मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बहुप्रतीक्षित मंत्रिमंडळाचा अखेर विस्तार आज झाला. शिंदे गट आणि भाजपकडून प्रत्येकी नऊ-नऊ जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. आता नव्या सरकारचे संभाव्य खातेवाटप समोर आले आहे. दिग्गज नेते राधाकृष्ण विखे पाटील यांना महसूल मंत्रिपदाची धुरा सोपवली जाण्याची शक्यता आहे. भाजपचे संकटमोचक नेते गिरीश महाजन यांच्याकडे पुन्हा जलसंपदा मंत्रालयाची तर दादा भुसे यांच्याकडे पुन्हा कृषी मंत्रालयाची जबाबदारी दिली जाण्याची शक्यता आहे.
नक्की वाचा : पावसामुळे भाज्या महागल्या
राज्य मंत्रिमंडळाचा आज विस्तार आज करण्यात आला. राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी 18 नवनियुक्त मंत्र्यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली. राजभवनातील दरबार हॉल येथे शपथविधी समारंभ झाला. यावेळी विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड, केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील, विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार, राज्याचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, प्रधान सचिव तथा मुख्य राजशिष्टाचार अधिकारी मनिषा म्हैसकर उपस्थित होते.
मंत्रिपदाची शपथ घेतलेल्या मंत्र्यांचे खातेवाटप लवकरच करण्यात येणार असून, येत्या 10 ते 17 ऑगस्ट दरम्यान राज्याचे पावसाळी अधिवेशन होणार आहे. त्यानंतर सप्टेंबर महिन्यात पुन्हा मंत्रीमंडळ विस्तार करण्यात येणार असल्याचे समजते.
मान्सून अपडेट : सावधान ! 7 जिल्ह्यांत रेड अलर्ट
दरम्यान, गृह खात्यावरुन शिंदे गट आणि भाजप यांच्यामध्ये रस्सीखेच झाल्याची चर्चा आहे. अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गृह मंत्रिपदाचा आग्रह सोडला आणि मंत्रिमंडळ विस्ताराचा मार्ग मोकळा झाला, असे बोलले जाते. देवेंद्र फडणवीस गृह आणि अर्थ या दोन्ही वजनदार खात्यांची जबाबदारी पेलण्याची चिन्हे आहेत. तर ठाकरे सरकारप्रमाणे एकनाथ शिंदे नगरविकास मंत्रालय सांभाळण्याचे संकेत मिळत आहेत.
शिंदे – फडणवीस सरकारमध्ये सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे ऊर्जा, वन मंत्रालय, गिरीश महाजन यांच्याकडे जलसंपदा मंत्रालय, राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे महसूल मंत्रालय, संजय राठोड यांच्याकडे ग्रामविकास मंत्रालय तर विजयकुमार गावित यांच्याकडे आदिवासी विकास मंत्रालयाची जबाबदारी दिली जाण्याची शक्यता आहे.
हे नक्की वाचा :
यंदा 92 लाख शेतकऱ्यांचा भरला पीकविमा
भाजपचे ज्येष्ठ नेते व प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम मंत्रालयाची जबाबदारी दिली जाण्याची शक्यता असून, गुलाबराव पाटील यांच्याकडे पाणीपुरवठा, दादा भुसे यांच्याकडे कृषी, दीपक केसरकर यांच्याकडे पर्यटन आणि पर्यावरण विभाग, शंभुराज देसाई यांच्याकडे उत्पादन शुल्क, सुरेश खाडे यांच्याकडे समाजिक न्याय, संदीपान भुमरे यांच्याकडे रोजगार हमी, तानाजी सावंत यांच्याकडे उच्च व तंत्रशिक्षण, रविंद्र चव्हाण यांच्याकडे गृहनिर्माण, अब्दुल सत्तार यांच्याकडे अल्पसंख्यांक विकास, मंगलप्रभात लोढा यांच्याकडे विधी व न्याय, अतुल सावे यांच्याकडे आरोग्य तर उदय सामंत यांच्याकडे उद्योग मंत्रालयाची जबाबदारी दिली जाण्याची शक्यता आहे.
महत्त्वाची घोषणा : महाराष्ट्राच्या कृषीक्षेत्रात आमूलाग्र बदल घडविण्यावर भर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
https://www.facebook.com/shetimitramagazine03
https://www.instagram.com/shetimitra03/
https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1