हवामान बदलाचा मोठा परिणाम शेतीवर झाला आहे. मध्यंतरी झालेल्या आवळली पावसामुळे एनएमके-1 सिताफळाच्या बागा फुटल्या आहेत. त्यामुळे आता फुटलेल्या सीताफळ बागांची छाटणी कशी करायची हा प्रश्न निर्माण झाला आहे. मात्र काळजी करू नका ! आता मेच्या शेवटच्या आठवड्यात छाटणी करा आणि नंतरच पाणी द्या ! असा सल्ला डॉ. नवनाथ कसपटे यांनी दिला.
महत्त्वाची बातमी : सिट्रस इस्टेटचे लोकार्पण : मोसंबीच्या दर्जेदार रोपांची निर्मिती होणार
बार्शी (जि. सोलापूर) येथील सीताफळ संशोधन केंद्र तथा मधुबन फार्म आणि नर्सरी येथे काल रविवारी (दि. 21) झालेल्या राष्ट्रीय सीताफळ प्रशिक्षण शिबिरात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हा कृषी अधिक्षक अधिकारी बाळासाहेब शिंदे होते.
एनएमके-1 गोल्डन सीताफळ लागवडीची पद्धत; संगोपण आणि पोषण तंत्रज्ञान या विषयावर हे प्रशिक्षण शिबीर पार पडले. या प्रशिक्षणाला महाराष्ट्रात आणि आंध्र प्रदेशातील सुमारे 98 जिल्ह्यातील सुमारे 120 प्रशिक्षणार्थी शेतकरी उपस्थित होते. शिवाय उमरगा येथील तालुका कृषी अधिकारी सागर बारवकर, प्रसेनजित जानराव, तालुका गुण नियंत्रण अधिकारी गणेश पाटील, अॅड. विक्रम सावळे, अॅड. अजीत मस्कर (भूम), तानाजी घाडगे (कोल्हापूर), दीपा दरेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
ब्रेकिंग : अंदाज चुकवत मान्सून अंदमानात
सीताफळ शेतीतून ऊस किंवा फळबागे येवढे उत्पन्न मिळू शकते असे सांगून, डॉ. कसपटे म्हणाले, सीताफळ शेतीतून अधिक, दर्जेदार आणि खात्रीशीर उत्पादन मिळविण्यासाठी जास्तीत जास्त शेणखताचा वापर करावा°. चांगली जमीन असल्यास नायट्रोजन अजीबात देवू नये. लागवडीनंतर दोन वर्षानंतर पिन्सील आकाराच्या काड्या झाडाला राहातील या हिशोबाने छाटणी करावी. झाडाची उंची 10 फुटापर्यंत राहील याची काळजी घ्यावी. असे ते म्हणाले.
यंदा सिताफळाचे दर निचांकी घसरण्यामागे एनएमके-1 गोल्डन सीताफळ रोपांची विक्री करणाऱ्या बोगस रोपवाटिका चालकांकडून रोपे विकत घेणाऱ्या शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन झाले नाही. परिणामी फळमाशीचा प्रादुर्भाव झाला. ग्राहकांमध्ये सीताफळ खरेदीबाबत नाखुशी निर्माण झाली. मागणी घटल्याने दर घसरले, असे सांगून डॉ. कसपटे यांनी फळमाशी नियंत्रणासाठी क्लोरोपायरीफास आणि फेन्डॉल (प्रत्येकी 2 एमएल) प्रती लीटर पाण्यात घेवून स्टीकर टाकून आलटून पालटून फवारणी करावी. ही फवारणी फळकाढणी पूर्वी 15 दिवस आधी सुरू करुन आठ दिवसाच्या अंतराने फळेसंपेपर्यंत करावे, असे सांगीतले.
पार चढला : राज्यात उष्माघाताचे 12 बळी
यावेळी बोलताना जिल्हा कृषी अधिक्षक अधिकारी बाळासाहेब शिंदे म्हणाले, सध्या फळबागे शिवाय शेतकऱ्यांना मिळत नाही. ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे शासनाच्या योजनांचा लाभ घेवून आता शेतकऱ्यांनी फळबागेकडे वळले पाहिले. एनएमके-1 सीताफळाने क्रांती केली आहे. सर्वसामान्य शेतकऱ्यांना पैसा मिळवून दिला आहे. या प्रशिक्षणाचा सीताफळ उत्पादक शेतकऱ्यांना चांगला फायदा होणार आहे. सीताफळ लावू इच्छिणार्या शेतकऱ्यांनीही या प्रशिक्षणाचा फदयदा करून घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी सेवानिवृत्त कृषी अधिकारी तानाजी घाडगे यांनी सीताफळाची सेंद्रिय शेती कशी करता येईल याबद्दल मार्गदर्शन केले. त्यांनी सीताफळ शेतीमील मिलिबग्जचे सेंद्रिय पद्धतीने कसे नियंत्रण करता येईल याची सविस्तर माहिती उपस्थित शेतकर्यांना दिली.
उमरगा येथील तालुका कृषी अधिकारी सागर बारवकर यांनी यावेळी उपस्थित शेतकर्यांना कृषी विभागाच्या सर्व योजनांची माहिती दिली. तर रविंद्र कसपटे यांनी सीताफळावरील कीड-रोगाचे नियंत्रण याबाबत उपस्थितांना सविस्तर माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नरेश ठाकूर यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रविण कसपटे, नितीन आरगडे, नवनाथ जगताप, आत्माराम बुरंगे यांनी परिश्रम घेतले.
शरद मँगो : शरद पवारांच्या नावाने आंबा !
https://www.facebook.com/shetimitramagazine03
https://www.instagram.com/shetimitra03/
https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1