राज्यात जनावरांचा लम्पी त्वचारोग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला जात असून, राज्यात लसीकरण सुरू आहे. आधी पाच किलोमीटर परिसरात लसीकरण करावे असे ठरले होते; आता सरसकट लसीकरण केले जात असल्याची माहिती आहे. अशी माहिती महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील नांदेडमध्ये बोलत दिली.
मोठी बातमी : नुकसान झाले त्यांना भरीव मदत मिळणारच : कृषीमंत्र्यांचे शेतकऱ्यांना वचन
ते म्हणाले, या आजाराने राज्यातील 30 जिल्हे प्रभावित झाले आहेत. आतापर्यंत 735 जनावरे दगावली आहेत. काही ठिकाणी लसीकरणाची प्रक्रिया चांगल्या पद्धतीने सुरू असून, राज्यात 75 लाख लसी उपलब्ध केल्या असून, आधी पाच किलोमीटर परिसरात लसीकरण करावे असे ठरले होते; आता सरसकट लसीकरण केले जात आहे. करतोय, अशी माहिती विखे पाटील यांनी दिली. आतापर्यंत साधारण 14 लाख लसीकरण झाले असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
लसीकरणाच्या कामासाठी राज्यातील सहाही व्हेटरनरी कॉलेजचे विद्यार्थी मदतीला घेण्यात आली असल्याचे सांगून ती म्हणाले, लवकरच एक हजार पदे भरण्यात येणार आहेत. विभागीय स्तरावर ते अधिकार दिलेले आहेत. तातडीची औषधी खरेदी करण्याचे अधिकारीही जिल्हास्तरावर दिल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
मोठा निर्णय : बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन केंद्राच्या अध्यक्षपदी खासदार हेमंत पाटील यांची वर्णी
ते म्हणाले, लसीकरण, औषधोपचाराचा खर्च 100 टक्के शासन करत आहे. जळगाव जास्त प्रभावित आहे. राज्यात एक कोटी 40 लाख पशुधन आहे. तसे पहाता, लम्पीने प्रभावित झालेली संख्या मर्यादित आहे. सध्या लसी बाहेरून उपलब्ध करत आहोत, देशात दोनच कंपन्या या लसी तयार करतात. पुण्यात 60 कोटी रुपये खर्च करून नवीन प्रयोगशाळा सुरू केली आहे. तिथे दोन महिन्यात प्रत्यक्ष लसी तयार होतील असे सांगून ते म्हणाले, ही राज्य सरकारची प्रयोगशाळा आहे.
जनावरांच्या लम्पी त्वचारोगचे डीएनए सॅम्पल, ब्लड सॅम्पल, पशुंचा मृत्यू नेमका कसा झाला, यासाठी पुण्याला सॅम्पल पाठवाव्या लागतात. त्यामुळे लवकरच विभागीय स्तरावर लॅब उभ्या करण्याचा विचार सुरु आहे. मोकाट जनावरांमुळे रोगांचा प्रसार जास्त होतो. कारण ते चांगल्या गोठ्यामध्ये जाऊन उभे राहतात. मोकाट जनावरांना अटकाव करणे गरजेचे असल्याचे मत विखे पाटील यांनी व्यक्त केले.
मोठी बातमी : यंदा खरिपात 149.92 दशलक्ष टन अन्नधान्य उत्पादनाचा अंदाज
https://www.facebook.com/shetimitramagazine03
https://www.instagram.com/shetimitra03/
https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1