राज्यात सर्वच जिल्ह्यामध्ये उन्हाळी सोयाबीन घेण्यात आलेले नाही त्यामुळे त्या जिल्ह्यांमध्ये येणाऱ्या खरीपात बियाणांचा प्रश्न निर्माण होणार आहे. शिवाय गेल्या खरीप हंगामात अतिवृष्टी आणि सततच्या पावसामुळे बियाणे प्रमाणितच आहे असे नाही. येणाऱ्या खरिपासाठी खात्रीलायक बियाणे नसल्याचा दावा खुद्द कृषी विभागानेच केला असून, शेतकऱ्यांनी घरच्या बियाणांवरच भर देण्याचा सल्ला त्यांनी दिला आहे.

बाजारपेठेतील बियाणे हे प्रमाणित असेलच असे नाही. त्यामुळे या बियाणाच्या वापरामुळे उत्पादनात घट येऊ शकते. याबाबत कृषी विभागाकडून आतापासून जनजागृती केली जात आहे. उन्हाळी हंगामात ज्या शेतकऱ्यांना सोयाबीनचा पेरा केला आहे त्यांनी देखील हे बियाणे प्रमाणित करुनच वापरण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
उन्हाळी हंगामातील सर्वच भागातील पीक बहरात असे नाही. वातावरणातील बदलाचा परिणाम या पिकावरही झाला आहे. अवकाळी आणि सध्याचे ढगाळ वातावरण यामुळे सोयाबीनवर कीड-रोगाचा प्रादुर्भाव होत आहे. त्यामुळे हे सोयाबीन बियाणासाठी वापरणे धोक्याचे होणार आहे. यामुळे उत्पादनात घट होऊ शकते. रब्बी हंगामात सोयाबीनचा पेरा करण्यासाठी खरिपातील सोयाबीन शेतकऱ्यांनी विक्री केले आहे. खरीप हंगामात उत्पादन वाढीसाठी शेतकऱ्यांना घरचेच बियाणे वापरण्याचा सल्ला कृषी विभागाने दिला आहे.
बियाणांची योग्य काळजी घेतली तरच ते प्रमाणित राहणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी बियाणाची साठवणूक करताना पोत्यांची थप्पी ही सातपेक्षा अधिक असू नये. शिवाय याची साठवणूक ही कोरड्या जागेत करावी. एवढेच नाही तर साठवणूक करण्यापूर्वी जमिनीवर लाकडी फळ्या किंवा पुट्टे अंथरुन त्यावर बियाणे साठवावे. शेतकऱ्यांनी स्वत:कडील बियाणांची तीन वेळा उगवण क्षमता पाहूनच पेरणी करावी, असा सल्ला कृषी विभागाने दिला आहे.
👇👇👇 हेही वाचा 👇👇👇
सोयाबीन लागवडीचे व्यवस्थापन तंत्रज्ञान
टोमॅटोच्या अधिक उत्पादनासाठी या 8 रोगावर मिळवा विजय !
छाटणीद्वारे करा जुन्या आंबा बागांचे पुनरुज्जीवन
यंदा अवकाळी पावसामुळे केवळ खरीप हंगामातील पिकांचे नुकसान झाले असे नाही; तर उन्हाळी हंगामातील सोयाबीनवरही याचा परिणाम झाला आहे. पेरणी होताच विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाने हजेरी लावली. यामुळे उत्पादनावर तर परिणाम झालाच पण कीड-रोगामुळे हे सोयाबीन आता बियाणे म्हणून वापरता येणार ननसल्याने कृषी विभागाने हा सल्ला दिला आहे.

https://www.facebook.com/shetimitramagazine03

👇 https://www.instagram.com/shetimitra03/ 👇

https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1













Users Today : 12
Users Last 30 days : 765
Users This Month : 90
Users This Year : 802
Total Users : 236251