पपई लागवडीचे क्षेत्र वाढत असले तरी पपई उत्पादनातील अडचणीही मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. पपईवर येणार्या व्हायरसमुळे पपईच्या बागा जळल्याचे अनुभव पपई उत्पादक शेतकर्यांकडून सांगण्यात येतात. याचे मुख्य कारण म्हणजे पपई बागेची जोपासणा हे आहे. लागवडीबरोबरच बागेची काळजी घेणे आणि उपाययोजना करणे यातून मोठ्या खर्च टाळून उत्पादनात वाढ करता येऊ शकते.
पपईची मागणी वाढत असली, लागवड वाढत असली तरी उत्पादनातील समस्या कमी नाहीत. त्यामुळे सरसारी उत्पादन जेवढे हवे तोवढे काढले जात नाही. भारतामध्ये पपईची लागवड बिहार, ओरिसा, कर्नाटक, महाराष्ट्र, तामिळनाडू आणि उत्तरप्रदेश या मुख्य राज्यांत होते. सध्या जागतिक पातळीवर पपईचे उत्पादन ६५ लाख टन आहे.
गेल्या काही वर्षात देशातील पपई निर्यातीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. तसेच निर्यातमूल्यही वाढले आहे. त्यामुळे पपई हे फायद्याचे पीक म्हणून ओळखले जावू लागले आहे. अधिक उत्पादनासाठी पपई लागवडीबरोबर बागेची जोपासणा कारणे अतिशय महत्त्वाचे ठरते.
पपई लागवडीचे अर्थशास्त्र व व्यवस्थापन
जमीन : पपईसाठी काळी, लाल, मध्यम, हलकी व निचरा होणारी जमीन निवडावी.
लागवडीचे अंतर : ८ x ६ फुट असावे. पूर्व-पश्चिम ८ फुट व उत्तर दक्षिण ६ फुट असावे. लागवडीपूर्वी जमीन खोलवर नांगरून, भुसभुशीत करावी. लागवडीपूर्वी जमिनीस थोडीशी विश्रांती दिलेली असावी. लागवड करण्यापूर्वी जमीन, बैल नांगर अथवा सहाय्याने प्रत्येकी ८ फुट अंतरावर सरी पाडून घ्यावी. अथवा ठिंबक सिंचनाचा वापर करणारा असल्यास मध्यम आकाराचे बेड तयार करून घ्यावेत.
लागवडीपूर्वीचे खते : लागवडी करण्यापूर्वी सरी अथवा बेडमध्ये प्रति एकरी चांगले कुजलेले शेणखत साधारणपणे १५ ते २० बैलगाडी (पाच ते सहा ट्रेलर) शेणखत आणि निंबोळी पेंड ५०० किलो शेणखतावरती पसरून टाकावे व रोटरच्या सहाय्याने ही खते बेडवर चांगली मिसळून घ्यावीत. त्यापासून २ फुट रूंद व ६ इंच उंची बोध तयार करून घ्यावेत. बोधच्या मध्यभागी ठिंबक लॅटरची मांडणी करून घ्यावी.
पाणी व्यवस्थापन : लागवडीअगोदर एक ते दोन वेळा पाणी सोडून बोध चांगले भिजवून घ्यावेत. म्हणजे त्यातील उष्णता बाहेर पडते. त्यानंतर पिशव्यातील रोपांना अगोदर रात्री पाणी देवून भिजवावे. रोपांची लागणी शक्यतो दुपारी चार ते सायंकाळी सात वाजेपर्यंत करावी. लागवडीनंतर प्रतीरोपांच्या भोवताली एक लिटर पाणी ओतावे. म्हणजे रोपांची हुंडी व माती ओली होऊन एकजीव होते. त्यामुळे रोपांची मर कमी प्रमाणात होते. त्यानंतर लगेच ठिंबक सुरू करून पाणी द्यावे. पाण्याच्या पाळ्या, झाडांच्या आवश्यकतेनुसार असाव्यात की, ज्यामुळे पपईस जास्त चिखल अथवा पाणी कमीही पडता कामा नये. पपई पिकासाठी थिमेट व फोरेटचा वापर करू नये.
पपई जात : रेड लेडी तैवान ७८६ (नोन यु सीड के प्रा. लि.) शक्यतो तयार दीड ते दोन महिने वयाच्या रोपांची लागवड करावी. (४ ते ६ इंच उंच)
औषध फवारणी : लागवडीनंतर १५ दिवसांनी रोगर एक मिली + बाविस्टीन पावर एक ग्रॅम+ एक लिटर पाणी यांची फवारणी करावी.
एक महिन्यानंतर : लागवडीनंतर एक महिन्याने मोनोक्रोटोफॉस दोन मिली+डायथेन झेड 78 पावडर दोन ग्रॅम+ एक लिटर पाणी यांची फवारणी करावी.
थंडीच्या वेळी शेंडा अडकतो : थंडीच्या काळात शेंडा अडकतो तेव्हा परफेक्ट किंवा अॅक्शन १०० किंवा व्हायरस एच यापैकी एक औषध एक मिली + एक लिटर पाणी याची फवारणी करावी.
भुरीसाठी : भुरीच्या नियंत्रणासाठी सल्टॉफ पावडर २ ग्रॅम + २ मिली + १ लिटर पाणी याची फवारणी करावी.
भुरीसाठी दुसरी फवारणी (१५ दिवसानंतर) : भुरीचा अटकाव थांबविण्यासाठी बेलॉटीन एक ग्रॅम + १ लिटर पाणी याची दुसरी फवारणी करावी.
मिलीबगसाठी : मिलीबगच्या नियंत्रणासाठी बायर कंपनीचे आडमायर, ड्रिपमधून एकरी २०० लिटर पाणी + १५० ग्रॅम आडमायर पावडर, एकरी फवारणीचे प्रमाण २०० लि. पाणी + ३० ग्रॅम आडमायर पावडर यांची फवारणी करावी.
पाने पिवळी व पातळ : हरीत द्रव्याच्या कमतरता टाळण्यासाठी ट्रेसर किंवा मॅग्नेशियम पावडर २ ग्रॅम + १ लिटर पाणी याची फवारणी करावी.
पपईसाठी खते : लागवडीनंतर दीड महिन्यांनी, पहिला डोस प्रति झाडास १८:४२:० हे खत ५० ग्रॅम + झिंक सल्फेट २५ ग्रॅम + बोराकॉल २५ ग्रॅम एकत्र मिसळून झाडापासून ९ इंच अंतरावर रिंग पद्धतीने टाकून बुजवावे. त्यानंतर दुसरा डोस अडीच ते ३ महिन्याच्या दरम्यान (फळकळीच्या वेळेत) शेणखत २ पाटी + स्टेरामिल किंवा बायोफर्टीलायझर (जीवाणू खत) १२५ ग्रॅम + १८:४६:० (डीएपी) १०० ग्रॅम + सुपर फॉस्फेट १०० + पोटॅश (एम.ओ.पी.) १०० ग्रॅम + बोरॉकॉल ५० ग्रॅम असा एकूण ५०० ग्रॅम खताचा भेसल डोस झाडांच्या दोन्ही बाजूस निम्मे-निम्मे करून टाकावे व त्यानंतर मातीचा बोध ३ फुट रूंद व १ फुट उंची ठेवून (मातीचा थर बांधणी करावी) बांधणीनंतर २ ते अडीच महिन्यांनी डी. ए. पी. (१८:४६) ३०० ग्रॅम + पोटॅश २०० ग्रॅम अधिक सेंद्रिय खत (बायोफर्टीलायझर) ५०० ग्रॅम एकत्र मिसळून झाडाच्या दोन्ही बाजूस ड्रीपर खाली अर्धे टाकावे. त्यानंतर प्रत्येकी दोन ते दोन महिन्याच्या अंतराने डी.ए.पी. (१८:४६) ३०० ग्रॅम + पोटॅश २०० ग्रॅम मिसळून झाडाच्या दोन्ही बाजूस ड्रीपरखाली टाकावे. पाटाच्या पाण्याची पद्धत असेल तर वरील खते झाडाच्या दोन्ही बाजूस निम्मे-निम्मे टाकण्यापेक्षा झाडांपासून दीड फुटावरती चंद्र आकाराची रिंग करून टाकावी व त्यावर माती झाकून घ्यावी.
प्राथमिक अवस्थेतील रोग-किड नियंत्रण : पपई पिकाच्या लावणीनंतर सुरवातीला पाने खाणारी अळी व नाकतोडे यांचा प्रादुर्भाव दिसून येतो. नाकडतोडे बर्याचदा पपईच्या शेंडा कुरतडतात. यासाठी मोनोक्रोट्रोफार्स एक मिली + बाविस्टीन पावडर एक ग्रॅम + लिटर पाणी यांची फवारणी करावी. तिव्रता जास्त असल्यास सायपरमेथ्रीन अर्धा मिली एक लिटर पाण्यात फवारावे. जमिनीलगत बुंध्याला वाळवी, हुमणी आळी लागल्यास एकरी ५०० मिलि क्लोरपायरीफॉस आणि १०० लिटर पाणी हे ठिबकमधून द्यावे.
पपईचे अथर्र्शास्त्र : प्रती एकरी लागवडीपासून ४० ते ५० टन पपई फळाचे उत्पादन होऊ शकते. खते, औषधे, लागवडीचा हंगाम इत्यादी अभाव असल्यास उत्पादनामध्ये घट होवू शकते.
पपई बागेची विशेष घ्यावयाची काळजी : पपईसाठी शक्यतो, क्षारपड, चोपण, करल, चुनखड जमीन टाळावी. पपई रोपांची लागवड करताना दोन पपई झाडांमध्ये, मक्याचे बी लागण की, ज्यामुळे मोझॅकचा शिरकाव टाळता येतो. कमी पाणी पडणे अथवा जास्त होणे पपईस हानीकारक करू शकते. पपई बागेच्या सभोवताली शेवरीची लागवड करावी. ज्यामुळे उन्हाची तीव्रता, वार्याचा त्रास वाचतो. लागवडीनंतर १५ ते ३० दिवसांनी ह्युमीक अॅसिड एकरी १ लिटर या प्रमाणात २ वेळेस ठिबकामधून द्यावे. त्यामुळे पांढर्या मुळाची वाढ झपाट्याने होण्यास मदत होते. पपई बागेमध्ये शक्यतो आंतरपिक घेवू नये. हवामान, जमिनीचा प्रकार, खते व पाणी यांच्यामुळे फळांच्या संख्येमध्ये व आकारामध्ये कमी जास्त व फरक पडू शकतो, तसेच उत्पन्नमध्येही फरक पडतो. एकाच बागेमध्ये नर व मादी या दोन्ही झाडांना फळ येतात. परंतु मादी झाडाला गोल आकाराची जास्त फेळ लागतात व नर झाडाला लांबट आकाराची कमी व मर्यादित फळे लागतात. नर झाडांचे व मादी झाडांचे प्रमाण बागेमध्ये कमी व जास्त होवू शकते. ते हवामानावर निसर्गावर अवलंबून असते. आंतरपिक घ्यावयाचे असल्यास झेंडू, कांदा ही पिके चालू शकतात. थंडी जास्त असल्यास किंवा पाणी जास्त झाल्यास किंवा काळी चिकट जमीन असल्यास व निचरा न झाल्यास पपईची वाढ खुंटते व वेड्या, वाकड्या आकाराची फळे जन्मतात व मोझॅक येऊ शकतो व उत्पन्नावर परिणाम होतो. बागेचे यश हे योग्य व्यवस्थापनात अवलंबून आहे. पपई बागेमध्ये तणनाशक फवारणी करू नये.
टिप : पपई हे पीक अतिशय संदेनशील असल्यामुळे आणि वरच्यावर बदलत जाणार्या वातावरणामुळे पपई पिकाची अतिशय काळजी घेणे महत्त्वाचे ठरते. अचानक बदलत्या हवामानामुळे काळजी घेवूनही पपईची फुलगळ होऊ शकते. अथवा फळे लांब परिसरातील जमीन, वातावरण आणि आपले व्यवस्थापन याचा अभ्यास करूनच पपई लागवडीचा निर्णय घ्यावा. अशा अनेक अडचणीमुळे या पिकाची खात्री देता येत नाही याची नोंद घ्यावी.
महत्त्वाच्या सुचना : जुन्या पपईच्या बागेशेजारी शक्यतो नवीन पपईची लागवड टाळावी. रोपे लागवताना बुंध्याच्या चौफेर माती घट्ट दाबावी. त्यामुळे मुळांच्या भोवती पोकळी रहात नाही. अथवा पोकळीमध्ये गरम हवा जावून मर होण्याची शक्यता असते. उन्हाळ्यात ठिंबकाची लॅटरलची नळी तापते. त्यामुळे त्याचा चटका लागू रोपे मरण्याची शक्यता असते. त्यामुळे लॅटरल रोपांपासून अर्धा इंच अंतरावर ठेवावी.
पपईमधील बोडके फार्मचे योगदान : सन १९९२ सालापासून पपई व इतर शेती फळविषयीचे बोडके फार्मचे योगदान अत्यंत बहुमोल आहे. केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर मध्यप्रदेश, छत्तीसगड, गुजरात, उत्तरप्रदेश, कर्नाटक, आंध्रप्रदेश व तामिळनाडू या सर्व राज्यामध्ये प्रत्यक्ष भेट देवून पपई उत्कर्षामध्ये भरमसाठ क्रांती केलेली आहे. वीस वर्षांच्या प्रदीर्घ अनुभवाच्या जोरावर शेतकर्यांच्या समस्या सोडवून त्यांचे आर्थिक व सामजिक जीवनमान उंचवण्याचा प्रयत्न चालू आहे की, ज्याचा लाभ बहुसंख्य शेतकरी बांधवांनी घेतलेला आहे. या सर्व प्रयत्नांमुळेच अशिक्षीत शेतकर्यांनीही पपईमध्ये गरूडझेप घेतलेली आहे.
शिवाजी बोडके ‘गरुड झेप’, वडवळ स्टॉप, मोहोळ-सोलापूर रोड (एनएच-६५), मोहोळ, जि. सोलापूर. (मोबा. ९८८१३२५५५५, ९४२२६४६४२५)
शेतीमित्र मासिक आता.. प्रत्येकाच्या मोबाईलवर ! #शेतीविषयक आधुनिक माहिती वेळोवेळी मिळविण्यासाठी #shetimitramagazine चे फेसबुक पेज लाईक करा !