राज्य शासनाने परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठा अंतर्गत 8 संशोधन प्रकल्पांसाठी 25 कोटी रुपये निधीस प्रशासकीय मंजुरी दिली आहे. यातून मराठवाड्यात 5 ठिकाणी 8 अत्याधुनिक प्रयोगशाळा उभारण्यात येणार आहे.
धक्कादायक : मराठवाड्यात रोज 2 शेतकरी करत आहेत आत्महत्या !
परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाला 50 वर्षे पूर्ण झाली आहेत. कृषी विद्यापीठास संशोधनासाठी 50 कोटी रुपये निधी देण्याबाबत नुकत्याच झालेल्या 2022-23 च्या अर्थसंकल्पात जाहीर करण्यात आले होते. या संदर्भात संशोधन विषयक प्रस्तावही सादर करण्याबाबत कळविण्यात आले होते. त्यानुसार वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने संशोधन विषयक कार्याला गती मिळावी याकरिता 8 संशोधन विषयक प्रस्ताव सादर केले होते. त्यासाठी २५ कोटी रुपये निधी वितरणास मंजुरी देण्यात आली आहे.
परभणी येथील अखिल भारतीय समन्वित हवामान संशोधन प्रकल्पांतर्गत पीक आणि प्रजोत्पती (जिनोटाइप) मधील सूक्ष्म हवामान प्रयोगशाळेसाठी 1 कोटी 70 लाख रुपये, परभणी कृषी महाविद्यालयातील मृदाविज्ञान व कृषी रसायनशास्त्र विभागा अंतर्गत स्वयंचलित माती परीक्षण प्रयोगशाळेसाठी 2 कोटी 70 लाख रुपये, परभणी येथील वनस्पती रोगशास्त्र विभाग अंतर्गत वनस्पती आरोग्य चिकित्सा प्रयोगशाळेसाठी 3 कोटी 12 लाख रुपये, नांदेड येथील कापूस संशोधन केंद्रामध्ये बी. टी. कापूस बियाणे संदर्भातील समस्या निवारण प्रयोगशाळेसाठी 2 कोटी 55 लाख रुपये निधी मंजुर करण्यात आला आहे.
ब्रेकिंग : पैसे नसल्याने 15 बाजार समितीच्या निवडणुकीचा प्रश्न ?
तसेच लातूर येथील विलासराव देशमुख कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयामध्ये अत्याधुनिक जैवतंत्रज्ञान प्रयोगशाळेसाठी 5 कोटी 85 लाख रुपये निधी देण्यात येणार आहे. तर छत्रपती संभाजीनगर येथील राष्ट्रीय कृषी संशोधन येथे जैविक खते निर्मिती प्रयोगशाळेसाठी 1 कोटी 60 लाख रुपये, अंबाजोगाई (जि. बीड) येथील सीताफळ संशोधन केंद्रा अंतर्गत सीताफळ संशोधन व प्रक्रिया प्रयोगशाळेसाठी 3 कोटी 92 लाख रुपये मंजूर केले आहेत.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ अंतर्गत संशोधनासाठी 2022-23 या वर्षात 8 कोटी 40 लाख रुपये निधी वितरणास या शासन निर्णयाद्वारे मंजुरी देण्यात आली आहे. या निधीच्या उपलब्धतेमुळे नक्कीच मराठवाड्यातील कृषी विकासाला नवी दिशा मिळेल.
चर्चेचा विषय : मार्चमधील पीक नुकसानीचे पंचनामे पूर्ण
https://www.facebook.com/shetimitramagazine03
https://www.instagram.com/shetimitra03/
https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1