उद्याच्या शेतीला चालना देण्यासाठी शेतीसंदर्भात सुरु असलेल्या विविध संशोधनामुळे शेती वरच्यावर समृध्द होत आहे. जगातील शास्त्रज्ञ शेती क्षेत्रात रोज नवनवीन प्रयोग करीत आहेत. ऑस्ट्रेलियामधील शास्रज्ञांनी कापड उद्यागासाठी कच्चामाल असलेल्या कापूसमध्ये लक्षिवेधी संशोधन केले आहे.
ऑस्ट्रेलिया येथील राष्ट्रीय विज्ञान संस्था अर्थात सीएसआयआरओच्या प्रयोगशाळेत शास्त्रज्ञांनी नविन कापूस विकसित केला आहे. येथील शास्त्रज्ञांना जनुकीय दृष्ट्या सुधारित जिएम कापूस तयार करण्यास यश आले आहे. या संस्थेने कपसाचे रंगीत टिशू अर्थात रंगीत उती विकसित केली आहे. येत्या काही दिवसात या कलर टीशुची येथील शास्त्रज्ञ पोषक वातावरणात लागवड करणार असल्याचे सांगितले जात आहे.

हा रंगीत कापूस पुनरुत्पादन करण्यास सक्षम असणार आहे. लवकरच हा रंगीत कापूस शेतकऱ्यांना लागवडीसाठी उपलब्ध होणार असून, आगामी काही दिवसात जगातील शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे. या कपाशीची सर्वात मोठी विशेषता म्हणजे या कपाशी पासून मिळणाऱ्या तंतुमय पदार्थ अर्थात फायबर पासून थेट रंगीत वस्त्र बनवता येणे शक्य होणार आहे.

या कापसाचा धागा निसर्गाता रंगीत असणार आहे. त्यामुळे कापड तयार करण्यासाठी नव्याने रंगकामाची गरज भासणार नाही. या कापसामुळे थेट रंगीत कापड निर्मिती करणे आता शक्य होणार असल्याचा दावा कृषी वैज्ञानिकांनी केला आहे.
कपड्यांना रंग देण्यासाठी लाखो लिटर पाण्याची आवश्यकता लागते. शिवाय कपड्याला रंग देणार्या मजुरांना अनेक रोगांना सामोरे देखील जावे लागते. त्यांना त्वचा रोग, पोटाचे विकार, कॅन्सर, दमा यांसारखे रोग होत असल्याचे निदर्शनास आले आहेत.

याशिवाय कापडाला रंगरंगोटी करण्यासाठी ज्या केमिकल चा उपयोग केला जातो त्यामुळे जमिनीचे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत असल्याचा दावा केला गेला आहे. म्हणून ऑस्ट्रेलियात विकसित केलेल्या या रंगीत कापसामुळे कापडासाठी रंगाचा वापर टाळता येणे शक्य होणार आहे. त्यामुळे पाण्याची बचत तर होणार असून, मजुरांना होणारे रोग तसेच जमिनीचे होत असलेले प्रदूषण या सर्व गोष्टी टाळता येणे शक्य होणार आहे.

ऑस्ट्रेलियामध्ये विकसित केल्या गेलेल्या कापसामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा चांगलाच फायदा होणार आहे. पांढरा कापूस लवकर काळा पडतो किंवा पांढरा कापसाचा लवकर दर्जा खराब होत असतो. मात्र ऑस्ट्रेलियात विकसित केला गेलेला हा रंगीत कापूस या समस्येपासून वाचू शकतो आणि यामुळे या नवीन विकसित केलेल्या कापसाचा दर्जा अधिक काळ अबाधित राहू शकतो. तसेच हा कापूस रंगीत असल्याने या कापसाला पांढऱ्या कापसापेक्षा अधिक बाजार भाव प्राप्त होण्याची दाट शक्यता आहे. यामुळे येत्या काही वर्षात कापूस उत्पादक शेतकर्यांची चांदी होणार असल्याचे सांगितले जात आहे.

https://www.facebook.com/shetimitramagazine03

👇 https://www.instagram.com/shetimitra03/ 👇

https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1
आपणास ही बातमी आवडली असल्यासखालील स्टार क्लिक करून रेटींग करा 👇