शेतकऱ्यांना 12 तास वीज देण्यासाठी शेतीचे सर्व फीडर सौरऊर्जेवर आणणार असल्याचे वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. पानी फाऊंडेशनचा फार्मर कप स्पर्धा 2022 चा भव्य पुरस्कार वितरण सोहळा नुकताच पुण्यात पार पडला. या कार्यक्रमात फडणवीस बोलत होते.
मोठी बातमी : पीकविम्याचे पैसे 31 मे पर्यंत देणार : कृषीमंत्री अब्दुल सत्तार
दिवसा 12 तास वीज द्या, अशी शेतकऱ्यांची सातत्याने मागणी होत असल्याचे सांगून, फडणवीस म्हणाले, शेतकऱ्यांना 12 तास वीज देण्यासाठी आपण एक निर्णय घेतला आहे. यासाठी सोलरवर आम्ही भर देत आहोत. याचा पहिला प्रयोग आपण 2017 मध्ये अण्णा हजारे यांच्या राळेगणसिद्धी या गावात केला होता. तो खूप यशस्वी सत्यात उतरला असल्याचे ते यावेळी म्हणाले.
शेतकऱ्यांना दिवसा वीज दिलीच पाहिजे असे सांगून ते म्हणाले, त्यासाठी आम्ही सोलरवर भर देत आहोत. यावर्षी 30 टक्के फिडर आम्ही सौरऊर्जेवर आणणार आहोत. त्याठिकाणी दिवसा 12 तास शेतकऱ्यांना वीज मिळेल. यावर्षीपासून सोलरच्या संदर्भातील काम सुरु करणार आहोत. पुढच्या दोन वर्षात सर्व काम पूर्ण होईल, असे फडणवीस यावेळी म्हणाले.
हे नक्की वाचा : शेतकऱ्यांनी जमिनी विकू नयेत : राज्यपाल रमेश बैस
राज्यात ज्या ठिकाणी शेतीत काही फारसे पिकत नसेल अशी नापिकी असलेली जमीन 30 वर्ष भाड्याने घ्यायला सरकार तयार असल्याचे सांगून ते म्हणाले, शेतीची मालकी शेतकऱ्यांचीच असणार आहे. त्या बदल्यात आम्ही त्या शेतकऱ्यांना वर्षाला 75 हजार रुपये भाडे देणार आहोत. दरवर्षी त्यामध्ये दोन टक्क्यांची वाढ करून, 30 वर्ष तुमच्या शेतीचा वापर सोलरसाठी करु त्यानंतर 30 वर्षांनी शेतकऱ्यांची शेती शेतकऱ्यांना परत करु ! त्यामुळे जिथे शेती नापिकी आहे किंवा शेतकऱ्याला शेती करायला वेळ नाही, घरी शेती करणारे कोणी नाही, अशा शेतकऱ्यांनी आम्हाला शेती द्यावी, असे आवाहन फडणवीसांनी यांनी यावेळी केले.
गेल्या तीन वर्षात शेतकऱ्यांवर अनेक संकट आली असल्याचे सांगून फडणवीसा म्हणाले, यासाठी शाश्वत शेतीकडे वळावे लागेल. यासाठी विषमुक्त शेती गरजेची आहे. सध्या शेतीत रासायनिक वापर होत असल्याने आपल्या काळ्या आईची शक्ती समाप्त झाली आहे. दुसरीकडे तेच अन्न खाऊन कॅन्सर सारख्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. प्रत्येक चार ते पाच घरानंतर कॅन्सरचे रुग्ण आढळत आहेत. हे टाळायचे असेल तर नैसर्गिक शेतीच आपल्याला करावी लागेल, असे फडणवीस यावेळी म्हणाले.
मोठी बातमी : कांदा उत्पादक शेतकऱ्यांना प्रति क्विंटल 300 रुपये सानुग्रह अनुदान
https://www.facebook.com/shetimitramagazine03
https://www.instagram.com/shetimitra03/
https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1