खरीप हंगामाच्या तोंड्यावर येत्या आठवड्यात पावसाने ओढ दिल्याने शेतकरी चिंतेत असतानाच भारतीय हवामान खात्याने शेतकर्यांसाठी मोठी व अनंदाची बातमी दिली असून, येत्या ८ जुलैनंतर मान्सून पुन्हा सक्रीय होईल आणि चांगला पाऊस पडेल असा अंदाज वर्तवला आहे.
विशेष म्हणजे यंदा जून महिन्यात मान्सूनचा पाऊस दोन दिवस उशिरा पोहचला. त्यानंतर मात्र मान्सूनने वेगाने गती पकडली. आठ ते दहा दिवसात मान्सून देशातील विविध भागात सक्रीय झाला. मात्र जुलैच्या पहिल्याच आठवड्यात मान्सूनने आपला जोर कमी केला.

दरम्यान, मान्सूनच्या आगमनानंतर शेतकर्यांनी खरीप हंगामातील पेरण्याची कामे सुरू केली. अनेक भागात पेरण्या पूर्णही झाल्या. खरीप हंगामातील धान, सोयाबीन, कापूस, तूर, मूग, मका, भूईमूग, उडीद, मटकी, हुलगा ही मुख्य पिके असून ही पिके पूर्णत: पावसावर अवलंबून आहेत. मात्र पावसाने उघडीप दिल्याने शेतकर्यांमध्ये चिंता निर्माण झाली. ज्या भागात पेरण्या लवकर झाल्या आहेत. ती पिके उगवून आली आहेत. तर काही भागातील पिके अजून उगवून येयची आहेत. त्यामुळे पेरणी झालेल्या पिकांच्या पोषणासाठी पावसाची गरज असताना पावसाने दडी मारली आहे. गेल्या आठ दहा दिवसापूर्वी पावसाचा जोर चांगला होता. त्यामुळे शेतकर्यांना वापश्या अभावी पेरण्या करता आलेल्या नाहीत. अजून वेळ गेला तर पेरणीला उशीर होत असल्याने बहुतांश भागात पेरण्या झाल्या आहेत. तर काही भागात पावसाच्या भरवश्यावर पेरण्या सुरू आहेत. त्यामुळे पावसाची गरज निर्माण झाली आहे.

दरम्यान, भारतीय हवामान विभागाचे महानिर्देशक मृत्यूंजय महापात्र यांनी जुलै महिन्यात नैऋत्य मान्सूनचा पाऊस सामान्य राहिल अशी सूचना पर्यावरणाचा अंदाज घेत व्यक्त केली आहे. मात्र जुलै महिन्याच्या दुसर्या आठवड्यात जोरदार पाऊस पडण्याचे संकेत दिली आहेत. ऑगस्ट महिन्यातील पावसाचा अंदाज जुलैच्या शेवटच्या किंवा ऑगस्टच्या सुरूवातीला सांगितला जाईल असेही त्यांनी सांगितले आहे. ८ जुलैपासून बंगालच्या खाडीवरून पुन्हा वारे वाहायला सुरूवात होईल त्यानंतर पुन्हा मान्सून सक्रीय होईल आणि चांगला पाऊस पडेल असे त्यांनी म्हटले आहे.
दरम्यान, ३० जूनपर्यंत राज्यात सातारा, कोल्हापूर, मुंबई, जालना, परभरीण या विभागात सर्वाधिक पाऊस पडला आहे. धुळे आणि नंदुरबार विभागात खूप कमी पाऊस पडला आहे. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, पुणे, सांगली, पालघर, औरंगाबाद, बीड, वाशिम, यवतमाळ, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, आणि चंद्रपूर येथे सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे तर नाशिक, अहमदनगर, बुलडाणा, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, नांदेड, हिंगोली, गडचिरोली व गोंदीया या भागाता समाधानकारक पाऊस पडला आहे.

https://www.facebook.com/shetimitramagazine03
आपणास हा बातमी आवडली असल्यास खालील स्टार क्लिक करून रेटींग करा