सर्वसामान्य कष्टकरी शेतकऱ्यांच्या उसावर काटामारीतून वर्षाला सुमारे 4500 कोटींचा दरोडा टाकणाऱ्या ऊस कारखानदारांना यावर्षी त्यांचाच ‘काटा’ काढल्याशिवाय सोडणार नाही, असा इशारा माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला. येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या एकरकमी एफआरपीच्या जागर यात्रेच्या प्रारंभ सभेत ते बोलत होते.
ब्रेकिंग : मान्सून निरोपाच्या वाटेवर; असे करा शेती कामाचे नियोजन
शेट्टी म्हणाले, की एकरकमी एफआरपी मिळणे, हा शेतकऱ्यांचा हक्क आहेच पण गेल्यावर्षीचे एफआरपी अधिक 200 रुपये साखर कारखानदारांच्या मानगुटीवर असून घेतल्याशिवाय राहणार नाही. इथेनॉलच्या नव्या धोरणामुळे व कारखान्यातल्या उपपदार्थांना चांगला दर मिळत आहे. यावर्षी 100 लाख टन साखर निर्यात झाली आहे. त्यामुळे कारखानदारांकडे बक्कळ पैसा आहे. मग शेतकऱ्यांना जादाचे पैसे का देत नाही, असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला. हे सुखासुखी मिळत नसेल तर नरड्यावर बसून घेऊ यासाठी शेतकऱ्यांनी संघर्षाची तयारी ठेवावी.
या वेळी भाई भारत पाटील, संघटनेचे जिल्हा युवा अध्यक्ष अजित पवार, अमर पाटील, मानसिंग पाटील यांची भाषणे झाली.
महत्त्वाची बातमी : लम्पी स्कीन आजारावर आता सरसकट लसीकरण : विखे पाटील
https://www.facebook.com/shetimitramagazine03
https://www.instagram.com/shetimitra03/
https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1