मासे हे भारतातील अनेक भागातील लोकप्रिय खाद्य आहे. लुधियाना येथील एका संस्थेने केलेल्या नव्या आधुनिक यंत्रणेमुळे आता जिवंत माशाची वाहतूक करणे सोयीचे होणार आहे. त्यामुळे आता मासे खाणार्यांना ताजे विशेषत: जिवंत मासे मिळणार आहेत. एकूणच या नव्या लाईव्ह फिश कॅरियर यंत्रणेमुळे मत्स्यपालन उद्योगाला चांगलाच हातभार लागणार आहे.
आधुनिक युगात शेती क्षेत्रात नवनवीन तंत्राचा अवलंब होत असून, शेतीला समृद्ध करण्यासाठी नवनवीन शोधही लागत आहेत. अशा अनेक वैज्ञानीक संशोधनामुळे शेतीचा विकास होत असताना आपणास दिसत आहे. शेतीला हातभार लावणार्या शेतीपूरक उद्योगातही अनेक क्रांतीकारक बदल होत आहेत. असाच एक नवीन शोध लुधियाना येथील सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ पोस्ट हार्वेस्ट इंजिनिअरिंग अॅँन्ड टेक्नॉलॉजी या संस्थेने लावला आहे. त्यांनी तयार केलेल्या नव्या ‘लाईव्ह फिश कॅरियर’ या यंत्रणेमुळे आता जिवंत माशांची वाहतूक करणे सोयीचे होणार आहे. यामुळे मत्स्यपालन व्यावसाला चांगलाचा फायदा होणार आहे.
भारतात अनेक भागात मासे खाल्ले जातात. मात्र ग्राहकांना ताजा मासा सहसा मिळत नाही. ग्राहकांपर्यंत येईपर्यंत मासे मेलेले असतात. त्यामुळे ग्राहकाचे समाधान होत नाही आणि मासे विकणार्यांना त्यांची हवी ती किंमतही मिळत नाही. मत्स्य व्यावसायातील ही कमतरता भरून काढण्यासाठी लुधियाना येथील सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ पोस्ट हार्वेस्ट इंजिनिअरिंग अन्ड टेक्नॉलॉजी या संस्थेने यावर पर्याय म्हणून ‘लाईव्ह फिश कॅरियर’ ही यंत्रणा तयार केली असून, याद्वारे ग्राहकांपर्यंत जिवंत मासे पोहचविण्याची सोय केली आहे.
लाईव्ह फिश कॅरियर ही आधुनिक यंत्रणा ई-रिक्षावर बसविण्यात आली आहे. डीसी पॉवरवर ही यंत्रणा चालते. यामध्ये चार बॅटरीचा उपयोग करण्यात आला आहे. ही यंत्रणा एकदा चार्जिंग केली की, 500 किलो वजन 80 किलो मिटर अंतरापर्यंत जावू शकतात. यामध्ये मोकळी हवा (वेंटिलेशन), जलशुद्धीकरण (फिल्टरेशन) आणि अमोनिया याशिवाय इतर अनेक सुविधा उपलब्ध आहेत. या यंत्रणेची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, यामध्ये गोड्या व खार्या पाण्यातील जिवंत माशाची वाहातूक याद्वारे करता येवू शकते. एकाचवेळी सुमारे 100 किलो जिवंत माशांची वाहतूक करता येवू शकते. विशेषत: याची क्षमता वाढविल्यानंतर 100 किलो पेक्षा जास्त माशाची वाहतूक करणेही सोयीचे होणार आहे. सर्वसाधारण बाजारात याचा मासे वाहतूकीसाठी वापर करण्याबरोबरच मत्स्यव्यावसायातही याचा मोठ्या प्रमाणात वापर करता येवू शकतो. या यंत्रणेत पाण्याची चांगलीच बचत होते. पारंपरिक पद्धतीपेक्षा 50 टक्के पाण्याची बचत होते. विशेषत: ही यंत्रणा सहजरित्या वापरण्या योग्य आहे. या संपूर्ण यंत्रणेची किंमत 2 लाख रुपयांपर्यंत असून, याचा वापर केल्यामुळे जिवंत माशांना ग्राहकांकडून चांगली किंमत सुद्धा मिळणार आहे.
https://www.facebook.com/shetimitramagazine03
आपणास ही बातमी आवडली असल्यास खालील स्टार क्लिक करून रेटींग करा