महावितरणला कंटाळून अमरावती जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने आपल्या शेतातील 400 संत्र्यांच्या झाडावर कुऱ्हाड चालवल्याची घटना घडली आहे. आपल्या शेतात विद्युत पुरवठा सुरळीत व्हावा, यासाठी हा शेतकरी गेल्या काही दिवसांपासून महावितरणकडे तक्रारी करत होता. मात्र, त्याला न्याय न मिळाल्याने त्याने 400 संत्र्यांच्या झाडावर कुऱ्हाड चालवल्याचा निर्णय घेतला आहे.
महत्त्वाची बातमी : परभणीच्या कृषी विद्यापीठाच्या या तीन वाणास राष्ट्रीय मान्यता
एका बाजूला सरकार उत्पन्न वाढवा म्हणत असताना मात्र, महावितरण शेतीसाठी व्यवस्थीत वीज पुरवठा करत नसल्याचे या घटनेमुळे पुढे येत आहे. अमरावती जिल्ह्यातील अचलपूर तालुक्यातील जवळापूर येथील गणराज कडू असे या शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांनी वेळोवेळी महावितरणकडे वीज पुरवठ्याबाबत तक्रारी दिल्या आहेत. मात्र, त्यांच्या तक्रारीची कोणत्याही प्रकारची दखल घेतली गेली नाही. वीज नसल्यामुळे त्यांच्या संत्रा बागेसह हरभरा आणि कांदा पिकाला पाणी मिळाले नसल्याने त्यांनी महावितरणला कंटाळून आपल्या शेतातील 400 संत्र्यांच्या झाडावर कुऱ्हाड चालवली आहे. याला सर्वस्वी जबाबदार महावितरण आहे. म्हणून शासनाने महावितरणवर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी खुद्द गणराज कडू यांनी केली आहे.

अमरावती जिल्ह्यात गेल्या सहा ते सात वर्षापासून संत्राबागेमध्ये मोठ्या प्रमाणात फळगळती होत आहे. ही फळगळती जुलै, सप्टेंबर आणि ऑक्टोबर या तीन महिन्यात होते. चांदूरबाजार तालुक्यातील अनेक संत्रा उत्पादकांनी फळगळतीची समस्या कायमची सोडवण्यासाठी नागपूर येथील लिंबूवर्गीय फळ संशोधन केंद्राला भेट देऊन वारंवार निवेदने दिली. परंतु अद्यापपर्यंत कोणत्याही प्रकारचे संशोधन केले नसल्याने शेतकऱ्यांना सतत नुकसान सोसावे लागत आहे.
मोठी घोषणा : महिन्यात एफआरपीचे पैसे न दिल्यास कारखान्यावर कारवाई
त्यामुळे काही संत्रा उत्पादकांनी आपल्या शेतातील संत्रा बागेवर कुऱ्हाड चालवली होती. दुसरीकडे संत्र्यासाठी प्रसिद्ध असलेल्या नागपूर आणि अमरावती जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये शेतकरी सध्या छोट्या आकाराची संत्री फेकून देत आहेत. बांगलादेशने भारतातून त्यांच्या देशात आयात होणाऱ्या संत्र्यांवरील आयात शुल्क वाढवले आहे. त्यामुळे बांगलादेशात वैदर्भीय संत्री महाग होऊन त्यांचा पुरवठा कमालीचा घटला आहे.
मोठी बातमी : शेतकर्यांनो राज्य नको राज्यकर्ते बदला : रघुनाथदादा

https://www.facebook.com/shetimitramagazine03

https://www.instagram.com/shetimitra03/

https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1