शेतकऱ्यांना बोगस बियाणे आणि खतांच्या लिकिंग प्रकरणी थेट तक्रार देण्यासाठी राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी व्हाट्सॲप क्रमांक आज विधिमंडळच्या सभागृहात जाहीर केला. राज्यातील शेतकऱ्यांनी या व्हाट्सॲप (हेल्पलाईन) क्रमांकावर तक्रार करावी, असे आवाहनही मुंडे यांनी केले.
मोठी बातमी : 15 ऑगस्टपर्यंत कांद्याचे अनुदान जमा होणार
राज्यात ऐन खरीप हंगामात शेतकऱ्यांची बोगस बियाणे आणि खताचे लिकिंग करून फसवणूक केली जात आहे. त्यामुळे यावर नियंत्रण आणण्यासाठी सरकारने कठोर पावले उचलावीत, अशी मागणी बाळसाहेब थोरात यांनी केली होती. यावर राज्य विधिमंडळा पावसाळी अधिवेशनात बोलताना मुंडे यांनी 98224 46655 हा हेल्पलाईन क्रमांक जाहीर केला. या हेल्पलाईन क्रमांकावर तक्रार नोंदवण्याचे आवाहन शेतकऱ्यांना केले आहे. यामुळे शेतकऱ्यांची फसवणुक करणाऱ्या विक्रेत्यांना चांगलाच चाप बसणार आहे.
राज्यातील शेतकऱ्यांच्या बोगस बियाणे आणि खत प्रकरणावर दोन दिवस विरोधी पक्षाने रान उठवले होते. बुधवारी कृषिमंत्री मुंडेंवर विरोधकांनी हल्लाबोल केला. त्यानंतर विरोधकांच्या प्रश्नाला उत्तर देताना मुंडे यांनी सरकार शेतकऱ्यासाठी महत्त्वाचे निर्णय घेईल, अशी ग्वाही दिली.
मोठा निर्णय : शेतकऱ्यांना फसवणुकीच्या तक्रारीसाठी व्हॉट्स ॲप क्रमांक मिळणार !
दरम्यान, कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी बुधवारी मंत्रालयात कृषी विभागाचे अपर मुख्य सचिव अनुपकुमार, कृषी आयुक्त सुनील चव्हाण, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचे संचालक परिमल सिंग, सहसचिव गणेश पाटील, संचालक विस्तार व सेवा विकास पाटील तसेच इतर अधिकारी यांची बैठक घेतली.
यावेळी कृषी निविष्ठा व गुण नियंत्रण तसेच बियाणे पुरवठ्याबाबत आढावा घेतला होता. या बैठकीत मुंडे यांनी प्रशासनाला शेतकऱ्यांना तक्रार करण्यासाठी व्हाट्सॲप क्रमांक सुरू करण्याचा निर्देश दिले होते. गुरुवारी मुंडे यांनी 98224 46655 नंबर जाहीर करत बोगस बियाणे आणि खतांच्या लिकिंगबाबत शेतकरी तक्रार करू शकतात, अशी माहिती विधिमंडळात दिली.
पावसाळी अधिवेशन : बोगस खते-बियाण्यासंदर्भात कडक कायदा आणणार : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
https://www.facebook.com/shetimitramagazine03