हवामान बदलाचा मोठा परिणाम दिसून येत असून, सध्या राज्यातील वातावरणात सतत बदल दिसून येत आहे. दुपारी कडक ऊन आणि संध्याकाळी अवकाळी पावसासह गारपीट असा अनुभव येत आहे. अजून 23 एप्रिलपर्यंत मराठवाड्यातील 18 जिल्ह्यात अवकाळी पावसाची शक्यता हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी वर्तविली आहे.
हे नक्की वाचा : विदर्भात अवकाळीचा पुन्हा दणका : 11 जिल्ह्यात 8,100 हेक्टर पिकांचे नुकसान
गेल्या काही दिवसांपासून राज्यात सुरु असलेला अवकाळी पावसाने राज्यात अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. मात्र कोकण आणि विदर्भातील अवकाळी पावसाचे वातावरण दोन दिवसात निवळणार असल्याचा अंदाज असून, उर्वरित राज्यात मात्र येत्या 23 एप्रिलपर्यंत अवकाळी पावसासह गारपिटीचा अंदाज आहे.

खुळे यांच्या अंदाजानुसार मराठवाड्यातील परभणी, बीड, छत्रपती संभाजीनगर, लातूर, धाराशिव अशा एकूण 18 जिल्ह्यात 23 एप्रिलपर्यंत अवकाळी पावसाची शक्यता असून, या आठवड्यात उन्हाचा कडाकाही कमी राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे आणखी एक आठवडा अवकाळी पावसाच्या संकटाची भीती कायम असणार आहे.
मोठी बातमी : यंदा महाराष्ट्रात सरासरीपेक्षा कमी पाऊस
बीड जिल्ह्यात पुन्हा एकदा झालेल्या गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असून, फळबागा उद्ध्वस्त झाल्या आहेत. गेल्या दोन दिवसांपासून सकाळी कडक ऊन, दुपारी ढग दाटून येत असून सायंकाळच्या दरम्यान वादळी वाऱ्यासह तालुक्यातील कुठल्या ना कुठल्या भागात जोरदार पाऊस होऊन

सुरवातीला झालेल्या अवकाळी पावसानंतर अनेक शेतकऱ्यांनी धावपळ करत रब्बीचे पीक काढून घेतले. मात्र सद्या सुरु असलेल्या अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका बागायतदारांना बसताना पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे द्राक्ष बागांना मोठा फटका बसताना पाहायला मिळत आहे. त्यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे.
चिंताजनक : स्कायमेटकडून मान्सूनचा चिंताजनक अंदाज

https://www.facebook.com/shetimitramagazine03

https://www.instagram.com/shetimitra03/

https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1