इफकोचे सागरिका सेंद्रिय खत आहे तरी काय ?

0
1228

रासायनिक खत निर्मितीमध्ये शेतकर्‍यांमध्ये लोकप्रिय असलेल्या नामांकित अशा इफको कंपनीने तयार केलेले सागरिका हे सेंद्रिय खत सध्या शेतकर्‍यांमध्ये उत्सूकतेचा विषय ठरत असून, नेमके काय आहे सागरिका खत असा प्रश्‍न शेतकर्‍यांना पडत आहे.

वरचेवर शेतीमध्ये रासायनिक खताचा वापर वाढत असून, अनेक कंपन्या विविध प्रकारच्या रासायनिक खतांची निर्मिती करतात. त्याच पद्धतीने रासायनिक खत निर्माण करणार्‍या इफको कंपनीने काही दिवसापूर्वी बाजारात आणलेल्या सागरिका या सेंद्रिय खताबाबत खूपच चर्चा शेतकर्‍यांमध्ये सुरू आहे. शेतकर्‍यांच्या सेवार्थ तयार केलेले हे खत आहे तरी कसे ? हा प्रश्‍न शेतकर्‍यांसमोर आहे. सागरिका हे सेंद्रिय खत शेतीमालाची उत्पादकता वाढवण्याबरोबरच मातीची गुणवत्ताही टिकवून ठेवण्यास मदत करणार आहे. विशेष म्हणजे हे खत समुद्री शेवाळापासून तयार करण्यात आले असून त्यामुळेच याचे नाव सागरिका असे ठेवण्यात आले आहे.

याच्या वापरामुळे जमिनीची सुपीकता वाढणार असून पिकची गुणवत्ताही चांगली येणार आहे. हा विचार डोळ्यासमोर ठेवूनच इफको कंपनीने या  सेंद्रिय खताची निर्मिती केली आहे.  विशेष म्हणजे हे खत घन आणि द्रव्य अशा दोन्ही स्वरुपात तयार करण्यात आला असून 250 मिली द्रव्य सागरिका सेंद्रिय खत एक लिटर पाण्यात विरघळवून एक एकर शेतासाठी फवारणीद्वारे वापरता येते. तर घन स्वरूपातील सागरिका हे सेंद्रिय खत एक एकर जिमीनीसाठी आठ किलो वापरता येते.

भाजीपाला पिकावर याची फवारणी केल्यास त्याचा चांगला फायदा शेतकर्‍यांना होत असल्याचे अनुभव येत आहेत. विशेषता कांदा, बटाटा आणि लसून या सारख्या कंदवर्गीय भाज्यांसाठी हे सेंद्रिय उपयुक्त ठरत आहे. याचा पार करून शेतकरी कंदभाजी उत्पादनात चांगला फायदा मिळवू शकतात असा विश्‍वास हे खता तयार करणार्‍या ऍक्वाग्रीचे व्यवस्थापकीय संचालक अभिराम साठी व्यक्त करतात. ते सांगतात की, समुद्री शेवाळापासून सौंदर्य प्रसाधने तयार केली जातात. या शिवाय इतर अनेक गोष्टींमध्येही या शेवाळाचा वापर केला जातो. याची गुणवता लक्षात आल्यानंतर आम्ही यापासून सेंद्रिय खत तयार करण्यास सुरूवात केली. आणि ते शेतीसाठी चांग़लेच उपयुक्त पडत आहे. जमिनीच्या गुणवत्तेबरोबरच उत्पादीत मालाची गुणवत्ताही सुधारलेली दिसून येत असल्याचे समाधान ते व्यक्त करतात.

हेही वाचा :

काय आहे माती परिक्षणाचा मुलमंत्र ?

डाळिंबाच्या फुलसमस्येवर हे आहेत सेंद्रिय उपाय

थंडीत फळबागांची अशी घ्या काळजी

वाढत्या तापमानाचा शेतीला धोका

बी-बियाणे घेताना लक्षात ठेवा या १० गोष्टी !

इफको या कंपनीने दोन वर्ष संशोधन करून सागरिका तयार केले आहे. यामध्ये विशेष असे की सागरिका आहे 100 टक्के सेंद्रिय खत आहे. कंपनीने सागरिका हे द्रव्य आणि घण अशा दोन्ही स्वरूपात मार्केटमध्ये आणले आहे. कंपनी नुसार एक लिटर द्रव्य बाटलीची किंमत पाचशे रुपये आहे आणि घन स्वरूपात दहा किलो सेंद्रिय खताची किंमत 415 रुपये आहे.

https://www.facebook.com/shetimitramagazine03

आपणास ही बातमी आवडली असल्यास खालील स्टार क्लिक करून रेटींग करा

Click to rate this post!
[Total: 2 Average: 5]

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here