अवकाळी पावसाचा पुन्हा तडाका : नाशिक भागातील द्राक्षबागा भुईसपाट

0
267

मागील महिन्यातील अवकाळी पावसाची नुकसान भरपाई अजून शेतकऱ्यांना मिळालेली नसताना पुन्हा एकदा आचानक आलेला अवकाळी पाऊस व वादळी गारपीटीने मराठवाड्यासह नाशिक भागाला अक्षरश: झोडपून काढले. शुक्रवारपासून सुरू असलेल्या या अवकाळी पावसाच्या तडाक्याने  शेतकऱ्यांमध्ये धडकी भरली असून, रविवारच्या वादळी पावसात नाशिक भागातील द्राक्षबागा भुईसपाट झाल्या आहेत.

चिंताजनक : मराठवाड्यात 9 ठिकाणी वीज कोसळून 5 जणांचा बळी : 31 जनावरे दगावली

अचानक आलेल्या अवकाळी पाऊस आणि गारपीटीने नाशिक भागातील उन्हाळ कांदा, गहू आणि द्राक्ष बागांचे मोठे नुकसान झाले आहे. निफाड परिसरातील मागील पावसात वाचवलेल्या व सध्या काढणीला आलेल्या द्राक्षबागा अक्षरशः भुईसपाट झाल्या आहेत. अनेक ठिकाणी द्राक्ष बाग उन्मळून पडल्या असून, कांदा पिकाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.   

काही भागात काढणीला आलेल्या व काही भागात काढून पडलेल्या कांदा या अचानक आलेल्या अवकाळी पावसाने पूर्णत: भिजल्याने मोठे नुकसान झाले आहे. त्याचबरोबर गहू आणि डाळिंब पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

आनंदाची बातमी : सोलापूर जिल्ह्यातील डाळिंबास ‘जीआय’ मानांकनाचे मंगळवारी वितरण

रविवारी सटाणा भागात मोठ्या प्रमाणात गारपीट झाली. यामध्ये कांद्याचे आणि द्राक्ष बागेचे मोठे नुकसान झाले आहे. शिवाय निफाडसह बाजूच्या तालुक्यात द्राक्ष बागेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर चांदवड आणि येवला तालुक्यात कांद्याचे बियाणे तयार करण्यासाठी लावलेले डोंगळे देखील या पावसाने खराब झाले आहे.

दरम्यान, राज्याचे कृषी आयुक्त संजय चव्हाण यांनी आज नाशिकच्या विविध भागात जाऊन नुकसानीची पाहणी केली. शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान पाहून मदत बाबत लवकरच निर्णय घेतला जाणार असल्याचेही संजय चव्हाण यांनी म्हंटले असून, राज्यातील जवळपास 34 हजार हेक्टरवरील नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाजही व्यक्त करण्यात आला आहे.

हे वाचा : हवामान बदलाचा काजू उत्पादनवर परिणाम

https://www.facebook.com/shetimitramagazine03

https://www.instagram.com/shetimitra03/

https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1

आपणास ही बातमी आवडली असल्यास खालील स्टार क्लिक करून रेटींग करा

👇 👇 👇

Click to rate this post!
[Total: 1 Average: 5]

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here