उन्हाळी हंगामातही आता गव्हाची शेती शक्य : गव्हाचा नवा वाण विकसित

0
767

देशातील गहू उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. भारतीय संशोधकांनी गव्हाची अशी जात शोधून काढली असून त्याची पेरणी मार्च अखेर करता येणार आहे. म्हणजेच उन्हाळी हंगामातही आता गव्हाची शेती शक्य होणार आहे. यामुळे आता शेतकरी बांधव आता आपल्या सोयीनुसार गहू पेरणीचे वेळापत्रक ठरवता येणार आहे.

महत्त्वाची बातमी : शिर्डी-सुरत महामार्गावर स्वाभिमानीचे चक्काजाम

भारतीय कृषी संशोधन परिषद या संस्थेने हे गव्हाचे वाण विकसित केले आहे. एचडी 3535 असे या गव्हांच नाव असून या बियाण्याची चाचणी पूर्ण झाली आहे. सोमवारी केंद्रीय कृषी मंत्रालयाने या गव्हाच्या वाणाची घोषणा केली आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, सध्या उपलब्ध असलेल्या वाणाची रब्बी हंगामात पेरणी केली जाते आणि एप्रिलमध्ये या वाणापासून उत्पादन मिळत असते. मात्र गेल्या काही वर्षांपासून तापमान वाढीचा फटका या सामान्य वाणाला बसत आहे.

ऐन मार्च महिन्याच्या म्हणजेच गहू पीक अंतिम टप्प्यात असताना तापमानात वाढ होते आणि यामुळे गव्हाचे पीक मोठ्या प्रमाणात प्रभावित होते त्यामुळे उतारा कमी मिळतो. यामुळे एकरी उत्पादकता गेल्या काही वर्षांपासून घटत होती. ज्यावर्षी तापमान वाढ रब्बी हंगामात राहिली त्यावर्षी कायमच गव्हाचा उतारा कमी राहिला आहे. अशा परिस्थितीत गव्हाच्या नवीन जातीचा शोध लावणे अत्यावश्यक होते.

मोठी बातमी : कांदा उत्पादकाच्या आडचणीत वाढ : दराची घसरण सुरूच

निश्चितच या नवीन जातीची पेरणी मार्च अखेर होणार असल्याने याचा शेतकऱ्यांना फायदा होऊ शकतो. दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार भारतीय कृषी संशोधन परिषदेने या नवीन जातीची नोंदणी पूर्ण केली आहे. डीसीएम श्रीराम लिमिटेड कंपनीला या वाणाचा परवाना देखील देण्यात आला आहे. आता सार्वजनिक आणि खाजगी भागीदारी मधून हे वाण गहू उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवले जाणार आहे.

अलीकडील काही वर्षात भारतीय कृषी संशोधन परिषदेने लवकर काढणीसाठी तयार होणाऱ्या तीन नवीन जातींचा शोध लावला आहे. एचडीसीएसडब्ल्यू 18, एचडी 3410, एचडी 3385 या तीन नवीन जाती आहेत. यापैकी एचडी 3385 ही आत्ताच विकसित झालेली जात आहे. हे वाण इतर दोन वाणाच्या तुलनेत सरस असल्याचा दावा करण्यात येत आहे.

चिंताजनक :  लातूर विभगात हरभऱ्यावर घाटे अळीचा प्रादुर्भाव

https://www.facebook.com/shetimitramagazine03

https://www.instagram.com/shetimitra03/

https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1

आपणास ही बातमी आवडली असल्यास खालील स्टार क्लिक करून रेटींग करा 👇 👇 👇

Click to rate this post!
[Total: 1 Average: 5]

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here