आठवड्यात उजनी धरण २५ टक्क्यांवर

0
405

सोलापुरात गेल्या आठवड्यात झालेल्या संततधार पावसाने उणे पातळीत असणारे उजनी धरण अवघ्या आठवड्याभरातच 25.18 टक्क्यांवर पोहोचले आहे. धरणातील पाणीपातळी 492.810 मीटरपर्यंत पोहोचली आहे. पुणे आणि नगर जिल्ह्यात पडलेल्या पाऊस धरणातील पाणीपातळी वाढण्यासाठी उपयुक्त ठरला आहे.

यंदा मान्सून पावसाने तब्बल महिनाभर उशिराने हजेरी लावली. गेल्या आठवड्यात जिल्ह्यात अनेक भागात कमी-जास्त प्रमाणात पाऊस झाला आहे. जिल्ह्याची पावसाची वार्षिक सरासरी 480 मिलिमीटर आहे. त्यापैकी आतापर्यंत सुमारे 188.30 मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद जिल्ह्यात झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला.

महत्त्वाची बातमी : पीक विम्यासाठी ई-पीक पाहणी नोंद सक्तीची नाही : कृषि आयुक्त धीरज कुमार

विशेषतः पावसाच्या भरवशावर पेरण्या उरकलेल्या शेतकऱ्यांना त्याचा फायदा होणार आहे. या कालावधीत भीज पावसाचे प्रमाण अधिक राहिले. पण आता विहिरी, नाले, ओढे भरण्यासाठी मोठ्या पावसाची गरज आहे.

गेल्या आठवड्यापासून पुणे जिल्ह्यात पाऊस पडतो आहे. सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असलेल्या उजनी धरणाच्यावरच्या बाजूला असलेल्या पुण्याकडील खडकवासलासह 18 धरणांमध्ये आता पुरेसा पाणीसाठा झाला आहे. खडकवासला तर दोन दिवसापूर्वीच शंभर टक्के भरले आहे. त्यामुळे या धरणातील अतिरिक्त पाणी पुढे उजनी धरणाकडे सोडले जाते आहे. गेल्या आठवड्यापासून हे पाणी सोडले जात असल्याने उणे पातळीत असणारे उजनी धरण अवघ्या आठवड्यातच 25 टक्क्यांवर पोचले आहे.

हे वाचा : ट्रॅक्टर विक्रीमध्ये महिन्यात 15 टक्क्यांनी वाढ

काल दौंडकडून उजनीमध्ये 43 हजार 944 क्युसेक इतक्या पाण्याचा विसर्ग अखंडपणे सुरूच होता. त्यामुळे धरणातील पाणीपातळी 492.810 मीटरपर्यंत पोहोचली. तर एकूण पाणीसाठा 77.15 टीएमसी एवढा राहिला. त्यापैकी 13.49 टीएमसी इतका उपयुक्त साठा राहिला. तर या पाण्याची टक्केवारी 25.18 टक्के इतकी राहिली.

हे नक्की वाचा : पावसामुळे बांधल्या म्हशी चक्क… बायपासवर  

https://www.facebook.com/shetimitramagazine03

https://www.instagram.com/shetimitra03/

https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1

आपणास ही बातमी आवडली असल्यास खालील स्टार क्लिक करून रेटींग करा

👇 👇 👇

Click to rate this post!
[Total: 1 Average: 5]

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here