एनएमके-1 गोल्डन सीताफळाची फळे जास्त घेण्यापेक्षा पैसे अधिक मिळवीण्यासाठी झाडाला कमी फळे ठेवावीत, असा सल्ला डॉ. नवनाथ कसपटे यांनी दिला. बार्शी (जि. सोलापूर) सीताफळ संशोधन केंद्र तथा मधुबन फार्म आणि नर्सरी येथे काल रविवारी (दि. 11) झालेल्या राष्ट्रीय प्रशिक्षण शिबीरात ते बोलत होते.
एनएमके-1 गोल्डन सीताफळ लागवडीची पध्दत; संगोपण, पोषण तंत्र या विषयावर हे प्रशिक्षण पार पडले. या प्रशिक्षणाला महाराष्ट्रासह कर्नाटक, तेलंगणा, मध्य प्रदेश, अंध्र प्रदेश आणि गुजराथ या राज्यातील सुमारे 90 प्रशिक्षणार्थी सीताफळ उत्पादक शेतकरी उपस्थित होते.
महत्त्वाची बातमी : स्वावलंबनासाठी शेतीसोबत जोडव्यवसायाचे ज्ञान आवश्यक : राज्यपाल
या प्रशिक्षण शिबीरात डॉ. कसपटे यांनी उपस्थित शेतकऱ्यांना एनएमके-1 गोल्डन सीताफळ लागवड पध्दत, छाटणी तंत्र, खत व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन, कीड-रोग नियंत्रण, विक्री व्यवस्थापन या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले.
एनएमके-1 गोल्डन सीताफळ उत्पादक शेतकऱ्यांनी प्रथम सीताफळ झाडाचा जीवनक्रम समजून घेणे गरजेचे असल्याचे सांगून डॉ. कसपटे म्हणाले, जानेवारी ते जून हा या झाडाचा विश्रांतीचा काळ आहे. या काळात सीताफळ बागेला अजिबात पाणी देवू नये. झाड तीन वर्षाचे झाल्यानंतर झाडाच्या खोडाला बोर्डोपेस्ट लावावी म्हणजे, कीड-रोगापासून झाडाचे संरक्षण होते, असे सांगीतले.
मोठी बातमी : राज्य साखर संघाच्या अध्यक्षपदी पी. आर. पाटील यांची वर्णी
पाण्याचा निचरा होणारी जमीन एनएम-1 गोल्डन सीताफळ लागवडीसाठी योग्य असल्याचे सांगून डॉ. कसपटे म्हणाले, 14 बाय 7 फूट अंतरावर लागवड केल्यास एकरी 444 रोपे बसतात. रोपांची प्रत्यक्ष जमिनीत लागवड करताना काळजी घ्यावी. खड्ड्यात खते भरताना ती मातीत चांगली मिक्स करुन घ्यावीत. खड्डा भरताना सुपर फॉस्फेट, शेणखत, काडीकचरा याचे मिश्रणाचा वापर करावा. खड्ड्यात रोप लावताना प्लास्टिक बॕग काडून रोप जमीन समांतर लावावे. रोप लावल्यानंतर खड्डा दोन पायाने दाबून घ्यावा, असे सांगितले.
सुरूवातीला तीन वर्षे रोपांना बेड करु नये असे सांगून डॉ. कसपटे म्हणाले, रोप लावण्या अगोदर कलम पट्टी काढून टाकावी. लागवडीनंतर येणाऱ्या प्रत्येक फांद्याचा प्रत्येक दोन फुटावर शेंडा मारावा. त्यामुळे झाडाला आकार येण्यास मदत होते. अंतरपीक म्हणून केवळ कमी उंचीची आणि कमी कालावधीचीच पीके घ्यावीत. माती परिक्षण करूनच शिफारशीनुसार रासायनिक खताच्या मात्रा देण्याचा सल्ला कसपटे यांनी यावेळी दिला.
फायद्याची माहिती : एनएमके-1 गोल्डन सीताफळ लागवडीचे तंत्र
सीताफळ शेतीतून अधिक, दर्जेदार आणि खात्रीशीर उत्पादन मिळविण्यासाठी जास्तीत जास्त शेणखताचा वापर करावा असे सांगून डॉ. कसपटे म्हणाले, चांगली जमीन असल्यास नायट्रोजन अजीबात देवू नये. लागवडीनंतर दोन वर्षानंतर पिन्सील आकाराच्या काड्या झाडाला राहातील या हिशोबाने छाटणी करावी. झाडाची उंची 10 फुटापर्यंत राहील याची काळजी घ्यावी. असे ते यावेळी म्हणाले.
यंदा सीताफळाचे दर निचांकी घसरण्यामागे एनएमके-1 गोल्डन सीताफळ रोपांची विक्री करणाऱ्या बोगस रोपवाटिका चालकांकडून रोपे विकत घेणाऱ्या शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन झाले नाही. परिणामी फळमाशीचा प्रादुर्भाव झाला. ग्राहकांमध्ये सीताफळ खरेदीबाबत नाखुशी निर्माण झाली. मागणी घटल्याने दर घसरले, असे सांगून डॉ. कसपटे यांनी फळमाशी नियंत्रणासाठी क्लोरोपायरीफाॕस आणि फेन्डॉल (प्रत्येकी 2 एमएल) प्रती लीटर पाण्यात घेवून स्टीकर टाकून आलटून पालटून फवारणी करावी. ही फवारणी फळकाढणी पूर्वी 15 दिवस आधी सुरू करुन आठ दिवसाच्या अंतराने फळेसंपेपर्यंत करावे, असे सांगीतले.
ब्रेकिंग : पुढील हंगामापासून उसाचा काटा होणार डिजिटल !
या प्रशिक्षणाला आलेले अपंग शेतकरी विठ्ठल काशिनाथ बागुल (नाशीक) यांचा सत्कार रवींद्र कसपटे यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच यावेळी डॉ. कसपटे यांच्या हस्ते एस अशोक रेड्डी (तेलंगणा), हितेंद्र पाटेदार (मध्य प्रदेश), बी. एस. इंडी (कर्नाटका), गौरीशंकर लंबटकर (महाराष्ट्र), विपुलभाई व्होरा (गुजराथ), फिरोज अमोद (अंध्र प्रदेश), लक्ष्मी राजकुमार (तेलंगणा) या एनएमके-1 सीताफळ उत्पादक शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
या प्रशिक्षणानंतर उपस्थित एनएमके-1 गोल्डन सीताफळ उत्पादक शेतकऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना डॉ. कसपटे यांनी सविस्तर उत्तरे दिली. यावेळी वेळापूर येथील सीताफळ उत्पादक शेतकरी नंदकुमार लंबटकर यांनी एमएनके-1 गोल्डन या सीताफळ वाणाबद्दल आपले मनोगत व्यक्त केले. हे प्रशिक्षण शिबीर यशस्वी करण्यासाठी माणिक हजारे, नितीन आरगडे, नवनाथ जगताप, आत्माराम बुरंगे यांनी परिश्रम घेतले. सीताफळाचे जास्त पैसे मिळवण्यासाठी झाडाला कमी फळे ठेवा : डॉ. कसपटे
लक्षवेधी : महावितरणला कंटाळून शेतकऱ्याची संत्रा बागेवर कुऱ्हाड
https://www.facebook.com/shetimitramagazine03
https://www.instagram.com/shetimitra03/
https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1