जमिनीचा पोत सुधारतो. मातीच्या कणांच्या रचनेत योग्य असा बदल घडविला जातो. गांडूळाच्या बिळांमुळे झाडांच्या मुळाना इजा न होता उत्तम मशागत केली जाते. जमिनीत पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते. जमिनीची धूप कमी होते. बाष्पीभवनाचे प्रमाण कमी होते. जमिनीचा सामू योग्य पातळीत राखला जातो. गांडूळे खालच्या थरातील माती वर आणतात व तिला उत्तम प्रतीची बनवतात. गांडूळखतामध्ये ह्युमसचे प्रमाण भरपूर असल्याने नत्र, स्फुरद, पालाश व इतर सुक्ष्मद्रव्ये झाडांना भरपूर व लगेच उपलब्ध होतात. जमिनीतील उपयुक्त जिवांणूच्या संख्येत भरमसाठ वाढ होते. या उपयोगाखेरीज गांडूळ व गांडूळखताची शेतकर्यांना पुढीलप्रमाणे मदत होते. इतर रासायनिक खतावर पूर्णत: अवलंबून न राहता स्वयंपूर्ण होण्याच्या दिशेने वाटचाल करणे गरजेचे आहे. जमिनीची उत्पादनक्षमता वाढविली जाते.पाणी देण्याच्या कालावधी कमी होतो. उत्तम प्रतीचे व विक्रमी उत्पादन करून मालाला योग्य भाव मिळविता येतो.
रासायनिक खतांचा खर्च कमी होतो. आणि पिकांच्या निरोगी वाढीमुळे किटकनाशकांच्या खर्चात बचत होते त्याच बरोबर मजुरांचा खर्च कमी होतो. गांडूळखत निर्मितीमुळे ग्रामीण भागात बेरोजगारांना रोजगाराची संधी मिळते. पर्यावरणाच्या संदर्भात विचार करावयाचा म्हटलं तर गांडूळे तयार होतात. हवा, पाणी, जमीन प्रदूषणमुक्त करते. जमिनीची धूप व क्षारांचे प्रमाण कमी करते. कचर्याच्या विल्हेवाटीने आरोग्यसंदर्भाचे प्रश्न कमी होतात.
इतर उपयोग : पक्षी, कोंबड्या, पाळीव जनावरे आणि मासे याना उत्तम प्रतीचे खाद्य गांडूळ वापरता येतात. गांडूळापासून अॅमिनोअॅसिड, इन्झाइमस् आणि मानवासाठी औषधे तयार करता येतात. पावडर, लिपस्टीक, मलमे यासारखी किंमती प्रसाधने तयार करण्यासाठी गांडूळांचा वापर केला जातो. परदेशात पिझ्झा, ऑम्लेट, सॅलड यासारख्या खाद्य वस्तूमध्ये प्रथिनांची कमतरता भरून काढण्यासाठी गांडूळाचा उपयोग करतात. गांडूळाच्या कोरड्या पावडरमध्ये 60 ते 65 टक्के प्रथिने असतात. तिचा अन्नात वापर करता येतो. तसेच गांडूळापासून तयार होणारे व्हर्मेावॉशसुद्धा पिकांसाठी खूप फायदेशीर ठरते.