Bail Pola : खरे हे आहे बैल पोळ्याचे महत्व !

0
295

Bail Pola : आज बैल पोळा बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा हा एक मराठी सण (Marathi Festival). महाराष्ट्रासह, विदर्भातील सीमेवर असलेल्या मध्य प्रदेश व तेलंगण सीमाभागात सुद्धा हा सण साजरा होतो. यंदा पोळा सणावर दुष्काळाचे सवट दिसून येत आहे.

मोठी बातमी : खते महागणार ?, शेतकऱ्यांचा खर्च वाढणार !       

प्रतीवर्षी श्रावण अमावस्या दिवशी बैल पोळा (Bail Pola) सण साजरा केला जातो. या दिवसाला पिठोरी अमावस्या (Pithori Amavasya) देखील म्हणतात. पोळ्याच्या दिवशी वर्षभर शेतात राबणाऱ्या बैलाला नांगरापासून (plough) आणि शेतीपासून आराम (Relief) दिला जातो. बैलांप्रती कृतज्ञता (Gratitude Bullocks) व्यक्त करणारा हा एक मराठी सण आहे.

भारत देश हा कृषीप्रधान देश (Agrarian country) असून, कृषी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात यांत्रिकीकरण (Mechanization) झाले असले तरी बैल पोळ्याचे महत्व अजूनही कमी झालेले नाही. शेतकर्‍यासोबत वर्षभर शेतात राबणार्‍या बैलांचा एकमेव सण पोळा श्रावण महिन्यात पिठोरी अमावस्येच्या दिवशी प्रतीवर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. मात्र यंदा पावसा अभावी म्हणावा असा उत्साह दिसून येत नाही.

मेहणतीचे प्रतिक (Symbol of hard work) असलेल्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पोळा सण घराघरात साजरा केला जातो. ज्यांचेकडे शेती नाही ते मातीच्या बैलाची पूजा करतात. यंदा मातीच्या बैलंच्या किमतीही वाढल्या आहेत.

शेतकऱ्यांच्या दृष्टीनं बैल पोळ्याला विशेष महत्व आहे. बैल हे वर्षभर शेतात राबतात. शेतकऱ्यांना बैलांची साथ असते. म्हणून बैलाला शेतकरी जिवलग मित्र (Best friend) समजतात. बैल हा शेतकऱ्यांच्या आयुष्याशी जोडलेला घटकच होता. त्याच्याप्रती कृतज्ञता (Gratitude) व्यक्त करण्यासाठी हा सण साजरा केला जातो. बैलपोळा हा बैलांच्या सन्मानाचा सण आहे. महाराष्ट्राच्या काही भागात हा सण दोन दिवस साजरा केला जातो. बैलपोळा म्हणजेच पहिल्या दिवसाला मोठा पोळा (Large Pola) आणि दुसर्‍या दिवसाला लहान मुले लाकडाचे नंदीबैल (Nandibail) सजवितात याला तान्हा पोळा (Young Pola) म्हणून साजरा केला जातो.

चिंताजनक : पाऊस गायब…पिकांवर रोगराई… शेतकऱ्यांची चिंता वाढली

बैल पोळा सणाच्या आदल्या दिवशी बैलांना आवतण देण्यात येते. ओढा वा नदीवर नेऊन त्यांना आंघोळ घालतात. तर बैल पोळ्याच्या दिवशी बैलाच्या खांद्याला हळद आणि तुपाने शेकतात. त्यांच्या पाठीवर नक्षीकाम केलेली झूल (Carved swing), सर्वांगावर गेरुचे ठिपके, शिंगांना बेगड (Begad on the horns), डोक्याला बाशिंग (Bashing), गळ्यात कवड्या आणि घुंगरांच्या (bells) माळा, नवी वेसण (vesan), नवा कासरा (kasra) पायात चांदीचे वा करदोड्याचे तोडे घालतात. गोड पुरणपोळी आणि सुग्रास अन्नाचा (sugras food) नैवेद्य बैलांना दाखवला जातो.

प्रत्येक शेतकरी आपल्या ऐपतीप्रमाणे शेतकरी बैलांचा साजशृंगार करतात. बैल सजवतात, त्यांची मिरवणुकीत काढली जाते. या दिवशी महाराष्ट्रातील खेड्यांमधल्या प्रत्येक घराला आंब्याच्या पानांचे तोरण बांधले जाते. गावातल्या सर्व बैलजोड्या, वाजंत्री, सनई, ढोल, ताशे वाजवत एकत्र आणल्या जातात. अनेक गावांमध्ये पोळ्याला शर्यतींचे आयोजन करण्यात येते.

पौराणिक कथेनुसार (mythology) प्रभू विष्णू (Lord Vishnu) हे कृष्णाच्या रुपात धर्तीवर अवतरले होते, तेव्हापासून कृष्णाचे मामा कंसने कृष्णाचे प्राण घेण्यासाठी प्रयत्न सुरू केले. एकदा कंसाने (Kansa) कृष्णाचा वध करण्यासाठी पोलासूर (Polasur) नावाचा राक्षस पाठवला होता. तेव्हा कृष्णाने त्याचा वध केला. तो दिवस श्रावण अमावास्येचा होता. या दिवशी पोळा सण साजरा करण्यात येतो.

ब्रेकिंग न्यूज : आता साखरेवर येणार निर्यातबंदी ?

https://www.facebook.com/shetimitramagazine03

आपणास ही बातमी आवडली असल्यास खालील स्टार क्लिक करून रेटींग करा

👇 👇 👇

Click to rate this post!
[Total: 0 Average: 0]

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here