भारतात किंवा जगभरात आज पुन्हा सेंद्रिय शेतीला इतके महत्व दिले जात आहे की, शेतकरी वर्ग आता रासायनिक खत किंवा रासायनिक फवारणी पेक्षा आपल्या शेतीत सेंद्रिय खत आणि सेंद्रिय फवारणी करण्यास आनंदाने तयार झाला आहे.
खरे पाहता सेंद्रिय खत म्हणजे, आपले गांडुळ खत आणि गांडुळ अर्क हेच आपले प्रमुख खत मानले जात होते. परंतु इंग्रजांच्या युक्तीने भारतातील आपल्या शेतकर्यांच्या आर्थिक परिस्थितीचा फायदा घेत इंग्रजांनी सुरवातीला कमी पैशात जास्त उत्पन्न किंवा कमी मेहनतीमध्ये जास्त पीक निर्माण करण्याचा लोभ देत हळूहळू सेंद्रिय खतापेक्षा रासायनिक खताकडे आपल्या शेतकऱ्यांना वळवण्यात पूर्णयश मिळवले. तेव्हा इंग्रजांनी त्यांचा स्वार्थ साधला पण आपल्या शेत जमिनीचा कस जमिनीचा पोत हळूहळू करून नष्ट करण्यास कारणीभूत देखील झाले. आज रासायनिक खतांच्या नियमित वापराने भारतीय शेतकऱ्यांच्या कित्येक शेकडो ते हजारो हेक्टर जमिनी नापीक झालेल्या दिसत आहेत. मात्र हळूहळू शेतकर्यांना आपली चूक देखील लक्षात येत आहे. म्हणून आता पुन्हा ‘सेंद्रिय शेती हीच खरी शेती’ असा विचार आणि असा मानस करून आपला बळीराजा आता शेतीसाठी फक्त सेंद्रीय खत वापरु लागला आहे. सेंद्रिय शेतीकडे वळणार्या् शेतकर्यांची संख्याही वरचेवर वाढताना दिेसत आहे. विशेषकरून युवा शेतकर्यांमध्ये सेंद्रिय शेतीकडे वळण्याचा कल अधिक आहे. ही पर्यावरणाच्या आणि भविष्याच्या दृष्टीने अतिशय आनंदाची बाब म्हणता येईल.
तसे पाहता सेंद्रिय खतात प्रामुख्याने गांडुळ खत आणि गांडुळ अर्क ह्याचा वापर केल्याने जमिनीचा कस, जमिनीचा सामू आणि जमिनीची मशागतही नैसर्गिक रित्या फार चांगली होते. विशेषत: या सेंद्रिय खतामुळे पिकांची वाढ, फळांची चव, फळांचा रंग, फळांचा आकार देखील फार छान होतो. यामुळे सेंद्रिय शेती करण्याचा कल वाढत असल्याने आता कित्येक तरुण शेतकरी वर्ग अनेक पारंपारीक पद्धतीचा वापर करून सेंद्रिय खत निर्मिती सुद्धा करत आहेत.
आधुनिक आणि सुधारित गांडुळ खत निर्मिती पद्धत
जुन्या गांडुळ खत निर्मितीत शेण आणि पाला पाचोळा किंवा वाया जात असलेले पदार्थ आणि भाजीपाला तसेच कुजलेले पदार्थ याचा वापर होत असे. या पद्धतीने निर्माण केलेले गांडुळ खत सर्वांना परिचयाचे आहे; परंतु गांडुळ खत निर्मितीच्या पद्धतीमध्ये फारमोठ्या सुधारणा आणि बदल वेळोवेळी होत गेल्या आणि हे केल्या गेलेल्या निरीक्षण आणि परिक्षणावरून सिद्ध देखील झाले आहेत. शिवाय गांडुळ खत निर्मितीसाठी वापरल्या जाणार्या घटकांमध्ये बदल केल्यामुळे त्यापासून मिळणार्या गांडुळ खतामध्ये विविध अन्नद्रव्यांच्या कार्यक्षमतेमध्ये वाढ होते, हे संशोधनांत सिद्ध झाले आहे.
आधुनिक गांडूळ खत निर्मिती पद्धतीमध्ये आता साखर कारखान्यातील उसाची प्रेस मढ, शेण आणि उत्कृष्ट जातीचे गांडुळ म्हणजे औस्ट्रेलियन जातीचे गांडुळ वापरून हे गांडुळ खत बनवण्यात येते.
आपल्या शेतकऱ्यांना या गांडुळ खतात आधीच्या गांडुळ खतापेक्षा १० पट अन्नद्रव्ये घटक जास्त मिळतात आणि यामुळे कोणत्याही प्रकारची फळे, फुले, भाजीपाला, कडधान्याचे पिके घेताना शेतकर्यांना खूप फायद होतो. अनेक शेतकर्यांच्या प्लॉटवर याचे प्रात्यक्षीके घेण्यात आली असून, त्याचे रिजर्ट मिळाले आहेत.
या नवीन आधुनिक पद्धतीत साखर कारखान्यातील उसाची प्रेस मढ वापरल्याने गांडूळाला पौष्टिक आहार मिळतो; जो आहार त्याला सुकलेल्या पाला पाचोळा किंवा कचऱ्यातून मिळत नाही. या नवीन आधुनिक पद्धतीने तयार केलेल्या गांडुळ खतात आपल्या शेत जमिनीसाठी आणि आपल्या कोणत्याही प्रकारच्या पिकांच्या वाढीसाठी उपयुक्त असलेले अन्नद्रव्ये घटक म्हणजे नत्र (N), स्फुरद (P), पालाश (K), कॅल्शियम (Ca), मॅग्नेशियम (Mg), गंधक (S), लोह (Fe), मंगेनिज (Mn), जस्त (Zn), तांबे (Cu) यांचे प्रमाण देखील या आधुनिक गांडूळखत पद्धती मध्ये जास्त असते. या पद्धतीमधुन तयार झालेले ‘गांडुळ खत’ आणि ‘गांडुळ अर्क’ हे आपल्या शेतीसाठी एक वरदानच ठरणारे आहे.
प्रशिक्षण आणि माहिती
या आधुनिक पद्धतीचे गांडूळखत निर्मितीचे प्रशिक्षण आणि माहिती मांजरी (पुणे) येथील प्रसिद्ध इन्स्टिट्यूट येथे रीतसर दिले जाते. यापद्धतीचा गांडुळ खत निर्माण करणारा वार्षिक १००० टन गांडूळ खत निर्मिती क्षमता असलेला अनोखा आणि परिपूर्ण प्रकल्प ‘वनपुरी’ उदाची वाडी (सासवड) येथे ‘समृद्धी गांडूळ खत प्रकल्प आणि उद्योग’ या नावाने सुरू देखील झाला आहे.
कन्हैया ऊर्फ कमलेश दुबे समृद्धी सेंद्रिय गांडुळ खत प्रकल्प आणि उद्योग, ‘वनपुरी’, उदाची वाडी (सासवड) पुणे. (मोबा. ८९९९०८७७०९)
#शेतीमित्रमासिक आता.. शेतकर्यांच्या मोबाईलवर ! शेतीविषयक आधुनिक माहिती वेळोवेळी मिळविण्यासाठी #shetimitramagazine हे फेसबुक पेज लाईक करा