यंदा कधी नव्हे एवढ्या उच्चांकी भावाने कापूस विकला गेला. अजूनही कापसाच्या भावात तेजीत असून आजही आंतरराष्ट्रीय बाजाराचा विचार केला तर कापसाचे दर हेच तेजीतच आहेत. असे असताना केंद्र सरकारने कापसावरील अकरा टक्के आयात शुल्क रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. भविष्यात देखील कापसाची मागणी वाढणार असून, कापूस दरातील तेजी ही कायम राहणार आहे.
महत्त्वाची बातमी : यंदा महाराष्ट्रात सरासरीपेक्षा जास्त पाऊस : स्कायमेटचा अंदाज
महागाई कमी होण्यासाठी केंद्र सरकारने कापूस आयात शुल्क हटवण्याचा जो निर्णय घेतला आहे. त्यासाठी ३० सप्टेंबर पर्यंत मुदत देण्यात आली आहे. यंदा देशात कापूस उत्पादनात प्रचंड घट झाली आहे. मागणीच्या मानाने कापसाचा अत्यल्प पुरवठा होत असल्याने कापसाच्या दरात प्रचंड वाढ झाली. त्यामुळे कापसाच्या आयातीवर असलेले शुल्क रद्द करावे अशा आशयाची मागणी कापड उद्योजकाकडून मागील काही दिवसांपासून सातत्याने होत होती. त्या अनुषंगाने केंद्र सरकारने कापसावरील अकरा टक्के आयात शुल्क रद्द केले आहे. हे शुल्क रद्द केल्यामुळे या सप्टेंबरपर्यंत कापसाचे आयातही वीस ते पंचवीस लाख गाठीकापूस इतकी होऊ शकते असा अंदाज व्यक्त होत आहे.
आनंदाची बातमी : देशी गायी, म्हशी संशोधन प्रयोगशाळा उभारणार : उपमुख्यमंत्री अजित पवार
केंद्र सरकारने कापसावरील आयात शुल्क कमी केले असले तरी देशांतर्गतच नव्हे तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये देखील कापसाच्या भावाला तेजी आहे. या निर्णयाचा कुठलाही परिणाम कापूस दरावर होणार नसल्याचा अंदाज तज्ञांकडून व्यक्त होत आहे.
नक्की वाचा : उसाप्रमाणे दूधच्याही एफआरपी संरक्षणासाठी आता देशस्तरावर संघर्ष
इंटरनॅशनल कॉटन एक्सचेंजचा विचार केला तर कापसाच्या स्पॉटचे दर 150 ते 152 सेंट प्रति पाऊंडच्या दरम्यान आहेत. म्हणजेच आपण एक खंडीचा विचार केला तर प्रति खंडी 92 हजार रुपयांच्या दरम्यान हा दर पडतो. त्यामध्ये आयात वाहतूक खर्च पाच हजार रुपयांपर्यंत येतो. म्हणजेच आयात कापूस 97 हजार रुपये प्रति खंडीवर पडेल. आपल्या देशाचा विचार केला तर हा दर एक लाख रुपयांच्या दरम्यान आहे, आयात कापूस आणि देशातील दर यात फारसा फरक नाही. त्यामुळे देशातील दर कमी होतील अशी शक्यता नाही. असे देखील या क्षेत्रातील जाणकारांचे म्हणणे आहे.
हे वाचा : लवकरच कृषीपंपासाठी नवे विभागनिहाय धोरण लागू होणार !
कपड्यांच्या किमती होणार कमी : या निर्णयामुळे आता सूत, कापड, फॅब्रिक तसेच कापसापासून बनवलेल्या ज्या ज्या गोष्टी आहे त्यांच्या किमतीमध्ये घट होणार आहे. या कारणांमुळे वस्त्रोद्योग तसेच ग्राहकांना मोठा दिलासा मिळनार आहे. येत्या काही दिवसातच कपड्यांच्या किंमती कमी होणार असल्याची दाट शक्यता वर्तवली गेली आहे.
https://www.facebook.com/shetimitramagazine03
👇 https://www.instagram.com/shetimitra03/ 👇
https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1