उष्णतेचा तडक्यामुळे उत्पादनात होत चाललेली घट आणि त्यात लांबलेला पाऊस यामुळे सध्या सर्वच पालेभाज्यांचे दर गगनाला भिडले आहेत. त्यामध्ये टोमाटोच्या दरात उच्चांकी वाढ झाली आहे. सध्या टोमॅटोचा किरकोळ भाव 120 रुपये किलोवर पोहोचला आहे.
नवी योजना : शेतकऱ्यांसाठी पीएम-प्रणाम योजनेची घोषणा
मे महिन्यात टोमॅटोचे दर घाऊक बाजारात 3 रुपये किलो आणि किरकोळ बाजारात 10 ते 20 रुपये किलो होते. मात्र जूनमध्ये त्यात अचानक वाढ झाली आहे. अचानक वाढलेली उष्णता, घटत चाललेली उत्पादकता आणि लांबलेला पाऊस यामुळे टोमाटोला पोषक वातावरण नव्हते. यामुळे टोमाटोचे उत्पादन कमी आले. त्यामुळे टोमाटोचे भाव वधारले आहेत.
सध्या टोमाटोचे दर 100 रुपयांच्या वर गेले आहेत. लवकर पाऊस न पडल्याने हा परिणाम झाला आहे. टोमॅटोचे भाव गेल्या आठवड्यात तिपटीने वाढले आहेत. हरियाणा आणि उत्तर प्रदेशातून टोमॅटोचा पुरवठा कमी असल्याने बेंगळुरू येथून टोमॅटोची आवक होत आहे. ती आवक थांबल्याने दर अचानक वाढले आहेत.

नुकत्याच झालेल्या पावसाने टोमॅटो पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी तारांच्या आधारे झाडे उभारत आहेत. टोमॅटो घेण्यासाठी दिल्लीचे व्यापारी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांशी बोलत आहेत. सध्या महाराष्ट्रात देखील जवळपास असेच दर आहेत. भविष्यातही भाव चढेच राहतील, अशी शक्यता व्यापाऱ्यांकडून व्यक्त होत आहे. नवीन पीक आल्यावर भाव खाली येण्याची अपेक्षा आहे.
आनंदाची बातमी : नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पाच्या दुसरा टप्प्याला मान्यता

https://www.facebook.com/shetimitramagazine03