विदर्भातील सफेद मुसळी, पानपिंपळीला मिळणार भौगोलिक मानांकन

0
409

विदर्भातील अकोला आणि बुलढाणा जिल्ह्याची नवी ओळख ही वनौषधी उत्पादनाचा जिल्हा म्हणून होत आहे. या दोन्ही जिल्ह्याने पानपिंपळी व सफेद मुसळी या वनऔषधी उत्पादनात गेल्या काही वर्षात आघाडी घेतली आहे. त्यामुळे या जिल्ह्यातील या दोन्ही वनौषधींना भौगोलिक मानांकन मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यासाठी पश्‍चिम विभागीय औषधी वनस्पती सुविधा केंद्राच्या माध्यमातून जोरदार प्रयत्न सुरू आहेत.

अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी तालुक्यात पानपिंपळी लागवडीचा सुमारे 130 वर्षाचा इतिहास आहे. अंजनगाव सुर्जीसह पायथ्याशी असलेल्या अनेक गावांमध्ये पानवेली उत्पादक शेतकरी पानपिंपळी उत्पादन करीत आहेत. एकरी आठ ते 22 क्विंटल वाढलेल्या पानपिंपळीचे उत्पादन होते. कफ पित्तावर उपाय ठरणाऱ्या औषधीमध्ये याचा मोठ्या प्रमाणात उपयोग केला जातो. अंजनगाव सुर्जीमधून व्यापारी पानपिंपळीची खरेदी करतात त्याला सुमारे 450 ते 500 रुपये किलो दर मिळतो.

पानपिंपळी सोबतच 1990 पासून सफेद मुसळीची लागवड देखील या भागात मोठ्या प्रमाणात केली जाते. अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यात तसेच सातपुड्याच्या पायथ्याच्या गावांमध्ये याची शेती होऊ लागली आहे. सफेद मुसळीची लागवड वाढविण्याच्या दृष्टीने येथील जगन्नाथ धर्मे शेतकऱ्यांना प्रवृत्त करीत आहेत. त्यांच्या प्रयत्नातूनच या भागातील सफेद मुसळीची लागवड वाढत आहे.

👇👇👇 हेही वाचा 👇👇👇

एफआरपी निर्णयाविरुद्ध सदाभाऊ खोत यांचे 27 पासून आंदोलन  

राज्याला उन्हाचा चटका

नाबार्डची शेतीसाठी 1 कोटी 43 हजार कोटीची तरतूद

पाणी फाऊंडेशनच्या सोयाबीन डिजिटल पुस्तकाचे झाले लोकार्पण

पश्‍चिम विभागीय औषधी वनस्पती सुविध केंद्राच्या माध्यमातून बोर्डी, अंजनगाव सुर्जी भागात होणार्‍या पानपिंपळी तसेच जळगाव जामोद भागातील सफेद मुसळीला भौगोलिक मानांकनाचा प्रस्ताव असल्याचे केंद्रातील शास्त्रज्ञ डॉ. दिगांबर मोकाट यांनी सांगितले आहे.

https://www.facebook.com/shetimitramagazine03

👇 https://www.instagram.com/shetimitra03/ 👇

👇 शेतीमित्रचा online shetimitra हा टेलेग्राम ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील लिंक क्लिक करा 👇

https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1

👇 आपणास ही बातमी आवडली असल्यास खालील स्टार क्लिक करून रेटींग करा 👇

Click to rate this post!
[Total: 1 Average: 5]

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here