खरीप हंगामाच्या तोंडावर दमदार पावसाची प्रतिक्षा असताना पावसाने दडी मारल्याने शेतकर्यांच्या तोंडचा घास पळाला आहे. दरम्यान, शेतकर्यांना दिलासा देणारी माहिती भारतीय हवामान विभागाने दिली असून, येत्या पाच दिवसातील पावसाचे नवीन अपडेटस दिले आहेत.
भारतीय हवाना विभागाचे तंज्ज्ञ के. एस. होसाळीकर यांनी यासंदर्भात ट्विट करून येत्या पाच दिवसात राज्यातील पावसाची स्थिती काय राहणार या विषयी माहिती दिली आहे. त्यामुळे शेतकर्यांमध्ये काही अंशी समाधानाचे वातावरण पसरले आहे. यंदा मान्सून उशीरा सुरू झाला तरी त्याच्या अगमनानंतर राज्यातील शेतकर्यांनी खरीप पेरण्या सुरू केल्या. काही भागात पेरण्या लांबल्या, काही भागात पूर्णही झाल्या. मात्र चांगली सुरूवात केलेल्या पावसाने मध्यंतरीच दडी मारली. त्यामुळे पेरणीची कामे खोळंबली, तर ज्या भागात पेरण्या झाल्या तिथे दुबार पेरणीचे संकट उभे राहिले. आजच्या स्थितीला राज्यातील सर्वसाधारण सहा जिल्ह्यात दुबार पेरणीचे संकट आहे. त्यामुळे शेतकर्यांचे लक्ष आता केवळ पावसाकडे लागले आहे. अशातच जुलै महिन्यात पाऊस पडण्याची चिन्हे असल्याची माहिती भारतीय हवामान विभागाने दिल्याने शेतकर्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.
भारतीय हवामान विभागाने पुढील पाच दिवसाचा पावसाचा अंदाज जारी केला आहे. या अंदाजानुसार ७ आणि ८ जुलै रोजी पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, पूर्व विदर्भात जोरदार पाऊसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या दोन दिवसाता महाराष्ट्रात ढगांच्या गडगडासह पाऊस हजेरी लाऊ शकतो असेही अंदाजात म्हटले आहे.
या जिल्ह्यांना यलो अलर्ट
या अंदाजानुसार पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, अहमदनगर, बीड, जालना, उस्मानाबाद, लातूर, परभणी, नांदेड, हिंगोली, नागपूर, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, गडचिरोली या जिल्ह्यात पावसाचा अंदाज असून, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, पूर्व विदर्भातील या जिल्ह्यांना यलो
अलर्ट देण्यात आला आहे.
सिंधुदुर्गात पुनर्श्च मान्सून…
दडी मारलेल्या पावसाने आज सकाळपासून सिंधुदुर्ग जिल्ह्यात संततधार सुरूही केली आहे. किणारपट्टीवर पावसाचा जोर वाढला आहे. मालवण, कुडाळ आणि सावंतवाडीत दमदार पाऊस कोसळत आहे. तसेच काल दुपार नंतर मराठवाड्यातील काही भागात पावसाने हजेरेही लावली आहे. लातूर भागात काल दुपारनंतर पावसाचा जोरदार सडाका झाला आहे.
https://www.facebook.com/shetimitramagazine03
आपणास हा बातमी आवडली असल्यास खालील स्टार क्लिक करून रेटींग करा