Turmeric Market price : भारत (India) हा जगातील सर्वात मोठा हळदीचा उत्पादक देश असून, सध्या देशातील घटलेले उत्पादन आणि वाढलेली निर्यात (Exports) यामुळे बाजारात मोठी तेजी आली आहे. हळदीचे भाव (Turmeric Prices) एकाच महिन्यात जवळपास दुप्पट झाले आहेत. यंदा हळदीच्या लागवडीत घट झाल्याने हळदीच्या भावातील तेजी पुढील काळातही टिकून राहू शकते, असे अंदाज आहे.
नक्की वाचा : असे करा हळद पिकवरिल किड व रोग नियंत्रण
हळदीचा बाजार (Turmeric Market) गेली दोन वर्षे मंदीत होता. कोरोना काळात भाव वाढल्यानंतर शेतकऱ्यांनी लागवडी काहीशा वाढवल्या होत्या. परंतू नंतरच्या काळात हळदीचे भाव नरमले. हळदीला सलग दोन वर्षे भाव कमी मिळाल्याने शेतकऱ्यांनी 2022-23 च्या हंगामात हळद (Turmeric) लागवड कमी केली. तसेच यंदा महाराष्ट्र (Maharashtra), तेलंगणा (Telangana) आणि आंध्र प्रदेशातील (Andhra Pradesh) हळद (Turmeric) उत्पादक भागात मार्च आणि एप्रिलमध्ये हळद काढणीच्या काळात पावसाचा फटका बसला होता. तसच बदलत्या वातावरणामुळेही उत्पादनात घट आली. त्यामुळे यंदा हळदीच्या बाजारात तेजी टिकून आहे.
देशात 2021-22 च्या हंगामात 12 लाख 23 हजार टन हळद उत्पादन झाले होते. गेल्या हंगामात हळद उत्पादनात (Turmeric production) वाढ झाली होती. पण बाजार भाव नरमल्याने चालू हंगामात शेतकऱ्यानी लागवडी कमी केली. त्यामुळे 2022-23 च्या हंगामात देशात 11 लाख 61 हजार टन हळद उत्पादन झाल्याचे मसाला बोर्डाने (masala bord) म्हटले आहे. म्हणजेच चालू हंगामात देशातील हळद उत्पादन 4 टक्क्यांनी घटले आहे. देशात हळद उत्पादनात अग्रेसर असलेल्या महाराष्ट्रातील उत्पादन गेल्यावर्षीपेक्षा 90 हजार टनांनी कमी होऊन 2 लाख 78 हजार टनावर आले आहे. तर तेलंगणातील उत्पादनात काहीशी वाढ झाली होती.
महत्त्वाची माहिती : गोगलगाय नियंत्रणासाठी या करा उपाययोजना : कृषी विभागाचा सल्ला
देशात चालू हंगामात उत्पादन कमी झाले तरी हळदीला भाव नव्हता. लागवड सुरु झाली तरी भाव नरमच होते. परिणामी शेतकऱ्यांनी (Farmar) लागवड कमी केली. त्यातच जून महिन्यात पावसाने हळद उत्पादक भागांमध्ये दडी दिली. लागवडीयोग्य पाऊस नसल्याने लागवडी खोळंबल्या होत्या. महाराष्ट्र, तेलंगणा, कर्नाटक, तमिळनाडू या राज्यांमध्ये लागवड यंदा उशीरा सुरु झाल्या. जून महिन्यापर्यंत हळद (Turmeric) लागवड गेल्यावर्षीपेक्षा जवळपास 30 टक्क्यांनी कमी दिसत होती. पण जुलै महिन्यात भावात वाढ झाल्याने हळद लागवडीत वाढ झाल्याचे शेतकरी सांगत आहेत. पण तरीही हळद लागवड गेल्यावर्षीपेक्षा कमीच आहे.
महाराष्ट्रातील हळद लागवड 10 ते 20 टक्क्यांनी कमी झाल्याचे शेतकरी सांगत आहेत. महाराष्ट्रात मराठवाडा आणि विदर्भात हळदीचे क्षेत्र जास्त आहे. पण पाऊस (Rain) लांबल्याने यंदा हळद लागडीवर परिणाम झाला. या भागातील लागवड 20 ते 30 टक्क्यांपर्यंत घटल्याचे या भागातील शेतकऱ्यांनी सांगितले. तमिळनाडूतील लागवडही 10 ते 15 टक्क्यांनी कमी झाली. तर आंध्र प्रदेश तसेच तेलंगणातील लागवड 18 ते 20 टक्क्यांनी घटण्याचा अंदाज आहे.
मोठी घोषणा : बाजार समितीतील शेतमाल विक्रीचे पैसे 24 तासामध्ये द्या अन्यथा करवाई : मंत्री अब्दुल सत्तार
देशातून हळद लागवडही गेल्यावर्षापासून वाढलेली दिसते. भारतातून 2021-22 मध्ये 1 लाख 37 हजार टनाची निर्यात झाली होती. आधीच्या हंगामाच्या तुलनेत ही निर्यात (Exports) जवळपास 27 टक्क्यांनी कमी होती. पण 2022-23 मध्ये निर्यातीत मोठी वाढ झाली. या वर्षात निर्यात 1 लाख 70 हजार टनांवर पोचल्याचे सरकारी आकडेवारीवरून स्पष्ट होते. म्हणजेच नुकत्याच सरलेल्या आर्थिक वर्षात निर्यातीत 24 टक्क्यांची वाढ झाली.
चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या दोन महिन्यामध्ये, म्हणजेच एप्रिल आणि मे महिन्यातील निर्यात गेल्यावर्षी याच काळात झालेल्या निर्यातीच्या तुलनेत 27 टक्क्यांनी जास्त आहे. या दोन महिन्यामध्ये 40 हजार टनांची निर्यात झाली. जून आणि जुलै महिन्यातही निर्यातीला चांगली मागणी होती. त्यामुळे या दोन्ही महिन्यामध्ये निर्यात चांगली झाली. सध्या भारतातून सर्वाधिक निर्यात बांगलादेशला (Bangladesh) सुरु आहे. बांगलादेशला होण्याऱ्या निर्यातीत जवळपास दुप्पट वाढ झाली आहे. तर मोरोक्काला होणारी निर्यातही 14 टक्क्यांनी वाढली आहे. विशेष म्हणजे यंदा चीनकडूनही मागणी वाढलेली आहे. चीनला होणारी निर्यात तुलनेत कमी असली तरी निर्यातीतील वाढ दुपटीपेक्षा अधिक आहे. युएई आणि अमेरिकेकडूनही (America) भारतातून निर्यात सुरु आहे.
शुभवार्ता : अपेडाकडून डाळिंबाची पहिली निर्यात खेप अमेरिकेला रवाना
देशातील घटलेले उत्पादन आणि वाढलेली निर्यात यामुळे हळदीच्या भावात चांगलीच वाढ झाली आहे. हळदीचे भाव अगदी जूनमध्येही बाजार समित्यांमध्ये 6 हजार ते 6 हजार 500 रुपयांच्या दरम्यान होते. तर वायद्यांमधील भाव 7 हजार ते 7 हजार 500 रुपयांच्या आसपास होते. पण जुलैमध्ये हळदीच्या दरात चांगलीच वाढ आली. जुलै महिन्यात हळदीचे भाव जवळपास दुप्पट झाले. बाजार समित्यांमधील भाव आता 12 हजार ते 15 हजार रुपयांच्या दरम्यान मिळत आहे. तर हळदीचे वायदे 15 हजार ते 18 हजार रुपयांच्या दरम्यान आहेत.
हळदीच्या भावात पुढील काळातही तेजी टिकून राहू शकते, असा अंदाज आहे. कारण भारत जागतिक उत्पादनात अग्रेसर आहे. भारतात गेल्यावर्षी उत्पादन घटल्याने तसेच निर्यात (Exports) वाढल्यामुळे शिल्लक साठ (Balance Stock) कमी आहे. त्यातच भाववाढीच्या अपेक्षेने शेतकरी आणि व्यापारी (Merchant) माल मागे ठेवतात. परिणामी पुढील पीक बाजारात येईपर्यंत हळदीचे भाव तेजीत राहू शकतात, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. हळदीचे भाव 15 हजार रुपयांचाही टप्पा पुढील काही महिन्यांमध्ये पार करू शकतो, असा अंदाज जाणकार व्यक्त करत आहेत.
हळदीची तेजी येणाऱ्या पावसावरही मोठ्या प्रमाणात अवलंबून राहील. हवामान विभागाने मान्सूनच्या दुसऱ्या टप्प्यात पाऊसमान सरासरी राहण्याचा अंदाज व्यक्त केला. पण एल निनोचे सावट कायम आहे. हळद पिकाला पुढच्या टप्प्यात पाणी कमी पडल्यास उत्पादनावरही परिणाम होऊ शकतो. यामुळे चालू हंगामातही हळद उत्पादन (Turmeric production) कमीच राहील, असा अंदाज शेतकऱ्यांसह बाजारातून व्यक्त केला जात आहे. हळदीच्या उत्पादनात किती घट होऊ शकते, याचा अंदाज आल्यानंतर दरातील तेजी मोठ्या प्रमाणात वाढू शकते, असाही अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला.
मोठी बातमी : प्रत्येक साखर कारखान्यांना इथेनॉल प्रकल्पासाठी आर्थसहाय्य देणार : अमित शहा
https://www.facebook.com/shetimitramagazine03