सोलापूर जिल्ह्यासाठी वरदायिनी असलेले उजनी धरण शुक्रवार, दि. 12 रोजी ओव्हरफ्लो झाले आहे. उजनी धरणात दौंडकडून येणार्या पाण्याचा विसर्ग लक्षात घेता खबरदारीचा उपाय म्हणून धरणाचे 16 दरवाजे दुपारी दोन फुटाने उचलण्यात आले आहेत. सध्या धरणातून भीमा नदीपात्रात 31600 क्युसेक पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला असून, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
हे नक्की वाचा : ई-पीक पाहणी प्रक्रियेत बदल : आता दुरुस्तीचाही पर्याय
उजनी धरणाची पाणी साठवण क्षमता 123 टीएमसी आहे. तर सोलापूर जिल्ह्याची पावसाची वार्षिक सरासरी 480 मिलीमिटर आहे. यंदा जिल्ह्यात सर्वदूर पाऊस झालेला नाही. त्यामुळे उजनी धरण भरल्याने शेतकऱ्यांना चांगलाच दिलासा मिळाला आहे. विशेष म्हणजे उजनी धरण हे महाराष्ट्रातील मोठ्या धरणामध्ये गणले जाते. त्यामुळे याचा फायदा केवळ सोलापूर जिल्ह्यालाच नव्हे तर भीमा खोऱ्यातील सोलापूरसह पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनाही होतो.
अतिमहत्वाची बातमी : कोरोनाचा धोका पुन्हा वाढला
शुक्रवारी उजनी धरण 102 टक्के क्षमते भरल्याने धरणाच्या 41 पैकी 16 दरवाजे 62 सेंमीने उचलण्यात आले आहेत. धरणातू 31 हजार 600 क्युसेक पाण्याच विसर्ग भीमानदीपात्रात सोडण्यात आला आहे. सध्या उजनी धरणातील पाणी पातळी 496.950 झाली आहे. धरणात एकूण पाणीसाठा 3360.53 असून, धरणामध्ये उपयुक्त पाणीसाठा 1557.72 आहे. सध्या उजनी धरणाच्या वरील बंडगार्डनमधून 23 हजार 623 क्युसेक तर दौंडमधून 58 हजार 365 क्युसेक विसर्ग सुरू आहे. उजनी धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने उजनी धरणातून भीमा नदीत 41 हजार 600 क्युसेक विसर्ग सोडण्यात आला आहे. कालव्यातून 2 हजार तर भीमा-सीना जोड कालव्यातून 800 क्युसेक विसर्ग सुरू करण्यात आला आहे. नदीपात्रात पंढरपूर येथे 23 हजार 378 तर निरा नृसिंहपूर (संगम) येथे 62 हजार क्युसेक विसर्ग आहे.

ब्रेकिंग : पूरग्रस्तांना हेक्टरी 13 हजार 600 रुपये मिळणार
सोलापूर, पुणे आणि अहमदनगर या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वरदायिनी असलेले हे धरण मागीलवर्षी 5 आक्टोबर रोजी भरले होते. यंदा मात्र ते 12 ऑगस्टरोजी 102 टक्के भरले आहे. यंदा पुणे व अहमदनगर जिल्ह्यातील भीमा खोर्यात जून महिन्यात पावसाने पाठ फिरवली होती. त्यामुळे हे धरण भरेल की नाही अशी शंका होती. मात्र जुलै महिन्यात भीमा खोर्यात झालेल्या दमदार पावसामुळे उजनी धरणाच्या वरील साखळीतील 18 धरणे पूर्णक्षमतेने भरल्याने उजनीमध्ये मोठ्या प्रमाणात विसर्गा सुरू होता. दौंडकडून 58 हजार 365 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरु होता. मात्र खबरदारीचा उपाय म्हणून विसर्ग कमी करून तो गुरुवार, दि. 11 आगस्ट रोजी दुपारी 5 हजार क्युसेक करण्यात आला होता. शुक्रवारी दुपारी 4 वाजता उजनी धरणाचे 16 दरवाजे 62 सेंमीने उचलून 40 हजार 600 क्युसेक पाण्याचा विसर्ग भीमानदीपात्रात सोडण्यात आला. यामध्ये अजून वाढ होण्याची शक्यता आहे.
महत्त्वाची बातमी : जायकवाडी धरणाचे 18 दरवाजे पुन्हा उघडले
उजनी धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने यावर अवलंबून आलेल्या शेतीला तसेच औद्योगिक वसाहतीचा पाण्याचा प्रश्न मिटला आहे. तसेच यावर असलेल्या सोलापूर, बार्शी, उस्मानाबाद शहराच्या पाणीपुरवठा योजनेचाही प्रश्न मिटला आहे. उजनी लाभक्षेत्रात उसाची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. त्यामुळे आता उस उत्पादक शेतकऱ्यांचा प्रश्न मिटला आहे.
ब्रेकिंग न्यूज : विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन 17 ऑगस्टपासून

https://www.facebook.com/shetimitramagazine03

https://www.instagram.com/shetimitra03/

https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1