भांडवली पीक म्हणून ओळखले जाणाऱ्या टोमॅटो पिकाचा सध्या राडा झाला असून, टोमॅटोचे भाव निचांकी घसरले आहेत. सध्या ठोक बाजारात टोमॅटोचे दर 50 ते 100 रुपये कॅरेटवर आले असून, किरकोळ बाजारात 20 रुपये किलोवर आले आहेत. यंदाच्या वर्षातील हा सर्वात कमी भाव असून, उत्पादन खर्च आणि विक्री याचा मेळ बसत नसल्याचे टोमॅटो उत्पादकांची चिंता वरचेवर वाढत आहे.
हे नक्की वाचा : लाल मिरची ठसका वाढला : दरात विक्रमी वाढ
अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. त्यानंतर राहिलेल्या भाज्यांना चांगले दर मिळत होते. टोमॅटोला देखील चांगले दर मिळत होते. मात्र आता हे दर निचांकी घसरले आहेत. यामुळे आता केलेला खर्च देखील निघत नाही. सध्या बाजारभाव टोमॅटोचे दर 50 ते 100 रुपये कॅरेट असा आहे. यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे. टोमॅटोच्या बाजारभावात कमालीची घसरण झाली आहे. यामुळे शेतकरी पुरता हवालदिल झाला असून, उत्पादन खर्च सुटत नसल्याने शेतकऱ्याच्या चिंतेत आणखी भर पडत आहे.

मुंबई मार्केट मधून टोमॅटो गुजरात, दिल्ली, जयपूर, अहमदाबाद, बंगलोर आदी ठिकाणी जातो. सध्या या बाजारपेठेमध्ये स्थानिक टोमॅटोची आवक वाढली. यामुळे दरात घसरण झाली आहे. याचा फटका राज्यातील शेतकऱ्यांना होत आहे. दरम्यान, नाशिक बाजार समितीच्या पेठ रोडवरील शरदचंद्रजी मार्केट यार्डात नाशिक, निफाड, सिन्नर, दिंडोरी, संगमनेर आदी भागातून टोमॅटोची आवक होत असते. नाशिक परिसरात मोठ्या प्रमाणावर टोमॅटो उत्पादक शेतकरी आहेत. सर्वसाधारण ऑगस्ट महिन्यात टोमॅटोची आवक सुरू झाली.
मोठी बातमी : टाटा पॉवर उभारणार सोलापुरात सौर ऊर्जा प्रकल्प
सुरवातीस सर्वसाधारण दोनशे ते साडेतीनशे रुपये बाजारभाव मिळत होता. मागील महिन्यात टोमॅटोला 80 ते 100 रुपये किलो इतका भाव मिळत होता. सप्टेंबर महिन्यात बाजारभाव चारशे ते पाचशे रुपये होता. ऑक्टोबर महिन्यात हेच दर 1000 रुपयांपर्यंत गेले होते. टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना दोन पैसे चांगले मिळत असल्याने समाधानाचे वातावरण निर्माण झाले होते. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. त्यात काही ठिकाणी तर टोमॅटोचा शेतातच लाल चिखल झाल्याचे बघायला मिळत होते. दिवाळीनंतर चांगला भाव मिळेल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती मात्र तसे न होता शेतकऱ्यांचा पदरी निराशा पडली आहे.

नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बाजार समिती, नाशिक बाजार समिती, गिरणारे बाजार समितीमध्ये सर्वाधिक टोमॅटो उत्पादक शेतकरी येत असतात. टोमॅटोसाठी या तीन बाजारसमित्या असल्याने येथे मोठ्या प्रमाणात टोमॅटोची आवक होत असते, त्यामुळे व्यापारी देखील मोठ्या प्रमाणावर येत असतात. बाजार समितीत टोमॅटोची मोठ्या प्रमाणात आवक झाल्याने टोमॅटोच्या दरात मोठी घसरण होऊ लागली आहे. 80 ते 100 रुपयांवरून भाव थेट 20 ते 30 रुपयांवर येऊन ठेपले आहे.
ब्रेकिंग : पेट्रोल डिझेल स्वस्त होण्याची शक्यता..?

https://www.facebook.com/shetimitramagazine03

https://www.instagram.com/shetimitra03/
