नवनवीन संशोधनासाठी प्रसिद्ध असलेल्या बारामती कृषी विज्ञान केंद्रात नुकताच रसायनिक औषधापेक्षा तीनपट कमी खर्चात चक्क परदेशी मिरची उत्पादनाचा नवीन एक प्रयोग यशस्वी करण्यात आला आहे. चक्क मिरचीला होमिओपॅथी औषधाची फवारणी करून नेदरलँडची स्कॉच बोनेट या जातीच्या मिरची उत्पादनाचा राज्यातील पहिला यशस्वी प्रयोग करण्यात आला आहे.
शेतीमध्ये विविध तंत्रज्ञान तसेच पिकांच्या जाती व उत्पादनवाढीसाठी कृषी विद्यापीठे व कृषी विज्ञान केंद्रामार्फत सातत्याने प्रयत्न करण्यात येत आहेत. त्याचा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फायदा होतो. कृषी विज्ञान केंद्रे हे कायम नवनवीन संशोधन शेतीमध्ये एक नवे पर्व आणण्याच्या प्रयत्नात असतात. असाच एक प्रयोग बारामती कृषी विज्ञान केंद्राने केला आहे. त्याबद्दल या लेखात माहिती घेऊ.
बारामती कृषी विज्ञान केंद्रामध्ये स्कॉच बोनेट या मिरचीच्या वाणाची लागवड करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या मिरचीची सगळी वाढ ही होमिओपॅथिक औषधे वापरून करण्यात आली आहे. आजपर्यंत होमिओपॅथी औषधांचा वापर पहिला तर केवळ वैद्यकीय क्षेत्रांमध्ये आपल्याला माहिती आहे. विशेष म्हणजे हा महाराष्ट्रातील पहिलाच प्रयोग आहे. स्कॉच बोनेट या मिरचीचा वाणाची वैशिष्ट्ये म्हणजे या मिरचीचा असलेला तिखटपणा नव्हे तर ही मिरची चवीला तिखट नसून गोड आहे.
यावर्षीच्या पूर्ण वाढीसाठी आणि फवारणीसाठी होमिओपॅथिक औषधांचा वापर करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या मिरचीचा उत्पादन खर्च हा रासायनिक खतांच्या तुलनेत तीन पटीने कमी आहे. कधी न ऐकलेली होमिओपॅथीचा वापर करून केलेली शेती आता बारामतीत करण्यात येत आहे व एवढेच नाही तर ती यशस्वी देखील होत आहे. महाराष्ट्रमध्ये पहिल्यांदाच बारामतीत नेदरलॅंडची स्कॉच बोनेट या जातीची गोड मिरची आणि ढोबळी मिरची होमिओपॅथी औषधावर उत्पादीत करण्यात आली आहे. बारामती येथील शारदा नगर येथील कृषी विज्ञान केंद्रात ही विविध रंगाची मिरची लक्ष वेधणारे ठरले आहे.
हेही वाचा :
सातबारा उतारा होणार बंद; मिळणार प्रॉपर्टी कार्ड
लातूरमध्ये उभारली जाणार बांबूपासून इथेनॉल निर्मितीची रिफायनरी
२०५० पर्यंत शून्य कार्बन उत्सर्जनाचे उद्दिष्ट : पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे
पोकरा’अंतर्गत 65 हजार शेतकऱ्यांना लाभ : प्रकल्प संचालक इंद्रा मालो
पशुसंवर्धनविषयी केंद्राकडून सहकार्य मिळावे : सुनील केदार
होमिओपॅथी औषधांच्या आधाराने केवळ वीस हजार रुपयांमध्ये मिरचीचे उत्पादन करणे शक्य झाले आहे. 9 फेब्रुवारी ते 13 फेब्रुवारी दरम्यान बारामती येथील कृषी विज्ञान केंद्रात कृषी तंत्रज्ञान सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या तंत्रज्ञान सप्ताहामध्ये शेतकऱ्यांना होमिओपॅथी सोबतच विविध प्रकारचे प्रयोग शेतकऱ्यांना पाहायला मिळणार आहेत.

https://www.facebook.com/shetimitramagazine03
आपणास ही बातमी आवडली असल्यास खालील स्टार क्लिक करून रेटींग करा













Users Today : 11
Users Last 30 days : 764
Users This Month : 89
Users This Year : 801
Total Users : 236250