शेतकऱ्याने काय करावे ? कसे जगावे ? प्रपंच कसा चालवावा ? असे सवाल सभागृहात उपस्थित करून विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राज्यातील शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवरुन राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला. शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आल्यापासून गेल्या 45 दिवसात राज्यात 137 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. दररोज तीन शेतकरी आत्महत्या करत आहेत. शेतकऱ्यांना आत्महत्येपासून परावृत्त करण्यासाठी राज्य सरकारने तातडीने उपाययोजना करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली.
महत्त्वाची बातमी : कृषी पुरस्कारांसाठी प्रस्ताव सादर करण्याचा उद्या शेवटचा दिवस
आताच्या सरकारमधील कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी पवारसाहेबांचे मार्गदर्शन घ्यावे, असा सल्लाही देवून अजित पवार म्हणाले, मदतीसाठी राज्यातला शेतकरी फार आशेने सरकारकडे बघत आहे. तुम्ही-आम्ही जनतेचे प्रतिनिधित्त्व करताना आत्महत्या होणे ही लाजिरवाणी बाब आहे. हे सरकार निष्क्रिय नाही हा विश्वास जनतेला, बळीराजाला द्या असेही अजित पवार म्हणाले.

सभागृहात केलेल्या मागण्यांची पूर्तता झाल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नसल्याचे सांगून ते पुढे म्हणाले, अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे राज्यात ओला दुष्काळ जाहीर केल्यास त्यातून शेतकऱ्यांना मदत मिळेल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
ब्रेकिंग : आठवड्याला कृषीमंत्री येणार शेतकऱ्यांच्या बांधावर
राज्यात पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांना खूप मोठा फटका बसला आहे. अतिवृष्टीमुळे ज्या भागातील जमिनी खरडून गेल्या, पिके वाहून गेली अशा ठिकाणी सरकारने विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक शुल्क माफ करावे. शेतमजुरांना आर्थिक मदत द्यावी. खावटी अनुदान पैशाच्या रूपात द्यावे तसेच पिकांसाठी हेक्टरी 75 हजार तसेच फळ पिकांसाठी हेक्टरी दीड लाख रुपयांची मदत सरकारने जाहीर करावी अशी मागणी यावेळी अजित पवार यांनी केली.
मराठवाड्यामध्ये उस्मानाबाद, बीड, लातूर याठिकाणी गोगलगायमुळे कोवळ्या सोयाबीनचे मोठे नुकसान झाले आहे. उगवलेले सोयाबीन गोगलगायने खाल्ल्यानंतर नुकसानभरपाईची तरतूद नियमात नाही, त्यासंदर्भातील निर्णय मुख्यमंत्र्यांना घ्यावा लागेल असेही त्यांनी यावेळी सुचवले. या सरकारला पीककर्जाबाबत सहानुभूतीपूर्वक विचार करावा लागेल. पीककर्ज माफ केले पाहिजे. कोसळलेल्या घरांच्या नुकसानभरपाईसह ओलाव्यामुळे भेगा पडलेल्या घरांचाही पंचनामा झाला पाहिजे. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शाळा, शासकीय इमारतींचे देखील पंचनामे झाले पाहिजेत, अशी मागणी अजित पवार यांनी केली.
ब्रेकिंग न्यूज : विरोधक करणार ओल्या दुष्काळाची प्रमुख मागणी
सोयाबीनचा प्रतिएकर खर्च 11 हजार 700 रुपये आहे. तर कापसाचा प्रतिएकर खर्च हा 11 हजार 570 रुपये येतो. असे असताना आताच्या सरकारने हेक्टरी केवळ 13 हजार 600 रुपयांची मदत जाहीर केली आहे. शेतकऱ्यान काय करावे ? कसे जगावे ? प्रपंच कसा चालवावा ? असे सवालही अजित पवार यांनी यावेळी सभागृहात उपस्थित केला.
यंदा महाराष्ट्रात ऊसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर पहायला मिळत असून 1 ऑक्टोबरपासून साखर कारखाने सुरु करण्याची परवानगी दिल्यास ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा ऊस पुढे जाईल असेही ते म्हणाले.
महत्त्वाची माहिती : का आहे सोलापूर लाल डाळींब नंबर 1

https://www.facebook.com/shetimitramagazine03

https://www.instagram.com/shetimitra03/

https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1