गरिबांची गाय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शेळ्यांच्या जातिवंत पैदाशीसाठी कृत्रिम रेतनाचा पर्याय फायदेशीर ठरणार आहे. यासाठी महाराष्ट्रात तीन हजार केंद्रे उघडण्यात येणार आहेत. राज्यातील पशुवैद्यकीय दवाखान्यांमध्ये ही सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. सध्या पुण्यश्लोक अहल्यादेवी होळकर शेळी व मेंढी महामंडळाच्या १० प्रक्षेत्रावर आनुवंशिक सुधारणा कार्यक्रम राबविला जात आहे. यामध्ये कृत्रिम रेतन केलेल्या शेळ्यांपैकी ६० टक्के शेळ्यांमध्ये गर्भधारणा झाली आहे.
महत्त्वाच्या बातम्या : शरद पवार यांनी दिला शेतकऱ्यांना सल्ला !
राज्यात अल्पभूधारक आणि भूमिहीन शेतकऱ्यांना शेळीपालन हा किफायतशीर पूरक व्यवसाय ठरला आहे. २०१९ च्या पशुगणनेनुसार राज्यात सुमारे १०६ लाख शेळ्या आणि मेंढ्या आहेत. यातील केवळ ३० टक्के जातिवंत शेळ्या आहेत. कुठल्याच जातीशी साधर्म्य नसलेल्या शेळ्यांमध्ये दूध आणि मांस गुणवत्ता वाढीसाठी आनुवंशिक सुधारणा कार्यक्रम राज्य सरकारने हाती घेतला आहे. हा देशातील पहिलाच उपक्रम असून, यासाठी पोहरा प्रक्षेत्रामध्ये कृत्रिम रेतन कार्यक्रम हाती घेण्यात आला. या प्रक्षेत्रावरील अधिकाऱ्यांना शेळ्यांच्या रेतनासाठी मथुरेतील दीनदयाल उपाध्याय पशुवैद्यकीय विद्यापीठ आणि मेंढ्यांच्या कृत्रीम रेतनासाठी राजस्थानातील अविकानगर येथील केंद्रीय मेंढी आणि लोकर संशोधन संस्थेमध्ये प्रशिक्षण देण्यात आले आहे.
ही वाचा मान्सूनची बातमी : तापमानात घट तर हवामान ढगाळ राहण्याची शक्यता
तीन जातींच्या रेतमात्रा उपलब्ध : सर्वसाधारणपणे शेळ्यांची गर्भधारणा ही स्थानिक जातीच्या बोकडापासून केली जाते. राज्यात असलेल्या ७० टक्के शेळ्या या एकावेळी ३०० मिलिपेक्षा जास्त दूध देत नाहीत. तसेच या शेळी आणि बोकडाचे वजन ३० ते ३५ किलोच्या पुढे जात नाही. ज्या शेळ्यांच्या जाती निश्चितपणे सांगता येत नाहीत, अशा शेळ्यांमध्ये आनुवंशिक सुधारणा कार्यक्रमांतर्गत उस्मानाबादी, जमनापारी आणि दमास्कसहून आयात केलेल्या रेतमात्रेद्वारे कृत्रीम रेतन करण्यात येणार आहे.
नक्की वाचा : कांद्याला मिळाला एक रुपये किलोचा दर ; कांदा उत्पादक अडचणीत
प्रयोगासाठी निवडलेली प्रक्षेत्र : पोहरा (जि. अमरावती), बोंद्री (जि. नागपूर), पडेगाव (जि. औरंगाबाद), तीर्थ (जि. उस्मानाबाद), अंबाजोगाई (बीड), मुखेड (जि. नांदेड), रांजणी (जि. सांगली), दहिवडी (जि. सातारा), महुदा (जि. सोलापूर), बिलाखेड (जि. जळगाव)
४८४८ दवाखान्यांत कृत्रिम रेतन होणार : राज्यात सध्या ४,८४८ पशुवैद्यकीय दवाखाने आहेत. या दवाखान्यांच्या (Hospital) माध्यमातून तीन हजार कृत्रिम रेतन केंद्रे उघडण्यात येणार आहेत. येथे शेळ्यांसाठी (Goat) कृत्रिम रेतनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
हे वाचा : महाबीजकडून सोयाबीन बियाण्यात फसवणूक ; बारामतीच्या शेतकऱ्यांना फटका
शेळी सखींना प्रशिक्षण : पुण्यश्लोक अहल्यादेवी होळकर शेळी व मेंढी महामंडळातर्फे महिलांसाठी ‘शेळी सखी’ हा उपक्रम आहे. या शेळी सखींना कृत्रीम रेतनाबाबत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. माणदेशी फाउंडेशन आणि प्रक्षेत्र व्यवस्थापकांकडून या महिलांना प्रशिक्षण देण्यात येते.
https://www.facebook.com/shetimitramagazine03
👇 https://www.instagram.com/shetimitra03/ 👇
https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1