शासनातर्फे देण्यात येणाऱ्या कृषी पुरस्कारांसाठी यावर्षीसाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन कृषी विभागाने केले असून, प्रस्ताव सादर करण्यासाठी उद्या शेवटचा दिवस आहे. तरी तातडीने कृषी पुरस्कारासाठीचा आपला परीपूर्ण प्रस्ताव शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या नजीकच्या कार्यालयात सादर कराव असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
ब्रेकिंग : आठवड्याला कृषीमंत्री येणार शेतकऱ्यांच्या बांधावर

प्रतीवर्षी महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत शेती आणि पूरक क्षेत्रात अतिउल्लेखनिय कार्य करणाऱ्या शेतकऱ्यांना किंवा संस्थांना पुरस्कार देऊन सन्मानित केले जाते. यावर्षी देखील कृषी विभागाच्या वतीने शेतकऱ्यांचा सन्मान केला जाणार आहे. या पार्श्वभूमीवर यावर्षी देण्यात येणाऱ्या विविध पुरस्कारांसाठी कृषी विभागाकडून प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. या कृषी पुरस्कारांसाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना करण्यात आले असून, कृषी पुरस्कारासाठीचा आपला परीपूर्ण प्रस्ताव कृषी विभागाच्या नजीकच्या कार्यालयात 20 ऑगस्टपर्यंत सादर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
ब्रेकिंग न्यूज : विरोधक करणार ओल्या दुष्काळाची प्रमुख मागणी
कृषी विभागातर्फे दरवर्षी डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न पुरस्कार ( 75 हजार रुपये), वसंतराव नाईक कृषिभूषण पुरस्कार (आठ कृषी विभागांतून प्रत्येकी एक, प्रत्येकी 50 हजार रुपये), जिजामाता कृषिभूषण पुरस्कार (आठ कृषी विभागांतून प्रत्येकी एक, 50 हजार रुपये), कृषिभूषण (सेंद्रिय शेती) पुरस्कार (आठ कृषी विभागांतून प्रत्येकी एक, प्रत्येकी 50 हजार रुपये), युवा शेतकरी पुरस्कार (आठ कृषी विभागांतून प्रत्येकी एक, प्रत्येकी 30 हजार रुपये), वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार (आठ कृषी विभागांतून प्रत्येकी एक, प्रत्येकी 30 हजार रुपये), उद्यान पंडीत पुरस्कार (आठ कृषी विभागांतून प्रत्येकी एक, प्रत्येकी 25 हजार रुपये), सर्वसाधारण गटासाठी प्रती जिल्हा याप्रमाणे 34 आणि आदिवासी गटासाठी प्रती विभाग 1 याप्रमाणे 6 असे एकूण 40 वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार (प्रत्येकी 11 हजार रुपये) तर आठ कृषी विभागातून प्रत्येकी 1 अधिकारी आणि कर्मचारी याप्रमाणे 8 तसेच कृषी आयुक्तालय स्तरावरुन एक असे एकूण 9 पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी सेवारत्न पुरस्कार दिले जातात.
या कृषी पुरस्कारासाठीचा आपला परीपूर्ण प्रस्ताव कृषी विभागाच्या नजीकच्या कार्यालयात 20 ऑगस्टपर्यंत सादर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
महत्त्वाची माहिती : का आहे सोलापूर लाल डाळींब नंबर 1

https://www.facebook.com/shetimitramagazine03

https://www.instagram.com/shetimitra03/

https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1