Baba Maharaj Satarkar : आपल्या अनोख्या कीर्तन शैलीने घराघरात कीर्तनाची गोडी वाढविणारे ज्येष्ठ कीर्तनकार (Veteran kirtanist) बाबामहाराज सातारकर (Baba Maharaj Satarkar) यांचे आज निधन (passed away) झाले. वयाच्या 88 व्या वर्षी वृद्धापकाळाने त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आपल्या रसाळ वाणी (Gracious Voice) आणि मार्मिक शैलीने (Poignant Style) देश विदेशातील मराठी मनावर गारुड करणाऱ्या बाबामहाराजांच्या निधनाने वारकरी संप्रदायावर मोठा आघात झाला आहे.
महत्त्वाची माहिती : रांगडा कांदा भरघोस उत्पादणासाठी असे करा नियोजन
ते गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. नवी मुंबईतील नेरुळ येथे आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. आज दुपारी तीन वाजल्यानंतर नेरुळ जिमखान्याच्या समोर असलेल्या आणि बाबामहाराजांनी बांधलेल्या विठ्ठल रखुमाई मंदिरात त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. तर उद्या संध्याकाळी पाच वाजता नेरुळ स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
नीळकंठ ज्ञानेश्वर गोरे (Neelkanth Dnyaneshwar Gore) हे बाबामहाराज सातारकर यांचे मूळ नाव. त्यांचा जन्म 5 फेब्रुवारी 1936 रोजी साताऱ्याच्या नामवंत गोरे सातारकर घराण्यात झाला. त्यांनी वकिलीचे पदवीपर्यंत शिक्षण घेतले. त्यांच्या घराण्यात गेल्या तीन पिढ्यांपासून कीर्तनाची व प्रवचनाची (Sermon) परंपरा चालत आली आहे.
वारकरी संप्रदायातील (Varkari Sapraday) प्रमुख फड म्हणून त्यांच्या घराण्याच्या सातारकर फडाचे (Satarkar Phad) नाव घेतले जाते. प्रवचनकार दादामहाराज सातारकर यांनी या फडाची सुरुवात केली. त्यांचे दुसरे पुत्र अप्पामहाराज सातारकर यांनी फडाची धुरा सांभाळली. 1962 साली अप्पामहाराजांचे निधन झाल्यावर अप्पामहाराजांचे पुतणे नीळकंठ ज्ञानेश्वर अर्थात बाबामहाराज सातारकरांनी फडाची परंपरा सांभाळली.
आपल्या अनोख्या कीर्तनशैलीने वारकरी संप्रदायाचे विचार त्यांनी घराघरात पोहोचवले. श्रीविठ्ठलाचे (Srivitthal) कीर्तन (Kirtan) आणि ज्ञानेश्वरीतील (Dnyaneshwari) विचारधारा बाबामहाराजांनी सामान्यांपर्यंत अत्यंत सामान्य भाषेत पोहोचवली.
मोठी बातमी : डॉ. प्रवीण गेडाम नवे कृषी आयुक्त : कामाला धडाकेबाज सुरुवात
https://www.facebook.com/shetimitramagazine03