यंदाच्या उन्हाळ्यातील मार्च ते मे महिन्यात तापमानाचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाचे महासंचालक डॉ. मृत्युंजय महापात्र यांनी मंगळवारी जाहीर केला. त्यानुसार यंदाच्या उन्हाळ्यात वायव्य भारत, ईशान्य भारताचा बहुतांश भाग, मध्य भारतासह पूर्व किनार्याचा काही भाग आणि हिमालय पर्वताचा पायथ्याकडे किमान तापमान सरासरी ते सरासरीपेक्षा अधिक राहणार आहे. तसेच पश्चिम भारत, त्याला लागून असलेला मध्य भारताचा भाग, देशाचा वायव्य आणि अति उत्तरेकडी भाग आणि ईशान्य भारताती राज्यांमध्ये तापमान सरासरीच्या वर राहण्याची शक्यता अधिक आहे.

इथे सरासरीपेक्षा जास्त तापमान : उन्हाचा चटका वरचेवर वाढत चालला असून, यंदा महाराष्ट्रातील कमाल तापमानाचा पारा सरासरीपेक्षा वरच राहण्याची शक्यता असून, उत्तर कोकण, उत्तर महाराष्ट्र अधिक तापण्याची शक्यता आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे. राज्याच्या दक्षिण भागात कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता अधिक असून, उर्वरित राज्यात कामाल तापमान मात्र सरासरी इतकेच राहाण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे.

इथे मार्च महिन्यात पाऊस : हवामान विभागाने जाहीर केलेल्या अंदाजानुसार राज्याच्या बहुतांश भागात मार्च महिन्यात तापमान सरासरीच्या वरच राहण्याची शक्यात अधिक आहे. राज्याच्या दक्षिणेकडील भागात मात्र तापमान सरासरीइतके राहण्याची शक्यात असून मार्च महिन्यात दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्रात सरासरीपेक्षा अधिक पावसाची तर उर्वरीत महााष्ट्रात सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता अधिक असल्याचे हवामान विभागाचे म्हणणे आहे.
हेही वाचा
हमीभावाने 6.89 लाख टन हरभरा खरेदीचे उद्दीष्ट
एकच चर्चा : गायीच्या डोहाळे जेवणाची
शेतीचा वीजपुरवठा खंडित करण्याचा ऊर्जामंत्र्यांचा इशारा
ला-निना स्थिती कमकुवत : विषुववृत्तीय प्रशांत महासागरात सध्या ला-निना स्थिती निवळते आहे. उत्तर गोलार्धातील वसंत ऋतूदरम्यान ही ला-निना स्थिती निवळून कमकुवत होणार आहे. वार्षाच्या दुसर्या टप्प्यात प्रशांत महासागरात शीत एल-निनो स्थिती निर्माण होण्याचे संकेत आहेत.

h
ttps://www.facebook.com/shetimitramagazine03

https://www.instagram.com/shetimitra03/

https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1
आपणास ही बातमी आवडली असल्यास खालील स्टार क्लिक करून रेटींग करा