जूनचा पहिला आठवडा सरला तरी राज्यात मान्सूनच्या सरी बरसलेल्या नाहीत. त्यामुळे पेरणीची कामे करावी की, नाही ? अशा द्विधा मनस्थितीत शेतकरी आहेत. मात्र मान्सून उशीराने येत असल्याने शेतकऱ्यांनी पेरणीसाठी घाई करू नये, असा सल्ला कृषीमंत्री दादा भुसे यांनी शेतकऱ्यांना दिला आहे.

यंदाच्या वर्षी मान्सून वेळेपूर्वी येणार, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला होता. परंतु जूनचा पहिला आठवडा सरला तरी राज्यात मान्सूनचा पत्ता नाही. कर्नाटकात दाखल झालेला पाऊस गेल्या काही दिवसांपासून कारवार, चिकमंगळूर या कर्नाटक-गोवा सीमाभागात रेंगाळलेला आहे. मान्सूनला पुढे सरकण्यासाठी अनुकूल वातावरण मिळाल्यास 12 ते 13 जूनच्या आसपास मान्सून राज्यात येण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाच्या वतीने सांगण्यात येत आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहे.
आनंदाची बातमी : आता रेशन दुकानातही मिळणार भाजीपाला आणि फळे
यंदा मान्सून उशीरा येत असल्याने शेतकऱ्यांनी पेरणीसाठी घाई करू नये, किमान 80 ते 100 मिमी पाऊस पडल्याशिवाय कोणत्याही शेतकऱ्यांनी आपल्या शेतात पेरणी करु नये, असे कृषीमंत्री दादा भुसे यांनी सांगितले आहे. पाऊस पुरेसा झाला नाही, तर दुबार पेरणीची वेळ येईल, त्यामुळे पेरणीसाठी शेतकऱ्यांनी काही काळ पावसाची वाट पाहावी, असे आवाहन कृषिमंत्र्यांनी शेतकऱ्यांना केले आहे.

लक्षवेधी बातमी : शेतकरी अपघात विमा योजना नव्या रूपात शक्य
अंगाची लाहीलाही करणाऱ्या उकाड्यानं सर्वसामान्यांना अगदी हैराण केले आहे. अशातच सर्वचजण पावसाची चातकासारखी वाट पाहत आहेत. पण, राज्यात मात्र अद्यापही उष्णतेची लाट कायम आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या महाराष्ट्रातील प्रवेशाला सध्या अडथळा निर्माण झाला आहे. यंदा मान्सून लवकर दर्शन देणार, असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला होता. पण मान्सून मात्र अद्याप महाराष्ट्राच्या सीमेवरच रेंगाळला आहे. काही दिवसांपासून मान्यून कर्नाटकातील कारवारमध्ये अडकला होता. आता तो मान्सून गोव्याच्या सीमेवर रेंगाळला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील आगमनासाठी आता नवा मुहुर्त देण्यात आला आहे.
ब्रेकिंग न्यूज : मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेत वैयक्तिक शेततळ्याचा समावेश
कर्नाटकात दाखल झालेला पाऊस गेल्या काही दिवसांपासून कारवार, चिकमंगळूर या कर्नाटक-गोवा सीमाभागात रेंगाळलेला आहे. मान्सूनला पुढे सरकण्यासाठी अनुकूल वातावरण मिळाल्यास 12 ते 13 जूनच्या आसपास मान्सून राज्यात येण्याची शक्यता आहे. सध्या कोकण, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र या भागांत ढगाळ वातावरण असल्यानं उकाडा चांगलाच वाढला आहे. तर विदर्भात उष्णतेची लाट कायम आहे. काही भागांत पुढील दोन-तीन दिवसांत मान्सूनपूर्व सरींचाही अंदाज वर्तवण्यात आला आहे.
मान्सून अपडेट : मान्सूनचे आगमनाचा मुहूर्त लांबला : उष्णतेची लाट कायम

https://www.facebook.com/shetimitramagazine03

https://www.instagram.com/shetimitra03/

https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1