शेतीत बियाणे, खते, कीडनाशके आदी निविष्ठांचा वापर अत्यंत महत्वाचा ठरतो. त्यामुळेच अत्यंत दक्ष राहुन त्यांची खरेदी करायला हवी. त्यासाठी काही गोष्टी माहीत करुन घेतल्यास आपली फसवणुक टाळणे शक्य होईल.
बीज प्रमाणीकरण : बियाण्याबाबतीत बाजारात प्रमाणित बियाणे व सत्यतादर्शक बियाणे विक्रीस येते, बियाणे अधिनियमांतर्गत विविध राज्यमध्ये बियाणे प्रमाणीकरणासाठी बीज प्रमाणीकरण यंत्रणा स्थापना करण्यात आल्या आहेत. प्रमाणित बियाणे उत्पादनासाठी सीड प्लॉटस घेतले जातात. त्यांना बीज प्रमाणीकरण यंत्रणेचे अधिकारी वेळोवेळी भेट देत असतात. त्यांच्या मार्गदर्शनाखाली चाचण्या घेतल्यानंतर या यंत्रणेमार्फत बियाणे प्रमाणीकरण केले जाते. बियाणे उत्पादक कंपनी ती अधिसुचीत नसलेल्या वाणांचे बिजोत्पादन करु शकते. अधिसुचीत नसलेल्या वाणाबाबतीत बियाण्याच्या पिशवीवर सत्यदर्शक लेबल लावुन त्याची विक्री केली जाते. या बियाण्यांच्या दर्जाबाबत स्वत:बियाणे उत्पादक खात्री देत असतो.
बियाणे खरेदी करण्यापुर्वी ही घ्यावी दक्षता : परवानाधारक विक्रेत्याकडुनच बियाण्याची खरेदी करावी. प्रामुख्याने बीज प्रमाणीकरण यंत्रणेने प्रमाणित केलेले बियाणे खरेदी करण्यास प्राधान्य द्यावे. बियाणे खरेदीची विक्रेत्याकडुनच बियाण्याची खरेदी करावी, प्रामुख्याने बीज प्रमाणीकरण यंत्रणेने प्रमाणित केलेले बियाणे खरेदी करण्यास प्राधान्य द्यावे. बियाणे खरेदीची विक्रेत्याकडुन पक्की पावती घ्यावी, त्यावर शेतकऱ्याचे पुर्ण नांव, पत्ता, पिकांचे नाव, प्रकार, जात, प्लॉट नं, उत्पादकाचे नाव, विक्रीची किंमत असावी. पावतीवर विक्रेत्याची व शेतकऱ्याची सही व अंगठा असावा, कच्चे बील स्वीकारु नये.
बियाणे खरेदी करताना पिशवीच्या लेबलवरील माहिती पहावी. या लेबलवर पिकाचे नाव व त्यात पिकाची उगवणशक्ती , भौतिक व आनुवांशिक शुध्दता टक्केवारी, बियाणे चाचणीची तारीख, महिना व वर्ष, वजन, बीज प्रक्रियेसाठी वापरलेले रसायन किंमत अदि गोष्टीचा उल्लेख तपासावा. बियाणे पिशवीवर असलेला किंमतीपेक्षा जास्त भावात बियाणे खरेदी करुन नये.आंतरराज्य वस्तुच्या पॉकिंगवर किंमत छापणे कायद्याने बंधनकारक आहे. बियाणे पिशवीवर किंमत छापली नसल्यास किंवा विक्रेता पिशवीवरील किंमतीपेक्षा जास्त किंमतीची मागणी करीत असेल तर तेही बाब जिल्हा वजनमापे निरीक्षसकाच्या निदर्शनास आणावी. या विभागाचे अधिकारी जिल्हा व तालुका स्थरावर कार्यरत असतात.
बियाणे खरेदी पावतीवर छापील बील क्रमांक असल्याची खात्री करावी. बियाणे पिशवी ही तीनही बाजुंनी शिवलेली असावी वरची बाजु ही प्रमाणपत्रासह शिवलेली असते. पेरणीसाठी पिशवी फोडताना जी खालील बाजुने फोडावी त्यामुळे पिशवीस असलेले लेबल व बीज प्रमाणीकरण यंत्रणेचा टॅग व्यवस्थित राहील. लेबल, टॅग जपुन ठेवावे. मुदतबाह्य झालेले तसेच पॉकिग फोडलेले सुटे बियाणे खरेदी करु नये.
बियाणाविषयी काही तक्रार असेल तर तालुका कृषि अधिकारी पंचायत समिती किंवा जि.प. कृषि विभागाकडे लेखी तक्रार द्यावी. सत्यतादर्शक बियाण्यामध्ये प्रमाणीकरण यंत्रणेचे प्रमाणपत्र वगळात अन्य सर्व बाबी वरील प्रमाणे असतात. बियाणे भावफलक दर्शनी भागात लावुन तयार कंपनी निहाय, जातीनिहाय बियाणे साठा व दर नमुद करावेत. सत्यतादर्शक बियाण्याच्या पिशवीवर एकच लेबल असल्याची खात्री करावी. लेबलवर दिशाभुल करणारा कोतताही मजकुर नसावा. बियाण्याची विक्री परवाना घेवुनच कराची. बियाणे खरेदीची पक्की पावती द्यावी. त्यावरील प्रमाणे सर्व मजकुर द्यावा. बियाणे खरेदी विक्रीचा मासिक अहवाल गटविकास अधिकारी व कृषि विकास अधिकारी यांना नियमित सादर करावा. परवाना दिलेल्या ठिकाणीच बियाण्याची विक्री किंवा साठा करावा बियाणे परवाना शेतकऱ्यास दिसेल अशा ठिकाणी लावावा. शेतकऱ्यांची निविष्ठा बाबत फसवणुक होवु नये. म्हणुन आत्यावश्यक वस्तु अधिनियम १९५५ या कायद्यार्तगत पुढीलप्रमाणे कायदे तक्रार करण्यात आहेत.
(टीप : बियाणे :- बी बियाणे अधिनियम 1968 बी बियाणे नियम 1968 बियाणे (नियंत्रण) आदेश 1983)
प्रा. संजय बाबासाहेब बडे, सहाय्यक प्राध्यापक (कृषिविद्या), दादासाहेब पाटिल कृषि महाविद्यालय, दहेगांव ता. वैजापूर जि. औरंगाबाद. मो. नं. ७८८८२९७८५९