खरीपातील सध्या शेतात उभे असलेल्या तूर या पिकावर शेतकर्यांची मोठी भिस्त असताना मात्र हवामान बदलामुळे तूर पिकाला धोका वाढला आहे. सध्या तूर हे पीक शेंगा भरण्याच्या अवस्थेत आहे. काही भागात नुकत्याच झालेल्या पावसामुळे तर काही ठिकाणी ढगाळ वातारणामुळे तूरीवर मर, मारूका यासारख्या अळीचा प्रादुर्भाव वाढला आहे. विशेषत: मराठवाड्यातील तूर पीक धोक्याच्या पातळीवर आहे.
खरीप हंगामात सोयाबीनचे पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. तर तूर ऐन बहरात असल्याने या पिकाला पावसाचा फटका बसलेला नव्हता. त्यामुळे या पिकातून शेतकऱ्यांना वाढीव उत्पादनाची अपेक्षा आहे. मात्र, बदलेल्या वातावरणामुळे रोगराईचा प्रादुर्भाव होत असून तूर ही जागेवरच वाळून जात आहे. हे पिक जोपासण्यासाठी शेतकऱ्यांनी हजारो रुपये खर्ची केले आहेत पण आता निसर्गाच्या लहरीपणाचा फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे.
काय आहे धोका ? : वातावरणातील बदलामुळे तुरीवर पाने गुंडाळणारी अळी आदी संकट बाल्यावस्थेत आहे. आता ढगाळ वातावरणामुळे फूलगळ, शेंगा पोखरणारी अळी, शेंगमाशी आदीचा प्रादूर्भाव होण्याची शक्यता राष्ट्रीय कृषी संशोधन केंद्र, कृषी विज्ञान केंद्र औरंगाबाद व जालनाच्या तज्ज्ञांनी व्यक्त केली. अळीचा तुरळक प्रादूर्भाव दिसत असला तरी निरीक्षण कायम ठेवावे. ढगाळ वातावरण व पावसाचा आणखी काही दिवस अंदाज आहे. त्यामुळे अंतिम टप्प्यात असलेल्या या पिकावर देखील किडीचा प्रादुर्भाव जाणवत असल्याने उत्पादनात घट होण्याचा धोका आहे.
तूर धोक्याच्या पातळीवर : पश्चिम महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात तुरीची पेर झाली आहे. त्याच बरोबर मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत तुरीच्या सरासरी 4 लाख 97 हजार 599 हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत 4 लाख 91 हजार 485 हेक्टरवर पेरणी झाली. मध्यंतरीच्या अतिवृष्टीचा सर्वाधिक परिणाम हा सोयाबीन पिकावर झाला होता. त्या दरम्यान, तूर हे पिक बहरात होते. त्यामुळे याला अधिकचा धोका झाला नाही पण आता अंतिम टप्प्यात असताना वाढत्या किडीच्या प्रादुर्भाव निर्माण झाला आहे. मात्र, तूर पिक हे शेंग पोसण्याच्या अवस्थेत आहे. ढगाळ वातावरण असेत कायम राहिले तर धोका वाढू शकतो. एकूणच सध्या तूर हे पीक धोक्याच्या पातळीत आहे.
हेही वाचा :
बक्कळ उत्पादनासाठी, हे वापरा तूर लागवडीचे सुधारित तंत्र
हरभरा लागवड केलीय ? मग; असे करा व्यवस्थापन
असे करा हरभर्यावरील घाटेअळीचे नियंत्रण
असे करा व्यवस्थापन : मारुका अळीच्या व्यवस्थापनासाठी जिथे तूर पीक फुलोरा व शेंगा भरण्याच्या अवस्थेत आहेत. तेथे सर्वेक्षण करून शेतात 20 ते 25 ठिकाणी प्रती मीटर ओळीच्या अंतरात दिसून आल्यास किटकनाशकांची फवारणी करावी लागणार आहे. फ्लूबेंडामाइड 20 डब्ल्यूजी 6 ग्रॅम किंवा थायोडीकार्ब 75 डब्ल्यू.पी 20 ग्रॅम किंवा नोवलुरोन 5.25 इंडोक्झाकार्ब 4.50 एससी 16 मिली यापैकी कोणत्याही एका कीटकनाशकाची प्रती 10 लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. ही फवारणी पॉवरस्प्रेने करावी. दुसरऱ्या फवारणीच्या वेळेस कीटकनाशकाची मात्रा ही तिप्पट करावी. गरज भासल्यास पुन्हा 15 दिवसांनी दुसरी फवारणी करावी. दुसऱ्या फवारणीच्या वेळेस कीटकनाशकांची अदलाबदल करावी. उपरोक्त किटकनाशकांसोबत इतर कीटकणशके, बुरशीनाशके, संप्रेरके, खते, अन्नद्रव्ये इत्यादी मिसळू नयेत.
https://www.facebook.com/shetimitramagazine03
आपणास ही बातमी आवडली असल्यास खालील स्टार क्लिक करून रेटींग करा