आज आपण रूपये दहा ते पंधरा प्रती लिटर दराने मिनरल वॉटर सहज विकत घेतो. नळाला पाणी नसले तर आंदोलन करतो, पण दुधाचे दर रूपये एक ते दोन वाढले तर महागाई बाबत ओरड करतो. परंतु आपणास माहीत नसते की जे दूध जनावरांच्या रक्तापासून बनते ते एक लीटर दूध तयार करण्यास एका गाईला चार लीटर पाणी प्यावयास द्यावे लागते.
दूध म्हणजे, पौष्टिक पदार्थाचा खजिना, दुधात व्हिटॅमिन्स, खनिजे, कॅल्शियम, फॉस्फरस व प्रोटीन्स इत्यादी घटक आवश्यक प्रमाणात असतात. दुधातील झिंक प्रतिकारशक्ती वाढवते. पोटॅशियम मज्जासंस्थेसाठी उपयुक्त असते, मॅग्नेशियम स्नायू बळकट करते व कार्बेाहायड्रेट शरीर शक्तिशाली बनवते. संशोधकांच्या मते कॅल्शियमयुक्त पदार्थ सेवन न केल्यामुळे मोठ्या आतड्यांना कॅन्सर होण्याची शक्यता असते. महिलांना कॅल्शियमची जास्त गरज असते व ही गरज रोज दूध प्यायल्यास पूर्ण होते. तसेच दुधात व्हिटॅमिन डी सुद्धा असते व त्यामुळे शरीर कॅल्शियम जास्त प्रमाणात शोषून घेते.
दुधातील कॅल्शियम शरीरात रोगप्रतिकार शक्ती निर्माण करते व हाडे बळकट करते. दूध व दुग्धजन्य पदार्थ दात किडणे, तोंडाची आम्लता व दातांवर थर जमणे रोखते. दुधामुळे तोंडात लाल वाढते व दंतछिद्र होण्याचा धोका टळतो. दुधातील कॅल्शियम मुलांच्या शारीरिक विकासात महत्त्वाची भूमिका बजावते. मुले खेळताना पडली व त्यांना मार लागला तर तो सहन करण्याची ताकद दुधातील कॅल्शियमची गरज असते. रात्री झोपताना कोमट दूध प्यायल्यामुळे मुलांना गाढ झोप लागते व दिवसभर ती उत्साही व तरतरीत राहतात. दूध मुालांच्या मेंदूचे पोषण करते व त्यांची बुद्धी तल्लख ठेवण्यास मदत करते. यामुळे मुलांना रोज दूध देणे अत्यंत गरजेचे आहे.
दूध स्वस्त कसे मिळेल ? : दूध उत्पादनवाढीसाठी मोठ्यामोठ्या तज्ञांची तांत्रिक पुस्तके आहेत. हा विषय सोपा नाही, तसाच कठीणही नाही, पण विषयाची पूर्ण कल्पना येण्याच्या दृष्टीने लिखाण विस्तृत प्रमाणात करणे अटळ आहे. आपण नुसते गोपाळकाला वगैरे उत्सव करतो पण त्याचे गांभीर्य समजून घेत नाही. 40 ते 50 वर्षापूर्वी खेडेगावांत दुधाचे दर्शन होत नव्हते. फक्त ठराविक सधन वर्गाकडे गाई-म्हशी होत्या; तथापी अजूनही शेळी ही गरिबांची गाय आहे. पूर्वी दुधाअभावी चहा कोरा (काळाच) प्यावा लागे. आज कितीतरी पटीने दुधात वाढ झालेली आहे व दुधाचा वापरही वाढला आहे. तरी प्रत्येकाला किमान 200 ग्रॅम ते 250 ग्रॅम दूध मिळावे म्हटले जाते ते मिळत नाही.
दुधाची महापूर योजना आली व दूध ज्या काळात जास्त उत्पादित झाले ते मागणीअभावी किंवा साठवणूक करण्याची मर्यादा संपल्याने किंवा उत्पादित किंमतीपेक्षा कमी किंमत मिळाल्याने शेतकर्यांनी रस्त्यावर ओतून दिले. दुधाचा दर वाढवून मिळावा म्हणून आंदोलने होतात. सरकार रूपये दोन ते तीन प्रती लिटर दर वाढवून देते व मागच्या दाराने व्यापारी खाद्यारे दर दुपटीने वाढवितात व त्याच्यावर नियंत्रण नसते. आज शेतमजूर रूपये 150 टक्के किंवा जास्त मजुरी मागतो कारण महागाईमुळे त्याला परवडत नाही. त्याशिवाय चारा व आंबोण, पाणी, व्यवस्थापन इत्यादी खर्च अलग असतो या गोष्टीचा विचार आपण कधीच करत नाही.
आज आपण रूपये दहा ते पंधरा प्रती लिटर दराने मिनरल वॉटर सहज विकत घेतो. नळाला पाणी नसले तर आंदोलन करतो, पण दुधाचे दर रूपये एक ते दोन वाढले तर महागाई बाबत ओरड करतो. परंतु आपणास माहीत नसते की जे दूध जनावरांच्या रक्तापासून बनते ते एक लीटर दूध तयार करण्यास एका गाईला चार लीटर पाणी प्यावयास द्यावे लागते. शिवाय शरीरपोषणास व स्वच्छता ठेवण्यास पण पाणी लागते. म्हणजे प्रत्येक जनावराला 50 ते 60 लीटर पाणी दररोज लागते असे शास्त्र सांगते.
सिद्धवळू योजना : जगामध्ये असा कोणताही देश नाही की जिथे सिद्धवळू योजना राबवल्याविना चांगली दुधाळ जनावरे निर्माण झाली आहेत. यासाठी, सिद्धवळू योजना व जनावरांचे शरीर सौष्टव यांचे महत्त्व शेतकर्यांना प्रशिक्षणाच्या माध्यमातून पटवून दिले पाहिजे. त्याची नोंद शेतकर्याने ठेवल्याशिवाय सिद्धवळूसाठी लागणारी खरी माहिती मिळणार नाही. त्यामुळे शासनाने नेमलेल्या दूध नोंदणीकार हे सिद्धवळूसाठी लागणारी माहिती व्यवस्थितपणे देऊ शकणार नाहीत. कारण आपणाकडे दूध पिळण्यासाठी वेळ सर्व साधारणपणे एकच असते. ठराविक वेळेतच ते काढले गेले पाहिजे. यासाठी शेतकर्यांना या योजनेचे महत्त्व पटवून देण्याच्या दृष्टीने योजना परिणामकारकरीत्या आहे, जेणे करून कमी खर्चात अधिक दूध उत्पादन देणारी पिढी निर्माण होईल. खाजगीरीत्याही काही जणांचे प्रयत्न सुरू आहेत. यापूर्वी शासनाकडून असे प्रयत्न झाले आहेत पण त्यातील उणीवा दूर झाल्या पाहिजेत.
एरीर सूचांक : प्रजनन व दूध उत्पादन हे दोन्हीही त्या गाई/म्हशींच्या प्रकृतीस्वास्थावर अवलंबून असतात. त्यामुळे कालवडींची होणारी वाढ तसेच गाई/म्हशींचे प्रकृतीस्वास्थ हे त्यांच्या व्याल्यानंतरही योग्य राहणे आवश्यक असते. शरीर सूचांक कसा व कोणकोणत्या अवस्थेत पहावा याचे गोपालकांना योग्यरीत्या प्रशिक्षण दिले तर ते त्यांना योग्य संतुलित आहार देऊन त्यांचा शरीर सूचांक चांगला ठेवू शकतील. तसेच व्याल्यानंतर गाय/ म्हैस लवकर माजावर येऊन तिच्या आयुष्यामध्ये जास्तीत जास्त उत्पादित वासरे/ पारड्या देईल. तसेच प्रती गाय/म्हैस एकूण दूध उत्पादन वाढेल. वेळेवर स्वच्छ पाण्याची उपलब्धता, कृमीनाशके, गोचीड सारखे परोपजीवी किटंकापासून संरक्षण, लसीकरण, गोठ्याची स्वच्छता, खेळती हवा, योग्य आकाराचा गोठा, समतोल आहार याचे महत्त्व पटवून देणे आवश्यक आहे. नवीन तंत्रज्ञानाने वृत्तपत्र माध्यमातून सहज शक्य आहे. त्याला खूप मोठ्या शिक्षणाची आवश्यकता आहेत असेही नाही.
अनुदान : अनुदान हे दुभत्या गाई/ म्हशी विकत घेण्यासाठी किंवा त्यांना जनावरांच्या पालनपोषणासाठी मिळावे. हे शेतकर्यांना जनावरे खरेदी करण्यासाठी दिले जाते. पण प्रत्यक्ष लाभधारकाला मिळते काय? यामुळेच विदर्भात आत्महत्या झाल्या हे सर्वश्रत आहे. त्यांचे कर्ज फिटावे म्हणून पॅकेज जाहीर केले जाते व ते परस्पर सावकार लुटतात व यासाठी त्यांना राजकारण्यांचा आशीर्वाद असतो हे यापूर्वीच वृत्तपत्रांमधून उघड झालेले आहे. काही शेतकर्यांनी स्वत:च्या जमिनी तारण ठेवणे व कर्ज फेडीसाठी त्या विकल्याची उदाहरणे आहेत. गायी तसेच म्हशींमध्ये कृत्रिमरेतनाने जर्सी कालवडी/सुरती म्हशीच्या पारड्या निर्माण झाल्या. पण त्या शेतकरी आपल्याकडे ठेवू शकला नाही व योग्य रीतीने जोपासणे शक्य नसल्याने म्हशीची वासरे मृत पावली हे पशुगणनेच्या आकडेवारीतून सिद्ध होते.
कोकण विभागातील परिस्थिती : निर्माण झालेल्या संकरीत कालवडी अल्पदराने विकत घेऊन घाटमाथ्यावर दलालांनी नेल्या, त्या जर कोकणात राहिल्या असत्या तर दूध देणार्या गाई/म्हशी पुन्हा विकत घ्याव्या लागल्या नसत्या. हा दुग्धोत्पादनाचा कष्टाचा असून प्रतिकुल हवामानामध्ये किंवा व्यवस्थापन खर्चामुळे न जमल्याने तोट्याचा होतो. कोकणात तरूण गर्व शहराकडे गेला व म्हातारी माणसे गावाकडे राहिली. जी आहेत त्यांना बिनभांडवली मजुरी करणे परवडते कारण रूपये 150 टक्के सहज मजुरी मिळते व त्याला वेळेचे बंधन नसते. तो करील ते काम मालकाला स्वीकारवे लागते. शेती तुटपुंजी असल्याने ती करावयास माणसे नसतात. यापूर्वी कष्ट करणारा तरूणवर्ग मुंबईला गिरणीत सहज सामावला जाई पण तोही मार्ग बंद झाला. आज कोकणात दुग्धोत्पादन, शेळीपालन, कोंबडी पालनाशिवाय शेतीवरील धंदे यांना इतका वाव आहे की, कितीही केली तरी त्याला बाजारपेठ उपलब्ध आहे. पण त्यांच्या जमिनी आहेत त्यांनी बागायती शेती करून दगडी कम्पाऊण्ड केले आहे. पूर्वीसारखी धनगर समाज हा धंदा करत होता. त्यांच्यामध्ये शिक्षण वाढले आहे व बर्याच जणांना राखीव जागेतून चांगल्या नोकर्या मिळाल्या व ते निश्चित उत्पन्न देणारे साधन झाले.
डॉ. वा. ल. तेली निवृत्त पशुधन विकास अधिकारी, (कणकवली, सिंधुदुर्ग) (संपर्क 84223 93536)