राज्यात मान्सूनचा पाऊस दमदार बरसण्यास पोषक हवामान झाले आहे. भारतीय हवामान विभागाने आजपासून पुढील दोन दिवस महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. राजधानी मुंबईत सलग तिसऱ्या दिवशी मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. तर कोकण, घाटमाथ्यावर दमदार पाऊस कोसळत असून, धरण क्षेत्रातही पावसाला सुरूवात झाली आहे.
तीन दिवसात कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर विदर्भ आणि मराठवाड्यातही जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. मध्य प्रदेशातील कमी दाबाचे क्षेत्र, दक्षिणेकडे सरकलेला मान्सूनचा आस, अरबी समुद्रावरून वाहणारे जोरदार प्रवाह, कोकण किनाऱ्याला समांतर हवेचा कमी दाबाचा पट्टा यामुळे राज्यात मान्सूनचा पाऊस जोर धरणार आहे. कोकण, घाटमाथ्यावर दमदार पाऊस कोसळत असून, धरण क्षेत्रातही पावसाला सुरूवात झाली आहे.

अतिमहत्वाची बातमी : शेतकरी आत्महत्यामुक्त महाराष्ट्र करणार : मुख्यमंत्री
भारतीय हवामान विभागाचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा यांनी सांगितले की, गुजरात आणि महाराष्ट्र किनारपट्टीजवळ आणि पश्चिम मध्य प्रदेशात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे, त्यामुळे महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने दक्षिण कोकण, गोवा आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रासाठी 6 ते 8 जुलै दरम्यान ‘रेड अलर्ट’ जाहीर करण्यात आला आहे. काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार तर काही ठिकाणी अतिवृष्टी सारखा पाऊस पडण्याची शक्यता असल्याचे विभागाने म्हटले आहे.
ब्रेकिंग न्यूज : राज्याला नवा कृषीमंत्री मिळण्याची शक्यता
उत्तर ओडिशा, दक्षिण झारखंड आणि पश्चिम बंगाल राज्यात तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र, मंगळवारी मध्य प्रदेशकडे सरकले आहे. त्याला लागूनच समुद्रसपाटीपासून 5.8 किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत. मान्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा राजस्थानच्या जैसलमेरपासून कमी दाबाचे क्षेत्र ते पूर्व-मध्य बंगालच्या उपसागरापर्यंत समुद्र सपाटीपासून 1.5 किलोमीटर उंचीवर कायम आहे. गुजरातपासून महाराष्ट्राच्या किनारपट्टीला समांतर हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. बंगालच्या उपसागरात चक्राकार वाऱ्यांची स्थिती तयार झाली आहे.

हे नक्की वाचा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शेतीच्या कामाशी नाळ कायम
भारतीय हवामान विभागाने उत्तर कोकणासाठी ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला आहे. विभागाने उत्तर मध्य महाराष्ट्र, पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भात आज ‘यलो अलर्ट’ जारी केला होता आणि गुरुवार आणि शुक्रवारसाठी ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला आहे. मराठवाड्यात आजपासून पुढील दोन दिवस मुसळधार पावसासाठी ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. खाजगी हवामान अंदाज कंपनी स्कायमेटने म्हटले आहे की, सक्रिय मान्सूनची स्थिती पुढील 10 दिवस कायम राहील आणि गुरुवार आणि शुक्रवारी महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये अतिवृष्टी होऊ शकते, असा अंदाज वर्तवला आहे.
मोठी बातमी : आरएसएफ निश्चितीच्या कार्यपद्धतीत बदल
भारतीय हवामान विभागाने रायगड, रत्नागिरी, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यात अतिजोरदार पावसाचा इशारा (रेड अलर्ट) दिला आहे. पालघर, ठाणे, मुंबई, सिंधुदुर्ग, नाशिक, पुणे, चंद्रपूर या जिल्ह्यांना जोरदार पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट) दिला आहे. तर नंदूरबार, परभणी, हिंगोली, नांदेड, यवतमाळ, वर्धा, नागपूर, बुलडाणा, अकोला, वाशीम, अमरावती, भंडारा, गोंदिया, गडचिरोली या जिल्ह्यांना जोरदार पावसाचा इशारा (यलो अलर्ट) दिला आहे.
मान्सून अपडेट : राज्यात सरासरीपेक्षा उत्याल्प पाऊस

https://www.facebook.com/shetimitramagazine03

https://www.instagram.com/shetimitra03/

https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1