आज बैल पोळा, सर्जाराजाचा सण ! त्याचे कौतुक करण्याचा कृतज्ञता दिवस ! महाराष्ट्रात दरवर्षी पिठोरी अमावस्येच्या दिवशी बैल पोळा सण साजरा केला जातो. वर्षभर शेतात राबणाऱ्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा सण मोठ्या उत्साहाने साजरा करतात.
बैल पोळ्याच्या सणासाठी शेतकर्यांमध्ये उत्साह असतो. आपला बैल उठून दिसावा यासाठी शेतकरी आपल्या ऐपतीप्रमाणे त्याचा साजशृंगार खरेदी करतात. बैल सजवितात व पोळ्यात भाग घेतात. या दिवशी बैलांना उटणे आणि साबण लावून स्वच्छ आंघोळ घातली जाते. या दिवशी बैलांना शेतीतील कामांपासून आराम दिला जातो आणि त्यांची पूजा केली जाते.
हे नक्की वाचा : आजपासून पुन्हा या जिल्ह्यात पावसाची शक्यता
सर्जाराजाच्या शिंगाना रंग लावून त्यावर विविध रंगाचे बेगड बसविले जाते, डोक्याला बाशिंग बांधले जाते. विविध रंगांनी त्यांना सजवले जाते. सर्वांगावर गेरूचे ठिपके दिले जातात. या दिवशी बैलांच्या पाठीवर सुरेख नक्षीकाम आकर्षक झुली घालून. गळ्यात घुंगराच्या कवड्या व घुंगुरांच्या चंगल्या बांधल्या जातात. या दिवशी त्याला नवी वेसण, नवा कासरा, पायात चांदीचे वा करदोड्याचे तोडे अशा प्रकारे वस्त्र आणि दागदागिने घालून त्यांची पूजा केली जाते. शेतकऱ्यासोबत वर्षभर शेतीची धुरा वाहणाऱ्या बैलांला पोळ्याच्या दिवशी विशेष मान दिला जातो. या दिवशी बैलाचे खांदे तुप आणि हळद लावून खंदेमळणी केली जाते. आणि बैलांना पुरणपोळीचा नैवेद्य दिला जातो.
आजच्या आधीनिक आणि यांत्रीकरणाच्या युगातही शेती हा व्यवसाय मोठ्या प्रमाणात बैलांवर अवलंबून आहे. वर्षभर शेतात राबणाऱ्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी बैल पोळा हा सण साजरा केला जातो. ग्रामीण भागातील लोक मोठ्या प्रमाणात पोळा साजरा करतात. या दिवशी सर्व बैलजोड्यांना सजवून त्यांची पूजा करून त्याची मिरवणूक काढली जाते. गावातल्या सर्व बैलजोड्या वाजंत्री, सनया, ढोल, ताशे वाजवत एकत्र येतात. या वेळेस ‘झडत्या’ म्हणजेच पोळ्याची गीते म्हणायची पद्धत आहे. त्यानंतर मानकर्यांतर्फे (मानवाईक) तोरण तोडले जाते व पोळा फुटतो. नंतर बैल गावच्या वेशीवरील मारुतीच्या देवळात नेण्यात येतात. त्यानंतर त्यांना घरी नेऊन ओवाळण्यात येते. बैल नेणार्यास पैसे (बोजारा) बक्षीस म्हणून देण्यात येतात. ज्यांच्याकडे बैल नाहीत ते लोक घरात मातीच्या बैलांची पूजा करून हा सण साजरा करतात. या दिवशी बैलांना खाण्यासाठी पुरणपोळीसोबत इतर अनेक वेगवेगळे पदार्थ बनवले जातात.
मोठी बातमी : कृषी सहायकांच्या रिक्त पदांमुळे कृषी खात्याचा कारभार खिळखिळा : 1757 पदे रिक्त
बैल पोळा हा सण प्रामुख्याने महाराष्ट्रात साजरा केला जातो. महाराष्ट्रातील ग्रामीण भागात मराठी लोकांमध्ये प्रामुख्याने हा सण साजरा केला जातो. विदर्भाच्या सीमेवरील मध्य प्रदेश आणि तेलंगण सीमा भागात देखील पोळा साजरा केला जातो. तेलंगणाच्या उत्तरेकडे भागात बैलपोळा सणाला पुलाला अमावस्या म्हणतात, तर काही ठिकाणी याला बेंदूर देखील म्हटले जाते. याशिवाय छत्तीसगडमधील शेतकरी वर्ग देखील हा सण साजरा करतात. दक्षिणेत या सणाला पोंगल आणि उत्तर व पश्चिम भारतात गोधन असे म्हटले जाते. भारतात इतरही काही भागात पोळा सण वेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो.
आपल्या पौराणिक कथेनुसार कृष्णाचे मामा कंसने कृष्णाचे प्राण घेण्यासाठी प्रयत्न सुरू केले. एकदा कंसाने कृष्णाचा वध करण्यासाठी पोलासूर नावाचा राक्षस पाठवला होता. तेव्हा कृष्णाने त्याचा वध केला. तो दिवस श्रावण अमावास्येचा होता. या दिवशी पोळा सण साजरा करण्यात येतो.
महत्त्वाची बातमी : गव्हाच्या किंमतीत वाढ : अजून वाढ होणार ?
https://www.facebook.com/shetimitramagazine03
https://www.instagram.com/shetimitra03/
https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1