हिंगोली येथे मा. बाळासाहेब ठाकरे हरिद्रा (हळद) संशोधन व प्रशिक्षण केंद्राच्या वतीने आणि महाराष्ट्र शासन कृषी विभाग, आत्मा यांच्या सहकार्याने उद्या दि. 25 ते 28 मार्च दरम्यान रामलिला मैदानावर मा. बाळासाहेब ठाकरे हळद महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन खासदार हेमंत पाटील यांनी केले आहे.
चर्चेचा विषय : कृषीमंत्र्यांचा नुकसानग्रस्त पाहाणी दौरा अंधारात
जिल्हा कृषी महोत्सवाच्या अनुषंगाने होणाऱ्या हळद महोत्सवात हळद उत्पादनात माहिती प्रसार तंत्रज्ञानाचा वापर, हळद काढणी पश्चात हाताळणी प्रक्रिया व मूल्य संवर्धन, हळद विपणन, पॅकिंग, लेबलिंग, ब्रँडिंग, सेंद्रिय हळद लागवड, अन्न प्रक्रिया उद्योगांकरिता मार्गदर्शनासह विविध योजना बाबत मार्गदर्शन हळद तसेच इतर प्रक्रियायुक्त शेतमाल पदार्थांचे प्रदर्शन व विक्री खरेदीदार – विक्रेता संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.

यासोबतच महोत्सवात प्रगतशील शेतकऱ्यांचे मनोगत आणि परिसंवाद होणार आहे. विशेषत: कृषी विद्यापीठ व कृषी विज्ञान केंद्र यांचा सहभाग या महोत्सवात असणार आहे. तसेच यावेळी पीक संरक्षण उपकरणे तसेच अन्न प्रक्रिया करिता आवश्यक मशिनरीचे प्रदर्शनही यावेळी ठेवण्यात येणार आहे. या हळद महोत्सवात शेतकऱ्यांचे गट व शेतकरी उत्पादक संस्था तसेच खासगी कंपन्यांचा सहभाग असणार आहे.
हे वाचा : द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची धाकधूक वाढली

https://www.facebook.com/shetimitramagazine03

https://www.instagram.com/shetimitra03/

https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1