परतीच्या पावसामुळे टोमॅटो पिकाचे मोठे नुकसान झाले असून, बाजारात टोमॅटोची आवक कमी झाली आहे. त्यामुळे बाजारात टोमॅटोचे भाव कडाडले आहेत. टोमॅटोच्या दरात किलोमागे 20 ते 30 रुपयांची वाढ झाली आहे. दिवाळीच्या तोंडावर भाज्यांचे भाव वाढल्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशावर मोठा परिणाम होत असला तरी, याचा फायदा शेतकऱ्यांनाही झालेला नाही.
आनंदाची बातमी : रब्बीच्या ‘या’ बियाण्यासाठी मिळणार अनुदान
टोमॅटोच्या दरात वाढ झाली असली तरी टोमॅटो उत्पादकांना त्याचा म्हणावा असा फायदा झालेला नाही. अवेळी पडलेल्या पावसामुळे टोमॅटो पीक निकामी झाल्याने टोमॅटोच्या उत्पादनात सुमारे 60 टक्के घट झाली आहे. याचा मोठा फटका टोमॅटो उत्पादकांना बसला असून, टोमॅटो दर वाढीचा फायदा काही शेतकऱ्यांना झाला असला तरी तो फायदा सरसकट सर्व टोमॅटो उत्पादकांना झालेला नाही.

परतीच्या पावसाचा फटका केवळ टोमॅटोवरच नाही तर फळे आणि इतर सर्व भाज्यांवरही झाला आहे. सध्या भाजी मंडईतील भाजीपाल्याची आवक 35 ते 40 टक्क्यांनी घटली आहे. वाशीच्या एपीएमसी मार्केटमध्ये टोमॅटोचा भाव 30 ते 40 रुपये किलो झाला आहे, तर किरकोळ बाजारात हाच भाव 60 ते 70 रुपये किलो झाला आहे.
मोठी बातमी : रब्बीच्या सहा पिकांच्या आधारभूत किमतीत वाढ
गेल्या तीन-चार दिवसांपूर्वी टोमॅटोचा भाव 30 ते 40 रुपये किलो होता, तो आता किरकोळ बाजारात 60 ते 70 रुपये किलोवर पोहोचला आहे. याचा सर्वसामान्यांच्या खिशावर मोठा परिणाम होत आहे. पावसामुळे टोमॅटोची आवक कमी झाल्याने टोमॅटोचे भाव आणखी वाढण्याची शक्यता व्यापरीवर्गातून व्यक्त होत आहे.
परतीच्या पावसाचा राज्यातील सर्वच शेती पिकांवर परिणाम होत आहे. या पावसामुळे शेतीमालाच्या उत्पादनातही घट होत आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे टोमॅटोसह इतर पिकांचेही नुकसान झाले आहे. त्यामुळे बाजारात आवक कमी होत आहे. परिणामी, दर वाढत आहेत. भाज्या आणि फळांच्या किमती किती वाढल्या आहेत.

किरकोळ बाजारात फळांपासून सर्वच भाज्यांची आवक कमी असल्याने दरात वाढ होताना दिसत आहे. भाजीपाला आणि फळांचे पूर्वीचे आणि आताचे भाव पुढीलप्रमाणे टोमॅटो 40-70 रुपये, शिमला मिरची 80-120, कोबी 60 ते 80, फ्लॉवर 100-150, वाटाणा 120-280 किलो, भेंडी 120-140, बटाटा 30-50, लिंबू 5-8, बीट 80-120 रुपये, केळी 80 -100, सफरचंद 250- 200, डाळिंब 150 -300, पपई 50 -70, कलिंगड 30- 50, खरबूज 40 -100 किवी 150- 200, संत्री 300- 200 अशी भाववाढ झाली आहे.
ब्रेकिंग न्यूज : चिंताजनक : डिसेंबरपर्यंत पाऊस ?

https://www.facebook.com/shetimitramagazine03

https://www.instagram.com/shetimitra03/

https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1