताना काही चूक झाली का ? याची देखील तपासणी केली जाणार आहे. शिवाय केवळ अधिकारीच शेतकऱ्यांच्या बांधावर पोहचले असे नाही तर आपणही शेतकऱ्यांशी संवाद साधून नेमकी स्थिती काय आहे याचा आढावा घेणार असल्याचे अब्दुल सत्तार यांनी यावेळी सांगितले.
नुकसानभरपाईची मागणी शेतकऱ्यांनी केली म्हणजे, त्याची पूर्तता करणे ही सरकारची जबाबदारी आहे. यामध्ये कोणतीही तडजोड केली जाणार नाही. भलेही उशिर होत असला तरी हा मदत लवकरात लवकर देण्याचा आमचा प्रयत्न राहिल असेही कृषीमंत्री म्हणाले.
महत्त्वाची बातमी : धान व भरडधान्य खरेदी आराखड्यास केंद्राची मान्यता
https://www.facebook.com/shetimitramagazine03
https://www.instagram.com/shetimitra03/
https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1